वनप्लस ने लाँच केला आहे त्यांचा सर्वात कॉम्पॅक्ट आणि पॉवरफुल फ्लॅगशिप फोन – OnePlus 13s. आजपर्यंत OnePlus चे जितकेही फ्लॅगशिप फोन्स आले आहेत, त्यामधून हा सर्वात स्लिम फोन आहे. OnePlus 13s मध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन ८ एलिट प्रोसेसर मिळतो, जो या मार्केटमधील सर्वात स्वस्त किंमतीत मिळणारा flagship प्रोसेसर आहे. त्यासोबतच जगातील पहिला स्वतंत्र Wi-Fi चिपसेट (Independent Wi-Fi Chipset) सुद्धा यात दिला आहे, जो कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत अत्यंत उत्तम परफॉर्मन्स देतो.
OnePlus 13s डिस्प्ले, कॅमेरा, परफॉर्मन्स
डिस्प्लेकडे पाहिलं तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की व्हिडिओ क्वालिटी इतकी चांगली नसावी, पण तसं अजिबात नाही. कारण OnePlus 13s मध्ये तुम्हाला 6.32 इंचाचा 1.5K ProXDR LTPO डिस्प्ले मिळतो. तुम्ही जर YouTube व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण खरोखरच एका कॉम्पॅक्ट फोनमध्ये एवढे नैसर्गिक आणि रंगीत व्हिडिओ पाहायला मिळतात.
कॅमेरा साठी OnePlus ने या फोनमध्ये 2 वेगवेगळ्या ब्रँडचे सेंसर्स दिले आहेत. OnePlus 13s मध्ये Sony LYT 700 हा मेन कॅमेरा सेंसर आणि Samsung JN5 हा टेलिफोटो कॅमेरा मिळणार आहे. सेल्फीमध्ये 4K शूटिंग देखील मिळणार आहे, म्हणजे फोटो आणि व्हिडिओ खूप चांगले आणि स्पष्ट येणार आहेत.
फोनच्या परफॉर्मन्सकडे येऊ या, यात स्नॅपड्रॅगन 8 एलिट हा प्रोसेसर मिळणार आहे. गेमिंगसाठी हा फोन चांगला सपोर्ट करतो आणि कॉम्पॅक्ट फोनमध्ये असा प्रोसेसर खूप कमी फोनमध्ये आहे. गेमर्ससाठी वनप्लसने यात 4400 मिमी व्हेपोर कूलिंग चेंबर दिले आहे, म्हणजे गेमिंग करताना फोन थंड राहील आणि तुम्ही गेमिंग अगदी स्मूथली करू शकाल.
कॉम्पॅक्ट फोन आहे म्हणजे या फोनची बॅटरी छोटी असेल? नाही, असं काहीच नाही. वनप्लस 13एस मध्ये तुम्हाला 5850 एमएएचची बॅटरी आणि 80W चा अडॅप्टर देण्यात आला आहे. आपण जर बाकीच्या ब्रँड्सच्या कॉम्पॅक्ट फोनकडे पाहिलं तर ते बॅटरी कमी देतात. फोन कॉम्पॅक्ट आहे, पण बॅटरी मोठी आहे यात काहीच संशय नाही.
वनप्लस 13s मध्ये आता तुम्हाला मिळणार आहे प्लस की (Plus Key). ही प्लस की वापरायची असल्यास, तुम्हाला ते बटण दाबून ठेवावं लागेल, ही एक customizable key(स्वतःच्या गरजेनुसार सेट करता येणारी) आहे. तुम्ही हे बटण दाबून ठेवल्यावर खूप साऱ्या शॉर्टकट्स
/ऑप्शन्स तुमच्या स्क्रीनवर दिसतील.
उदाहरणार्थ:-
- आवाज आणि सूचना
- डू नॉट डिस्टर्ब
- कॅमेरा
- टॉर्च
- व्हॉइस रेकॉर्डर
- भाषांतर
- स्क्रीनशॉट
Oneplus 13s AI फिचर्स
अशा अजूनही अनेक युजफुल शॉर्टकट्स तुम्हाला दिसतील. या फोनमध्ये एवढंच नाही तर अजून एक भन्नाट फिचर दिलं गेलं आहे. या फंक्शनला AI प्लस माइंड (Plus Mind) असं म्हणतात. AI प्लस माइंड फंक्शन मुळे तुमचं काम अजून सोपं आणि स्मार्ट होणार आहे. आता हे फंक्शन नेमकं कसं काम करतं ते समजून घेऊया: तुम्ही जर एखादं फोटो किंवा व्हिडीओ पाहत असाल आणि तुम्ही ती Plus Key थोड्या वेळासाठी दाबून ठेवली, तर फोन त्या स्क्रीनवरच्या फोटो किंवा व्हिडीओबद्दलची माहिती ओळखतो आणि त्याचं सारांश (summary) तुमच्या फोनमध्ये सेव्ह करतो.
या फिचरबद्दल अजून बोलायचं झालं, तर AI Plus Mind मध्ये तुम्ही तुमचं कॅलेंडर ऑर्गनाईज करू शकता किंवा एका क्लिकमध्ये तुमच्या समोरची भाषा ट्रान्सलेट देखील करू शकता. OnePlus 13s मध्ये तुम्हाला भरभरून AI फीचर्स मिळणार आहेत, जसे की:
- एआय ट्रान्सलेशन
- एआय कॉल असिस्टंट
- गूगल जेमिनी इंटिग्रेशन
- एआय रीफ्रेम
- एआय डिटेल बूस्ट
- एआय अनब्लर
- एआय रिफ्लेक्शन इरेझर
- एआय नोट्स
हे सगळे फिचर्स या फोनला अजून तगडा आणि स्मार्ट बनवतात. इतकंच नाही, तर कॉम्पॅक्ट फोन असूनही तुम्हाला यात 5,850 mAh ची दमदार बॅटरी मिळते –ही कॉम्पॅक्ट फोनच्या सेगमेंटमधील सर्वात मोठी बॅटरी आहे. म्हणजेच हा फोन शक्तिशाली (Powerful) सुद्धा आहे आणि टिकाऊ(Long-lasting) सुद्धा!
या oneplus 13s marathi मध्ये छोटा धमाका, फोनमध्ये अजून काय फीचर्स आहेत.
Oneplus 13s स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत(oneplus 13s specifications marathi)



| ऑपरेटिंग सिस्टम | अँड्रॉइड 15(OxygenOS) 4 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 6 वर्षे सुरक्षा अपडेट्स |
| प्रोसेसर | स्नॅपड्रॅगन ८ एलिट |
| इंटरनल स्टोरेज | 256 GB |
| रॅम | 12 GB |
| सुरक्षा | इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर |
| बॅटरीची क्षमता | 5850 mAh |
| अॅडॉप्टर | 80W |
| पोर्ट्स | टाइप -C पोर्ट |
| डिस्प्ले आकार | 6.32 इंच (डायनॅमिक एमोलेड 2X) |
| रिझोल्यूशन | 2640 × 1216 पिक्सेल |
| पाणी संरक्षण | नाही |
| डिस्प्ले तंत्रज्ञान | 1)1-120Hz रिफ्रेश रेट 2)हाय ब्राइटनेस मोड:- 1600 निट्स 3)नॉर्मल ब्राइटनेस:- 800 निट्स 4)व्हिडीओ रंग वाढवणारा 5)ब्राइट HDR व्हिडीओ मोड 6)प्रतिमा तीव्रता वाढवणारा |
| सेंसर | 1)प्रॉक्सिमिटी सेन्सर 2)जायरो सेन्सर 3)कलर टेम्परेचर सेन्सर 4)ॲक्सेलरोमीटर 5)लाईट सेन्सर 6)इन्फ्रारेड रिमोट कंट्रोल 7)ई-कंपास |
| कॅमेरा | 1)सेल्फी कॅमेरा:- 32 मेगापिक्सेल 2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल (Sony LYT-700)+ 50 मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा 3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 4K, 1080P, 720P |
| ऑडिओ | 1)ओरियलिटी ऑडिओ 2)नॉइस कॅन्सलेशन सपोर्ट |
| रंग | 1)ग्रीन सिल्क 2)पिंक सॅटिन 3)ब्लॅक व्हेल्वेट |
| कनेक्टिविटी | 5G, 5.5G ब्लूटूथ v6.0, Wi-Fi 7 |
| किंमत | ₹54,999 |
ह्या फोनमध्ये दोन पर्याय मिळणार आहेत – 12 GB + 128 GB आणि 12 GB + 512 GB. तुम्हाला कसा वाटला OnePlus चा (oneplus 13s specifications marathi)हा सगळ्यात कॉम्पॅक्ट आणि शक्तिशाली फोन, कॉमेंट करून नक्की सांगा. पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि LT फॅमिलीचे नवीन सदस्य बना!