ओप्पोची धडाकेबाज F31 Series झाली लॉन्च! F31, F31 Pro आणि F31 Pro+ – जाणून घ्या काय आहेत खास फीचर्स आणि किंमत.

ओप्पो तुमच्यासाठी घेऊन आला आहे १ नाही, २ नाही तर थेट ३ फोन. हो, ओप्पोने लाँच केली त्यांची नवी F सीरिजमधील अजून एक धमाकेदार F31 Series. F31 Series मध्ये तुम्हाला ३ फोन पाहायला मिळणार आहेत – F31, F31 Pro आणि F31 Pro+. नावं पण अगदी ऍपलच्या फोनशी स्पर्धा करतील अशी ठेवली आहेत.

तर आज आपण पाहणार आहोत Oppo F31 Pro+, जो या सीरिजमधील टॉप व्हेरिएंट आहे. F31 आणि F31 Pro साठी मी वेगळा ब्लॉग लिहिणार आहे, पण आत्ता आपण खास Oppo F31 Pro+ बद्दल बोलूया. तुम्हाला माहितीच असेल की Oppo ची F Series ही प्रामुख्याने ऑफलाइन म्हणजेच दुकानांमध्ये जास्त विकली जाणारी सीरिज आहे.

Oppo F31 Pro+ मध्ये यावेळेस मोठी बॅटरी, एक पॉवरफुल स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि OIS कॅमेरा दिलेला आहे. ओप्पोने या सीरिजमध्ये खूप चांगले अपग्रेड्स केले आहेत. चला तर मग पाहूया हे अपग्रेड्स अजून थोडक्यात.

Oppo F31 Pro Plus डिस्प्ले

F31 Pro+ च्या डिस्प्ले मध्ये यावेळेस 6.8″ FHD+ फ्लॅट एमोलेड डिस्प्ले मिळणार आहे. मागच्या Oppo F29 Pro या व्हेरिएंटमध्ये क्वाड कर्व्ह्ड डिस्प्ले दिलेला होता, पण आता F31 Pro+ मध्ये तुम्हाला फ्लॅट डिस्प्ले मिळतो, जो डिस्प्ले मधला एक उत्तम अपग्रेड आहे.

ड्युरॅबिलिटीमध्येही यामध्ये डॅमेज प्रूफ 360° आर्मर बॉडी सोबत मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन मिळते, म्हणजे तुमच्या हातातून फोन खाली पडला तरी त्याला एक साधा खरचट सुद्धा येणार नाही — इतकी मजबूत बॉडी आहे.

हा फोन फक्त ड्युरेबलच नाही तर पाण्यात पडला तरी काही होणार नाही, कारण हा फोन IP66 / IP68 / IP69 सर्टिफाइड आहे. पाण्यात चुकून पडला तरी फोनला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. सोबत कंपनीने Oppo F31 Pro+ मध्ये तब्बल 18 प्रकारचे लिक्विड रेसिस्टन्स दिले आहे, म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या जे द्रव (Liquid) असतात त्यापासूनही हा फोन सुरक्षित राहणार आहे.

या फोनवर पाणी पडलं, पाण्याचे शिंतोडे उडाले किंवा गाडीवर असताना ग्लोव्हज घातलेले असले तरीसुद्धा तुम्ही हा फोन सहज वापरू शकता, कारण Oppo ने यात स्प्लॅश टच आणि ग्लोव्ह टच अशी फीचर्स दिली आहेत.

डिस्प्लेमध्ये अजून एक खास फीचर दिले आहे ज्याला Flicker-Free Display म्हणतात. जेव्हा तुम्ही अंधारात काही मूव्हीज पाहता, तेव्हा स्क्रीन खूप कमी फ्लिकर (लुकलुकणे) होते. यामुळे डोळ्यांवरचा ताण खूपच कमी होतो.

Oppo F31 Pro Plus प्रोसेसर, बॅटरी

परफॉर्मन्समध्ये या वेळी एक मोठं अपग्रेड केलं आहे. Oppo F31 Pro+ आता स्नॅपड्रॅगन ७ जेन (4nm) प्रोसेसर सोबत येणार आहे. आपण जर मागच्या F सीरीजमधल्या प्रो मॉडेल्सशी तुलना केली तर Oppo F29 Pro मध्ये MediaTek Dimensity 7300 हा प्रोसेसर मिळत होता, पण आता F31 Pro+ मध्ये थेट स्नॅपड्रॅगन ७ जन प्रोसेसर देण्यात आला आहे.

गेम खेळताना फोन गरम झाला तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण यात एक खास गेमिंग फीचर दिलं आहे ज्यामुळे हा फोन हीट होत नाही. ते गेमिंग फीचर म्हणजेच सुपरकूल VC सिस्टम. हे फीचर जेव्हा फोन गरम होतो तेव्हा त्या हीटचं नियमन करतं आणि यामुळे तुमचा गेमिंगचा अनुभव अजून उत्कृष्ट मिळतो.

येऊ या आता बॅटरी कडे – Oppo F29 Series मध्ये आधी तुम्हाला 6000mAh ची बॅटरी मिळत होती, पण आता Oppo F31 Series मध्ये चक्क 7000mAh ची दमदार बॅटरी दिली आहे, म्हणजेच बॅटरीमध्येही एक भारी अपग्रेड केलं आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो.

