Motorola Razr 60 Ultra सर्वात शक्तिशाली फोल्ड होणारा फोन आहे!!

मोटोरोलाने आता एकामागोमाग एक दमदार फोन्स लॉन्च करायला सुरुवात केली आहे – तेही अगदी साधे नाहीत तर भन्नाट, स्टायलिश आणि फिचर्सने भरलेले! Motorola आता त्यांच्या सर्वात शक्तिशाली फ्लिप फोनची घोषणा केली आहे, ज्याचं नाव आहे Motorola Razr 60 Ultra या फ्लिप फोनमध्ये असं काहीच सोडलं नाही जे द्यायचं राहिलं असावं – परफॉर्मन्स, डिस्प्ले, लुक्स, डिझाइन, सॉफ्टवेअर, AI, कॅमेरा आणि अजून बरंच काही… सगळंच जबरदस्त दिलं आहे!

Razr 60 Ultra च्या डिझाईनकडे पाहिलं तर, मागील बाजूस तुम्हाला वूड फिनिशसारखं काहीतरी दिलं आहे. या बॅक फिनिशला Alcantara फिनिश म्हणतात. Motorola चा दावा आहे की त्यांचा हा फ्लिप फोन ८ लाख किंवा त्याहून जास्त वेळा फ्लिप केला गेला आहे, आणि ही संख्या खूप मोठी आहे. ब्रँडने फोन तयार करण्याआधी पूर्णपणे टेस्टिंग आणि नियोजन केले आहे.

डिस्प्लेला अजून मजबूत बनवले आहे. मागच्या फोनमध्ये ब्रँडने गोरिला ग्लास विक्टस+ दिलं होतं, आणि आता Motorola Razr 60 Ultra मध्ये गोरिला ग्लास सिरॅमिक शील्ड प्रोटेक्शनसह दिलं आहे.

फोटोग्राफीसाठी हा फोन जास्त आवडेल कारण यामध्ये ५० मेगापिक्सेलचे तीन कॅमेरे दिले आहेत. सेल्फी मध्ये पण तुम्हाला ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळणार आहे, म्हणजे तुमच्या फोटो खूप छान येणार आहेत. सेल्फी मोडमध्ये अजून यवढच नाही – Motorola Razr 60 Ultra मध्ये तुम्हाला 8K व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळणार आहे, तसेच सेल्फी कॅमेर्‍यातून तुम्ही 4K व्हिडिओ शूट करू शकता. काही ब्रँड्स आहेत जे सेल्फी कॅमेर्‍यात 4K रेकॉर्डिंग देतात.

स्नॅपड्रॅगन® 8 एलिट हा प्रोसेसर दिला आहे, म्हणजे Motorola Razr 60 Ultra ची परफॉर्मन्स खूप तगडी असणार. मल्टीटास्किंग, गेमिंग किंवा कितीही वेळा अ‍ॅप्स उघडून बंद केले तरी एकदम स्मूथ आणि लाग-फ्री अनुभव मिळणार. Motorola ने बॅटरीचा विचार करून बॅटरीही अपग्रेड केली आहे. 50 Ultra मध्ये आधी ४,००० mAh ची बॅटरी होती, आणि आता 60 Ultra मध्ये ४,७०० mAh ची बॅटरी आहे, सोबत चार्जिंगची स्पीडही वाढवली आहे. याला रिव्हर्स चार्जिंग देखील सपोर्ट आहे.

Motorola razr 60 ultra specs ,स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत

Motorola razr 60 ultra specs marathi
पँटोन रिओ रेड
Motorola razr 60 ultra specs marathi
पँटोन माउंटन ट्रेल
Motorola razr 60 ultra specs marathi
पँटोन स्कॅराब
ऑपरेटिंग सिस्टमअँड्रॉइड 15(Hello UI)
3 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 4 वर्षे सुरक्षा अपडेट्स
प्रोसेसरस्नॅपड्रॅगन® 8 एलिट
इंटरनल स्टोरेज512 GB
रॅम16GB
सुरक्षा1)साइड फिंगरप्रिंट रीडर
2)फेस अनलॉक
बॅटरीची क्षमता4700 mAh
अ‍ॅडॉप्टरवायर्ड चार्जिंग – 68W
वायरलेस चार्जिंग – 30W
रिव्हर्स चार्जिंग – 5W
पोर्ट्सटाइप -C पोर्ट
डिस्प्ले आकार6.96 इंच (
फोल्ड केल्यावर – 4 इंच
रिझोल्यूशन2992 × 1224 पिक्सेल
पाणी संरक्षणIP48 जल-प्रतिरोधक डिझाइन
डिस्प्ले तंत्रज्ञान1)पीक ब्राइटनेस:- 4500 निट्स
2)165Hz पर्यंत रिफ्रेश रेट
3)हाय ब्राइटनेस मोड:- 2000 निट्स
4)HDR10+
सेंसर1)प्रॉक्सिमिटी सेन्सर
2)जायरोस्कोप
3)ई-कंपास
4)फिंगरप्रिंट सेन्सर
5)इन्फ्रारेड (IR) सेन्सर
6)हाल सेन्सर
7)नोटिफिकेशन LED दिवा
8)ॲक्सेलरोमीटर
9)अ‍ॅम्बियंट लाईट सेन्सर
कॅमेरा1)सेल्फी कॅमेरा:- 13 मेगापिक्सेल
2)पाठीचा कॅमेरा:- 108 मेगापिक्सेल + 8 मेगापिक्सेल
3)फुल एचडी रेकॉर्डिंग
4)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 8k, 4k
ऑडिओड्युअल स्टीरिओ स्पीकर्स डॉल्बी अ‍ॅटमॉस® सह
रंग1)पँटोन स्कॅराब
2)पँटोन माउंटन ट्रेल
3)पँटोन रिओ रेड
कनेक्टिविटी5G, 4G, 3G, 2G
ब्लूटूथ v5.4, Wi-Fi 6/6E, Wi-Fi 7
किंमत₹89,999

60 Ultra मधल्या AI फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये उजव्या बाजूला एक AI बटण आहे. त्यावर टॅप केल्यास तुम्हाला विविध पर्याय दिसतात, जसे की रिमाइंडर, नोट्स घ्या, अपडेट, मॅजिक कॅनव्हा इत्यादी. तुम्हाला कसा वाटला हा फोल्डेबल फोन कमेंट करून नक्की सांगा आणि पेजला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा.

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment