MS Excel Shortcut Keys Marathi
आज आपण MS Excel मधल्या अशा काही शॉर्टकट कीज पाहणार आहोत ज्या तुम्ही रोज वापरून तुमचा वेळ वाचवू शकता आणि तुमचं काम लवकर पूर्ण करू शकता. तुम्ही जर विद्यार्थी असाल, ऑफिसमध्ये काम करत असाल, शिक्षक असाल किंवा सरकारी कर्मचारी असाल आणि रोज वारंवार MS Excel वापरत असाल तर या (ms excel shortcut keys marathi) शॉर्टकट कीज तुम्हाला नक्कीच माहित असायला हव्यात.
खूप जणांना संगणकातील तांत्रिक शब्द माहिती नसतात जसे की शॉर्टकट की. हा संगणकातील एक तांत्रिक शब्द आहे. याचा अर्थ असा होतो की काही कामांसाठी ठराविक बटणे दाबल्यावर ते काम सोप्या पद्धतीने, कमी वेळेत आणि माऊसला हात न लावता करता येते.
समजा तुम्हाला कोणताही डॉक्युमेंट ओपन करायचा असेल तर त्यासाठी MS Excel मध्ये एक शॉर्टकट की दिली आहे ती म्हणजे Ctrl + N. ही शॉर्टकट की वापरल्यावर तुमच्या स्क्रीनवर लगेच एक नवीन डॉक्युमेंट उघडून येते
चला तर आज तुम्हाला अशाच काही आणखी शॉर्टकट कीज सांगणार आहे आणि त्यासोबत त्या नेमक्या कोणते काम करतात तेही तुम्हाला समजावून सांगतो.
MS Excel Shortcut Keys Marathi
30 shortcut keys of ms excel
| शॉर्टकट कीज (Shortcut Key) | काय काम करते ? |
| Ctrl + N | नवीन डॉक्युमेंट उघडण्यासाठी |
| Ctrl + C | शब्द / अक्षरे कॉपी करण्यासाठी |
| Ctrl + V | कॉपी केलेले शब्द / अक्षरे दुसऱ्या जागी पेस्ट करण्यासाठी |
| Ctrl + Z | चुकून झालेला बदल पूर्ववत (Undo) करण्यासाठी |
| Ctrl + B | कोणतेही अक्षर किंवा शब्द Bold करण्यासाठी |
| Ctrl + S | तुम्ही केलेलं काम संगणक / लॅपटॉपमध्ये सेव्ह करण्यासाठी |
| Ctrl + W | सध्या उघडलेला डॉक्युमेंट / वर्कबुक बंद करण्यासाठी |
| Ctrl + Page Down | पुढील शीट (Sheet)कडे जाण्यासाठी |
| Ctrl + Page Up | मागील शीट कडे जाण्यासाठी |
| F2 | सेल (cell) मध्ये बदल (Edit) करण्यासाठी |
| Shift + F2 | सेलमध्ये कमेंट (Comment) जोडण्यासाठी |
| Shift + F10 + D | सेल (cell) मधील कमेंट हटवण्यासाठी |
| Ctrl + H | शब्द शोधून त्याच्या जागी दुसरा शब्द टाकण्यासाठी |
| Shift + Space | पूर्ण रो (Row) निवडण्यासाठी |
| Ctrl + Space | पूर्ण कॉलम (Column) निवडण्यासाठी |
| Ctrl + Shift + & | निवडलेल्या सेलला आउटलाईन (Border) देण्यासाठी |
| Ctrl + Shift + _ | सेलमधील आउटलाईन (Border) काढण्यासाठी |
| Alt + H + B | बॉर्डर (Border) जोडण्यासाठी |
| Ctrl + Shift + Right Arrow | निवडलेल्या सेलपासून उजव्या बाजूचे सर्व सेल निवडण्यासाठी |
| Ctrl + Shift + Left Arrow | निवडलेल्या सेलपासून डाव्या बाजूचे सर्व सेल निवडण्यासाठी |
| Ctrl + Shift + Down Arrow | निवडलेल्या सेलपासून खालील सर्व सेल निवडण्यासाठी |
| Alt + D | नवीन पिवोत टेबल (Pivot Table) तयार करण्यासाठी |
| Ctrl + K | हायपरलिंक (Hyperlink) जोडण्यासाठी |
| Ctrl + F12 | टेबल उघडण्यासाठी / ऍड करण्यासाठी |
| Ctrl + L | डाव्या बाजूला (Left Align) करण्यासाठी |
| Ctrl + R | उजव्या बाजूला (Right Align) करण्यासाठी |
| Ctrl + E | मजकूर मध्यभागी (Center Align) करण्यासाठी |
| F7 | स्पेलिंग तपासण्यासाठी |
| Tab | पुढील सेलमध्ये जाण्यासाठी |
| Shift + Tab | मागील सेलमध्ये जाण्यासाठी |
| Alt + A | डेटा टॅब उघडण्यासाठी |
| Alt + W | View टॅब उघडण्यासाठी |
| Alt + M | Formula टॅब उघडण्यासाठी |
| Ctrl + Shift + # | दिनांक टाकण्यासाठी |
| Ctrl + Shift + @ | वेळ टाकण्यासाठी |
| Ctrl + Shift + L | डेटा फिल्टर करण्यासाठी |
| Ctrl + P | प्रिंट कमांड डिस्प्ले होण्यासाठी |
Vivo X300 Pro ज्यात 200 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे जो DSLR सारखा वापरू शकता.
तुम्ही हे ms excel shortcut keys marathi शॉर्टकट कीज रोज वापरल्या तर तुमचं काम अजून सोपं होईल आणि वेळही वाचेल. तुम्हाला या शॉर्टकट कीजची PDF हवी असेल तर कमेंटमध्ये PDF असा शब्द लिहा आणि तुम्हाला PDF मिळून जाईल.
अशाच ताज्या-बातम्यां साठी लेखकाची टिप्पणी या WhatsApp चॅनलला फॉलो करा आणि सर्वात आधी टेक बातम्या मिळवा.