Oppo F31 Pro Plus कॅमेरा, AI फीचर्स

आपल्या सगळ्यांची आवडती गोष्ट म्हणजे फोनमधला कॅमेरा. कॅमेरामध्ये इतके बदल केले नाहीत, असंही म्हणता येईल की बदल केलेलाच नाही. मॉड्यूलमध्ये जो Oppo F29 Series मध्ये दिला होता, तोच Oppo F31 Pro+ मध्ये दिला आहे. तुम्हाला कॅमेरामध्ये 50 मेगापिक्सेल ड्युअल कॅमेरा सेटअप आणि त्यासोबत OIS, तसेच 2 मेगापिक्सेलचा मोनोक्रोम कॅमेरा मिळतो. तर सेल्फी कॅमेरा 32 मेगापिक्सेलचा दिला आहे.

व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही या फोनच्या रियर कॅमेरा आणि सेल्फी कॅमेरामधून 4K रेकॉर्डिंग करू शकता. खूप फोनमध्ये फक्त 1080p पर्यंतच सेल्फी रेकॉर्डिंग असतं, पण Oppo F31 Pro+ मध्ये आता तुम्हाला 1080p सोबतच 4K रेकॉर्डिंग मिळणार आहे. हे खरंच एक चांगली बातमी आहे, ज्यांना प्रत्येक क्षण रेकॉर्ड करायला आवडतो त्यांच्यासाठी.

oppo f31 pro plus features marathi

रेकॉर्डिंगमध्ये आजवर तुम्ही बऱ्याच गोष्टी कॅप्चर केल्या असतील, पण आता Oppo F31 Pro+ च्या मदतीने असे क्षणही तुम्ही रेकॉर्ड करू शकणार आहात ज्याची कल्पना देखील केली नसेल. कारण या फोनमध्ये एक फीचर दिलं आहे ज्याला अंडरवॉटर मोड असं म्हणतात. होय, आता तुम्ही पाण्याखाली म्हणजे पोहताना सुद्धा फोटो किंवा व्हिडिओ काढू शकता. Oppo ने खरंच एक भन्नाट फीचर दिलं आहे जे सगळ्यांना नक्की आवडेल.

F31 Pro+ मध्ये तर AI फीचर्स भरपूर दिले आहेत. एआय रिमूव्ह रिफ्लेक्शन जे फोटोमधून रिफ्लेक्शन काढते, एआय इरेझर आहे जे फोटोमध्ये नको असेल ती गोष्ट गोल करून काढून टाकते, एआय रिकॉम्पोज जे तुमच्या फोटोचा रेशो नीट दाखवते, एनहांस क्लॅरिटी ज्यामुळे फोटो ब्लर आला असेल तर तो अधिक स्पष्ट होतो आणि एआय परफेक्ट शॉट जे फोटोमध्ये काही नीट आले नसेल तर ते सुधारते — हे सगळे फीचर्स तुम्हाला मिळणार आहेत.

Oppo F31 Pro Plus स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत(oppo f31 pro plus features marathi)

oppo f31 pro plus features marathi
हिमालयन व्हाईट
oppo f31 pro plus features marathi
जेमस्टोन ब्लू
oppo f31 pro plus features marathi
फेस्टिव्हल पिंक
ऑपरेटिंग सिस्टमअँड्रॉइड 15(ColorOS 15.0)
2 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 3 वर्षे सुरक्षा अपडेट्स
प्रोसेसरस्नॅपड्रॅगन ७ जेन
इंटरनल स्टोरेज256 GB
रॅम8 GB
सुरक्षाइन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर
बॅटरीची क्षमता7000 mAh
अ‍ॅडॉप्टर80W
पोर्ट्सटाइप -C पोर्ट
डिस्प्ले आकार6.8 इंच (एमोलेड डिस्प्ले)
रिझोल्यूशन2800 × 1280 पिक्सेल
पाणी संरक्षणIP66, IP68, IP69 जल-प्रतिरोधक डिझाइन
डिस्प्ले तंत्रज्ञान1)नॉर्मल ब्राइटनेस:- 600 निट्स
2)हाय ब्राइटनेस मोड:- 1600 निट्स
3)120Hz रिफ्रेश रेट
4)टच सॅम्पलिंग रेट:- 240Hz
5)FHD+
सेंसर1)प्रॉक्सिमिटी सेन्सर
2)ई-कंपास
3)अ‍ॅम्बियंट लाईट सेन्सर
4)ॲक्सेलरोमीटर
5)जायरोस्कोप
6)कलर टेम्परेचर सेन्सर
कॅमेरा1)सेल्फी कॅमेरा:- 32 मेगापिक्सेल
2)पाठीचा कॅमेरा:- ५० मेगापिक्सेल + २ मेगापिक्सेल (मोनोक्रोम)
3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 4K,1080P, 720P
ऑडिओड्युअल स्टीरिओ स्पीकर्स
रंग1)हिमालयन व्हाईट
2)जेमस्टोन ब्लू
3)फेस्टिव्हल पिंक
कनेक्टिविटी5G, 4G, 3G, 2G
ब्लूटूथ v5.2, Wi-Fi 5, Wi-Fi 6
किंमत₹32,999

F31 Pro Plus मध्ये 2 व्हेरियंट्स उपलब्ध आहेत – 8GB + 256GB आणि 12GB + 256GB. दुसऱ्या व्हेरियंटची किंमत ₹34,999 असणार आहे. या फोनकडे पाहिलं तर Oppo ने यात दोन सर्वात मोठे अपडेट्स दिले आहेत – बॅटरी आणि ड्युरेबिलिटी. आजपर्यंतचा Oppo चा हा सर्वात मजबूत फोन बनवला गेला आहे.

तुम्हाला या (oppo f31 pro plus features marathi) फोनबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करायला विसरू नका, म्हणजे सर्वात आधी कोणताही फोन लॉन्च झाला की तुम्हाला लगेच माहिती मिळेल.

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment