सार्वजनिक ठिकाणी फोन चार्जिंगला लावू नका. तुमचा डेटा धोक्यात येऊ शकतो! लावत असाल तर आत्ताच बंद करा लावायचं.

तुम्ही जर तुमचा फोन सार्वजनिक ठिकाणी चार्जिंगला लावला असाल, तर आजपासून ते थांबवा. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण असं केल्यामुळे तुमच्या फोनचा डेटा हॅक किंवा चोरी होऊ शकतो.

आता तुम्ही विचार करत असाल की फोन चार्जिंगला ठेवला तर डेटा कसा चोरी होऊ शकतो? चला, मी तुम्हाला सविस्तर सांगतो की हे कसे घडते.

तर हा एक नवीन प्रकारचा स्कॅम आहे जिथे सार्वजनिक ठिकाणी ठेवलेली चार्जिंग केबल वापरली जाते. जसे की रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट किंवा बसस्टँड सारख्या अनेक सार्वजनिक ठिकाणी असे चार्जिंग केबल लावले जातात आणि त्यामुळे पूर्णपणे तुमचा डेटा चोरी होऊ शकतो.

आपल्याकडे जसे चार्जिंग केबल असते तसंच आणखी एक केबल आहे ज्याला OMG केबल म्हणतात. ती अगदी आपल्या मोबाईलच्या चार्जिंग केबलसारखी दिसते आणि फोनला चार्जही करते.

पण या OMG केबल मध्ये एक वेगळी गोष्ट असते जी आपल्या सामान्य केबलमध्ये नसते — ती म्हणजे एक चिप. होय, या OMG केबलमध्ये एक चिप असते जी तुमचा डेटा हॅक करू शकते.

omg cable hack marathi

तुम्ही जर ही केबल चार्जिंग केबल समजून लावली तर तुमच्या फोनचा पूर्ण डेटा OMG केबलद्वारे चोरी केला जाऊ शकतो. फोनमध्ये जितकीही माहिती असते — फोटो, बँकेची माहिती, लॉगिन आयडी, पासवर्ड आणि मेसेजेस इत्यादी — ही सगळी OMG(omg cable hack marathi) केबलच्या मदतीने हॅकर्सकडे पोहोचू शकते.

हॅकर्स नंतर तुमचा फोन ते वापरू शकतात — मग ते कुठेही असला तरी तुमच्या नावाखाली तो फोन वापरला जाऊ शकतो. सर्वात भयानक म्हणजे तुम्हाला याबद्दल काहीच कळत नसते: तुम्हाला असं वाटतं की फोन फक्त चार्जिंगवर ठेवलेला आहे आणि तो रोज प्रमाणेच चालू आहे, पण प्रत्यक्षात तसा नाही.

फोन सुरक्षित कसा ठेवायचा?

कधीही सार्वजनिक ठिकाणी आधीपासूनच ठेवलेले USB पोर्ट वापरून फोन चार्ज करू नका. तिथे तुमचा फोन कधीही चार्ज करू नका.

जर तुमची बॅटरी कमी असेल आणि त्वरित चार्ज करायचं असेल, तर नेहमी तुमचा स्वतःचा चार्जर व केबल सोबत ठेवा किंवा पावरबँक वापरा.

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे इतरही सावध राहतील. तुम्हाला ही (omg cable hack marathi) माहिती आधी माहीत होती का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नव्या टेक बातम्यांसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला नक्की फॉलो करा.

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment