UIDAI ने केले New Aadhaar App Marathi लॉन्च. आता तुम्ही घरी बसूनच तुमचा पत्ता आणि मोबाइल नंबर बदलू शकता! हे कसं करायचं? ते आत्ताच जाणून घ्या.

New Aadhaar App Marathi

UIDAI(Unique Identification Authority of India) ने नवीन आधार मोबाईल अ‍ॅप लॉन्च केलं आहे. हे अ‍ॅप वाणिज्य व उद्योग तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्या उपस्थितीत 29 जानेवारी 2026 रोजी लॉन्च करण्यात आलं.

UIDAI(युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया) च्या या नवीन अ‍ॅपमध्ये सध्याच्या आधार अ‍ॅपपेक्षा अनेक नवीन आणि वेगळे फीचर्स देण्यात आले आहेत. या नव्या अ‍ॅपमुळे लोकांच्या हातात त्यांच्या वैयक्तिक माहितीचा पूर्ण नियंत्रण असेल. विशेषतःप्रमाणीकरण किंवा पडताळणी साठी लागणारे अधिकार आता पूर्णपणे तुमच्या हातात असतील.

नवीन आधार अ‍ॅपची वैशिष्ट्ये

आता तुम्ही नवीन अ‍ॅपच्या मदतीने आधार कार्डवरील फक्त तुम्हाला हवी तेवढीच माहिती इतरांसोबत शेअर करू शकता पूर्ण आधार कार्ड शेअर करण्याऐवजी. कारण UIDAI ने सुरक्षेला अधिक प्राधान्य दिलं आहे. असं केल्याने तुमच्या आधार कार्डचा कोणीही गैरवापर करू शकणार नाही खास करून हॉटेलसारख्या ठिकाणी जिथे फक्त नाव, मोबाइल नंबर आणि वय यांसारखी मूलभूत माहिती आवश्यक असते.

new aadhaar app marathi

आधार अ‍ॅप मध्ये अजून अनेक नवीन गोष्टी देण्यात आल्या आहेत ज्या प्रत्यक्ष जीवनातील वापरा मध्ये खूप उपयोगी ठरणार आहेत. आता उदाहरणार्थ हॉटेल मध्ये चेक-इन करताना तुम्ही ऑफलाइन पडताळणी हे QR कोड स्कॅनिंग च्या मदतीने करू शकणार आहात.

तसंच सिनेमा तिकिट बुक करताना अ‍ॅपच्या मदतीने तुम्हाला चेहरा पडताळणी आणि वय पडताळणी सारखे पर्यायही उपलब्ध होणार आहेत.

या नवीन अ‍ॅप मध्ये एवढंच नाही तर यासोबत आणखी प्रगत फीचर्स सुद्धा देण्यात आले आहेत. तुम्हाला जर उपस्थितीचा पुरावा साठी विचारलं गेल तर अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही चेहरा पडताळणी करू शकता. तसेच तुमचे बायोमेट्रिक्स तुम्ही एका क्लिक मध्ये लॉक आणि अनलॉक करू शकता.

तुम्ही कुठे कुठे प्रमाणीकरण केलं आहे याची पूर्ण माहिती इतिहास (history) म्हणून अ‍ॅप मध्ये सेव्ह होते. यासोबतच तुम्ही तुमचं संपर्क कार्ड हे क्यूआर कोड मध्ये तयार करू शकता जे तुम्ही कुठेही सोप्या पद्धतीने शेअर करू शकता.

तुम्ही MS Excel रोज वापरता का? मग या शॉर्टकट कीज तुम्हाला नक्कीच माहित असायला हव्यात, ज्यामुळे तुमचा वेळ वाचेल.

सध्याच्या नवीन अ‍ॅप मध्ये आता तुम्ही एका डिव्हाइसवर 5 लोकांचे आधार प्रोफाइल ओपन करू शकता ज्याला “One Family – One Device” असं या कॉन्सेप्टचं नाव देण्यात आलं आहे.

आता लोकांसाठी आणि त्यांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे घरी बसून तुम्ही मोबाइल नंबर आणि पत्ता बदलू शकता का?

new aadhaar app marathi

हो! आता तुम्हाला आधार नोंदणी केंद्र ला जाण्याची गरज नाही. UIDAI च्या या नवीन आधार अ‍ॅपमुळे तुम्ही आता घरी बसून तुम्ही आधार अ‍ॅपच्या मदतीने एका क्लिक मध्ये मोबाइल नंबर आणि पत्ता बदलू/अपडेट करू शकता. पूर्वीसारखं फक्त एक मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी 2–3 वेळा चकरा मारण्याची आता अजिबात गरज नाही.

नवीन आधार अप डाउनलोड कशे करतात? How to download new aadhaar app

हे नवीन आधार अ‍ॅप तुम्ही गूगल प्ले स्टोअर आणि अँपल अ‍ॅप स्टोअर मधून डाउनलोड करू शकता.

Step 1:- तुम्ही जर अँड्रॉइड वापरकर्ता असाल तर गूगल प्ले स्टोअर हे अ‍ॅप उघडा आणि iOS वापरकर्ता म्हणजे तुमच्याकडे iPhone असेल तर अँपल अ‍ॅप स्टोअर उघडा.

Step 2:- अ‍ॅप उघडल्यानंतर सर्च बार मध्ये जाऊन “Aadhaar App By UIDAI” असं टाइप करा.

Step 3 :- आधार अ‍ॅप दिसल्यानंतर Install या पर्यायावर क्लिक करा आणि तुमच्या डिव्हाइसमध्ये हे अ‍ॅप डाउनलोड होण्यास सुरुवात होईल.

Step 4 :- डाउनलोड झाल्यानंतर ते अ‍ॅप उघडा.

Step 5 :- अ‍ॅप उघडल्यानंतर तुम्हाला तुमची भाषा आणि इतर तपशील विचारले जातील. ते तुम्ही अचूकपणे भरा आणि पूर्ण करा.

एकदा तुम्ही सर्व तपशील भरले की तुमचे आधार अ‍ॅप डिजिटल ओळख व्यवस्थापन, पडताळणी आणि अपडेट्स किंवा इतर काही गोष्टींसाठी सुरू होईल. तुम्हाला UIDAI चा हा New aadhaar app marathi कसा वाटला आणि या अ‍ॅप मधील कोणते फीचर तुम्हाला आवडले हे कमेंट करून नक्की सांगा.

अशाच नवीन टेक माहिती साठी आपल्या WhatsApp चॅनेल लेखकाची टिप्पणी ला फॉलो करा आणि सर्वात आधी टेक बातम्या मिळवा.

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment