भारताचा सर्वात पहिला Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर असलेला स्मार्टफोन सोबत 7100mAh बॅटरी, 165Hz स्क्रीन आणि खास गेमर्ससाठी बनवलेला OnePlus 15 झाला लाँच!

Oneplus 15 Specifications Marathi

OnePlus 15 Specifications Marathi – Snapdragon 8 Elite Gen 5, 7100mAh बॅटरी, 165Hz डिस्प्ले, IP66,IP67/IP69K रेटिंग आणि 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअपसह OnePlus 15 India मध्ये लॉन्च!

OnePlus ने आजपर्यंतच्या सर्व गोष्टींमध्ये नवीनतम तंत्रज्ञान आणि भन्नाट डिझाइन असलेला OnePlus 15 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन पाहून असं वाटतं की OnePlus ने हा फोन बनवताना इतकं मनापासून काम केलं आहे की मोबाइल इंडस्ट्रीमध्ये मोठा धमाका करायचा असा निर्धार करूनच हा फोन लाँच करण्यात आला आहे.

OnePlus 15 मध्ये इतके नवे बदल केले आहेत की आपण सर्वांनी त्याचा विचारही केला नसेल मग ते डिझाइन असो, कॅमेरा, डिस्प्ले, बॅटरी, रंग, चिपसेट किंवा इतर अनेक फीचर्स. आता हे नेमके काय बदल केले आहेत, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला अगदी स्पष्ट आणि सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे.

तुम्ही पाहिलंच असेल की याआधी OnePlus 13s आला होता आणि त्यानंतर थेट OnePlus 15 लॉन्च केला. यावरून असे स्पष्ट होते की OnePlus ने 14 हा मॉडेल लॉन्च न करता थेट OnePlus 15 बाजारात आणला आहे. OnePlus हा ब्रँड नेहमी नवीन-नवीन बदल करत असतो पण प्रत्यक्षात तो आपल्या सुरुवातीच्या ओळखीशीच जोडलेला आहे.

तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल की OnePlus चा पहिलाच स्मार्टफोन OnePlus 1 जेव्हा लॉन्च झाला होता तेव्हा तो सँडस्टोन ब्लॅक या खास रंगात उपलब्ध होता. तोच रंग OnePlus ने पुन्हा एकदा OnePlus 15 मध्ये आणला आहे.

आज आपण OnePlus 15 मधील सर्व गोष्टी अगदी खोलवर पाहणार आहोत डिझाईनपासून ते परफॉर्मन्सपर्यंत सगळं कारण या फोनमधील प्रत्येक बाबतीत मोठे बदल करण्यात आले आहेत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या नवीनतम स्मार्टफोनच्या चर्चेला.

Oneplus डिझाइन & डिस्प्ले Display

फोनच्या डिझाइनकडे पाहिलं तर यावेळी OnePlus ने पूर्णपणे नवीन डिझाइनसह हा फोन लॉन्च केला आहे. एक वर्ष आधी आलेल्या OnePlus 13S मध्ये मागील बाजूचा कॅमेरा मॉड्यूल गोल होता पण आता त्याचा आकार बदलून चौकोन मध्ये करण्यात आला आहे. आणि याच बदलामुळे OnePlus 15 पूर्णपणे वेगळा आणि उठून दिसणारा वाटतो.

डिस्प्ले मध्येही OnePlus ने चांगला अपग्रेड दिला आहे, ज्यामुळे फोन डिझाइनच्या दृष्टीने अजून प्रीमियम दिसतो. आधी OnePlus 13 मध्ये तुम्हाला क्वाड-कर्‍व्ड डिस्प्ले मिळत होता पण यावेळी तो बदलून फ्लॅट स्क्रीन देण्यात आला आहे आणि OnePlus ने हा निर्णय अगदी योग्य घेतला आहे कारण खूप लोकांना फ्लॅट स्क्रीन अधिक पसंत असते.

तुम्ही मला कॉमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कोणती स्क्रीन जास्त आवडते? क्वाड-कर्‍व्ड स्क्रीन डिस्प्ले की फ्लॅट स्क्रीन स्क्रीन डिस्प्ले.

OnePlus 15 हा इंडस्ट्रीमधला पहिलाच स्मार्टफोन आहे ज्यामध्ये 6.78-इंच 1.5K Pro XDR फ्लॅट डिस्प्ले पाहायला मिळतो. हा डिस्प्ले पाहिल्यावर तुम्ही नक्कीच खूप खुश व्हाल कारण या डिस्प्लेवरील व्हिडिओ क्वालिटी अगदी रिअॅलिस्टिक, HD, कलरफुल आणि खूपच जबरदस्त दिसते.

गेम खेळणाऱ्यांसाठी ही या डिस्प्लेमध्ये एक जबरदस्त अपग्रेड दिला आहे. सामान्य वापरासाठी या फोनमध्ये 120Hz डिस्प्ले मिळतो, पण खास गेमिंगसाठी OnePlus ने 165Hz रिफ्रेश रेटपर्यंत सपोर्ट दिला आहे. BGMI, Call of Duty, Free Fire किंवा Shadow Fight कोणतीही गेम असो, तुम्ही या फोनमध्ये त्या 165Hz मध्ये खेळू शकता. आता गेमिंगमध्ये तुम्हाला फक्त स्मूदनेस आणि स्पीड याच गोष्टी अनुभवल्या जातील आणि इतक्या उच्च रिफ्रेश रेटमुळे लॅगिंगचा तर प्रश्नच येत नाही.

स्क्रीन प्रोटेक्शनसाठी OnePlus ने गोरिला ग्लास व्हिक्टस 2 चे संरक्षण दिले आहे आणि मागच्या बाजूला गोरिला ग्लास 7i वापरले आहे. त्यामुळे फोनला स्क्रॅच किंवा लहानसहान धक्क्यांमुळे काहीही होण्याची शक्यता खूप कमी होते. याव्यतिरिक्त केवळ डिस्प्लेचेच नाही तर तुमच्या डोळ्यांचेही संरक्षण करण्याची काळजी OnePlus ने घेतली आहे.

जर तुम्ही फोनवर जास्त वेळ मुव्हीज, व्हिडिओज किंवा सोशल मीडिया पाहत असाल तर त्यासाठी OnePlus ने या फोनमध्ये Eye Care 5.0 हे फीचर दिले आहे. हे फीचर खास तुमच्या डोळ्यांची काळजी घेते विशेषतः जेव्हा तुम्ही दीर्घकाळ स्क्रीनकडे पाहत काम करता.

OnePlus 15 पाण्यात पडला तर त्याची काळजी कंपनीने खास घेतली आहे. OnePlus ने धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी या फोनला IP66, IP68, IP69 आणि IP69K अशी चारही रेटिंग्स दिली आहेत. आजपर्यंत जेवढ्या IP रेटिंग्स पाहायला मिळाल्या आहेत त्या सगळ्या एकाच फोनमध्ये मिळणं ही मोठी गोष्ट आहे.

तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण आधी IP66, IP68 आणि IP69 या रेटिंग्स ऐकल्या आहेत, पण IP69K हे कदाचित पहिल्यांदाच ऐकायला येत असेल बरोबर ना?

तर IP69K मधील “K” म्हणजे High Temperature Protection (उच्च तापमानातील संरक्षण). OnePlus 15 हा फोन फक्त साध्या पाण्यापासूनच नाही तर गर्म पाण्यापासूनही संरक्षण देतो. फोनला मिळालेलं हे खास IP69K रेटिंग त्याला अजून एक मजबूत प्लस पॉइंट देते.

Oneplus 15 प्रोसेसर Processor

परफॉर्मन्स कडेही पाहिलं तर OnePlus ने यासाठी खूप उत्कृष्ट काम केले आहे. OnePlus 15 हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे ज्यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 (3nm) हा नवीनतम आणि शक्तिशाली चिपसेट मिळतो. एवढंच नाही तर OnePlus ने यात ट्रिपल-चिप सेटअप देखील दिला आहे जे पूर्णपणे OnePlus ने स्वतः तयार केले आहेत.

ट्रिपल-चिप सेटअप म्हणजे स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 हा मुख्य चिपसेट झाला पण त्यासोबत अजून दोन चिप्स दिल्या आहेत ज्यांना G2 वाय-फाय चिप आणि टच रेस्पॉन्स चिप म्हणतात. G2 वाय-फाय चिप हा चिप तुमच्या मोबाईलमधील नेटवर्क आणि Wi-Fi सिग्नल अजून मजबूत आणि स्टेबल करतो. टच रिस्पॉन्स चिप हा चिप तुमच्या फोनचा टच रिस्पॉन्स आणखी वेगवान करतो. गेमिंगच्या वेळी या दोन्ही चिप्सचा फायदा स्पष्ट जाणवतो. तुम्हाला टच रिस्पॉन्सची स्पीड खूपच स्मूथ आणि फास्ट अनुभव वाटेल.

OnePlus ने खरोखर इतका शक्तिशाली प्रोसेसर दिला आहे की तुम्ही कोणतंही काम करा गेमिंग, व्हिडिओ शूट, फोटो काढणे किंवा दीर्घ वेळ गेमिंग हा फोन अजिबात lag होणार नाही इतका वेगवान प्रोसेसर OnePlus ने दिला आहे. आता गेमिंग करताना फोन गरम झाला तरी त्यासाठीही OnePlus ने खास सुविधा दिल्या आहेत. त्या सुविधांमध्ये 360° Cryo व्हेलोसिटी कूलिंग सिस्टिम आणि त्यासोबत व्हेपर चेंबर सुद्धा दिली आहे. या सर्वांमुळे फोन गरम झाला तर काही मिनिटांतच तो पुन्हा थंड होऊ लागतो

कूलिंग सिस्टिम चा हा विचार करून कंपनीने खूप चांगलं काम केलं आहे कारण इतका शक्तिशाली प्रोसेसर आणि गेमिंगसाठी दिलेले वेगवेगळे चिपसेट्स असल्यामुळे त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी कूलिंग सिस्टिम आणि व्हेपर चेंबर चा वापर करणं आवश्यकच असतं आणि OnePlus ने हे दोन्ही या फोनमध्ये दिले आहेत.

Oneplus 15 Camera Marathi

OnePlus 15 च्या यावेळेस कॅमेरा मॉड्यूल मध्ये बदल करण्यात आला आहे. OnePlus 13 मध्ये तुम्हाला गोल आकाराचा कॅमेरा मॉड्यूल मिळत होता पण आता चौकोनी कॅमेरा मॉड्यूल पाहायला मिळणार आहे. OnePlus ने यामध्ये स्वतः बनवलेला इमेजिंग इंजिन म्हणजेच डीटेलमॅक्स इंजिन देखील दिला आहे.

कॅमेरा मध्ये तुम्हाला 50MP मेन कॅमेरा सोबत Sony IMX906 सेन्सर, 50MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 50MP टेलिफोटो कॅमेरा मिळणार आहे. सेल्फी साठी 32MP camera दिला असून, त्यातही Sony IMX709 सेन्सर देण्यात आला आहे. फोटो क्वालिटी पाहिली तर ती खूपच तपशीलवार, नैसर्गिक, उजळ आणि स्पष्ट दिसून येते.

व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्ही 8K, 4K, 1080p आणि 720p मध्ये करू शकता. फ्रंट कॅमेरा मधून देखील तुम्ही 4K, 1080p आणि 720p मध्ये रेकॉर्डिंग करू शकता. व्हिडिओ क्वालिटी खूपच शानदार येते मग ती रिअर कॅमेरा मधून असो किंवा सेल्फी कॅमेरा मधून.

Oneplus 15 AI Features

AI features तर यात खूप सारे दिले आहेत. तुम्हाला एक-एक करून सांगतो की कोणते AI features यात दिले आहेत आणि ते नेमकं काय करू शकतात हे ही समजावून सांगतो.

  • लाईव्ह गूगल जेमिनी – जेव्हा तुम्हाला काही प्रश्न असतील तेव्हा तुम्ही इथे विचारल्यावर त्याचं उत्तर तुम्हाला लगेच मिळतं.
  • एआय रिमूव्हर – फोटोमधून कोणतीही वस्तू काढायची असेल तर हे काम AI रिमूव्हर सहज करतं.
  • एआय स्कॅन टू PDF – तुमचे documents किंवा फोटो PDF मध्ये कन्व्हर्ट करायचे असतील तर हे AI साधन तुम्ही वापरू शकता. सोबत तुम्हाला यात एआय प्लेलॅब देखील मिळणार आहे, जिथे जितके AI साधने असतील ते तुम्हाला सर्वांच्या आधी वापरायला मिळतात.

OnePlus ने यात एक खास बटण दिलं आहे ज्याला प्लस की असं म्हणतात. हे प्लस की म्हणजे एक शॉर्टकट की जिच्यावर तुम्ही दाबल्यावर कोणतीही अॅप लगेच उघडू शकतं. तुम्हाला वाटलं की बटण दाबताच कॅमेरा उघडला पाहिजे तर ते तुम्ही सेट करू शकता.

यात कोणता ॲप्लिकेशन उघडायचा हे तुम्ही स्वतः सेट करू शकता जसं की डू नॉट डिस्टर्ब, साउंड आणि व्हायब्रेशन, कॅमेरा, टॉर्च, रेकॉर्डर, स्क्रीनशॉट, ट्रान्सलेट इत्यादी. यापैकी तुम्हाला जे हवं ते प्लस की वर ठेऊ शकता.

हे Plus Key फक्त एवढंच नाही करत, तर अजून खूप गोष्टी करू शकते. समजा तुम्ही काही वाचत आहात आणि ते अर्धंच वाचलं बाकीचं वाचायचं राहिलं तर हे बटण दोन वेळा दाबल्यावर तुम्ही ते माइंडस्पेस मध्ये जतन करू शकता आणि नंतर कधीही वाचू शकता. Plus Key थोडे सेकंद दाबून ठेवले तर तुम्ही व्हॉइस नोट वापरू शकता जिथे तुम्ही काही बोलून आणखी माहिती देऊ शकता.

Oneplus 15 बॅटरी

बॅटरी मध्ये हा मोठा बदल आणि सोबत मोठी बॅटरीही दिली आहे. OnePlus 15 मध्ये तुम्हाला चक्क 7300mAh ची बॅटरी मिळणार आहे त्यासोबत रिव्हर्स चार्जिंग आणि 120W चा चार्जिंग अ‍ॅडॉप्टर दिला आहे. OnePlus 13 सोबत तुलना केली तर त्यात 6000mAh ची बॅटरी दिली होती पण आता ब्रँडने एक मोठं अपग्रेड करून OnePlus 15 मध्ये 7300mAh ची बॅटरी दिली आहे.

हे पण वाचा:- तुमच्या मोबाईलवर मेसेज आल्यानंतर शेवटच्या अक्षरावरून कळणार कोणाचा मेसेज आला आहे.

कंपनीने फक्त बॅटरीच नाही वाढवली तर चार्जिंग स्पीड देखील वाढवली आहे. हा फोन किमान 20 ते 40 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होऊ शकतो.

Oneplus 15 specifications marathi फीचर्स आणि किंमत

अल्ट्रा व्हायलेट
इन्फिनिट ब्लॅक
सँड स्टॉर्म
ऑपरेटिंग सिस्टमअँड्रॉइड 15(OxygenOS 16.0)
4 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 6 वर्षे सुरक्षा अपडेट्स
प्रोसेसरस्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 (3nm)
इंटरनल स्टोरेज256 GB
रॅम12 GB
सुरक्षाइन-डिस्प्ले अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर
बॅटरीची क्षमता7300 mAh
अ‍ॅडॉप्टरअ‍ॅडॉप्टर 120W
पोर्ट्सटाइप -C पोर्ट
डिस्प्ले आकार6.78 इंच (गोरिला ग्लास व्हिक्टस 2)
रिझोल्यूशन2772 x 1272 पिक्सेल
पाणी संरक्षणIP65, IP67, IP69, IP69K
डिस्प्ले तंत्रज्ञान1)1-120Hz रिफ्रेश रेट Maximum 165Hz in gaming
2)हाय ब्राइटनेस मोड:- 1800 निट्स
3)FHD+
सेंसर1)प्रॉक्सिमिटी सेन्सर
2)जायरोस्कोप
3)कलर टेम्परेचर सेन्सर
4)ॲक्सेलरोमीटर
5)अॅम्बियंट लाईट सेन्सर
6)इन्फ्रारेड रिमोट कंट्रोल
7)ई-कंपास
8)स्पेक्ट्रल सेन्सर
9)लेझर फोकसिंग सेन्सर
10)हॉल सेन्सर
(oneplus 15 camera marathi)कॅमेरा1)सेल्फी कॅमेरा:- 32 मेगापिक्सेल Sony IMX709
2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल (Sony’s IMX906)+ 50 मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा (S5KJN5) + 50 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा
3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 8K, 4K, 1080P, 720P
ऑडिओस्टीरिओ स्पीकर्स
(oneplus 15 colors)रंग1)सँड स्टॉर्म
2)इन्फिनिट ब्लॅक
3)अल्ट्रा व्हायलेट
कनेक्टिविटी5G
ब्लूटूथ v6.0, Wi-Fi 5, Wi-Fi 6, Wi-Fi 7
(oneplus 15 specifications marathi price)किंमत₹72,999

हा फोन तुम्हाला २ व्हेरियंटमध्ये उपलब्ध करून दिला आहे 12GB + 256GB आणि 16GB + 512GB. दोन्ही व्हेरियंटची (oneplus 15 specifications marathi price ) किंमत वेगळी असणार आहे. 12GB + 256GB तुम्हाला ₹72,999 ला तर 12GB + 256GB ₹72,999 16GB + 512GB हा व्हेरियंट तुम्हाला ₹79,999 ला मिळणार आहे. OnePlus 15 जर तुम्हाला खरेदी करायचा असेल, तर हा फोन OnePlus च्या अधिकृत वेबसाइटवर आणि Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. तिथे जाऊन तुम्ही सहजपणे ऑर्डर करू शकता.

आपण OnePlus 15 कडे जर पाहिलं, तर मला तर हा फोन खूपच आवडलेला आहे. OnePlus ने यावेळेस फक्त हार्डवेअरमध्येच बदल केले नाहीत, तर सॉफ्टवेअरमध्येही खूप चांगली सुधारणा केली आहे. जर आपण OnePlus 13 सोबत तुलना केली तर हे बदल लोकांना नक्कीच आवडणार आहेत मग ते डिझाइन असो, कॅमेरा असो किंवा परफॉर्मन्स.

परफॉर्मन्सकडे पाहिलं तर असे वाटतं की OnePlus ने सर्वात जास्त लक्ष गेमिंगवर दिलं आहे, कारण इतका शक्तिशाली प्रोसेसर आणि सोबत अजून दोन वेगवेगळे चिपसेट खास गेमिंगसाठी देण्यात आलेले आहेत.

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment