Jio ने आणली भन्नाट ऑफर! आता मिळवा ₹35,000 किमतीचा Google Gemini AI Pro प्लॅन अगदी मोफत, तेही 18 महिन्यांसाठी! जाणून घ्या सविस्तर. Jio Google Gemini Pro Offer Marathi
जर तुमच्याकडे जिओ सिम असेल तरच या ऑफरचा लाभ तुम्ही घेऊ शकता. ही ऑफर कोणासाठी आहे, किती दिवसांसाठी आहे आणि ही ऑफर कशी मिळवायची हे मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या खास टेक ऑफर बद्दल.
Google आता संपूर्ण भारतातील ५० कोटी जिओ ग्राहकांना देणार आहे Google Gemini Pro चे सबस्क्रिप्शन तेही अगदी मोफत! Reliance ने Google सोबत भागीदारी करून ही ऑफर फक्त Jio SIM वापरणाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे.
Reliance इंडस्ट्री चे मालक मुकेश अंबानी यांनी असं सांगितलं की, भारताला ते एक AI इंडस्ट्री बनवण्याच्या तयारीत आहेत. म्हणूनच अधिक काळासाठी Reliance ने Google सोबत हातमिळवणी करत ही ऑफर जाहीर केली आहे.
Google आणि Reliance या दोघांच्या करारामुळे भारत हा AI टेक्नॉलॉजीचा बालकिल्ला बनू शकतो कारण Google कडे जगातील सर्वात मोठी AI टेक्नॉलॉजी आहे आणि Reliance कडे मजबूत रीच आणि कनेक्टिव्हिटी नेटवर्क आहे.
Google आणि Alphabet चे मालक सुंदर पिचाई यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की त्यांना या भागीदारीबद्दल खूप उत्सुकता आहे आणि या पार्टनरशिपमुळे भारतात AI चा वापर अधिक प्रमाणात वाढेल असा त्यांचा विश्वास आहे.
जुलै महिन्यात भारतातील टेलिकॉम ऑपरेटर भारती एअरटेल ने सुद्धा अशीच एक ऑफर दिली होती, ज्यात Airtel ने Perplexity सोबत हातमिळवणी करून त्यांच्या ग्राहकांना Perplexity Pro ज्याची किंमत मार्केटमध्ये सुमारे ₹17,000 आहे ही सेवा मोफत दिली होती. या ऑफरला Airtel ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि अनेकांनी त्याचा फायदा घेतला.
तुम्ही पण जर Airtel ग्राहक असाल आणि या ऑफरचा फायदा घेतला असेल, तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला Perplexity हे AI कसं वाटलं आणि जर अजूनही तुम्ही Airtel ग्राहक असाल पण ही ऑफर घेतली नसेल तर airtel perplexity free marathi इथे क्लिक करा आणि ही ऑफर कशी मिळवायची ते सविस्तर जाणून घ्या.
4 नोव्हेंबर 2025 ला एका मोठ्या AI कंपनीने सुद्धा एक खास ऑफर जाहीर केली आहे जी सर्व भारतीय वापरकर्त्यांसाठी पूर्णपणे मोफत आहे. OpenAI जी जगातील सर्वात मोठ्या AI कंपन्यांपैकी एक आहे, त्यांनी त्यांचा ChatGPT Go Plan हा फक्त भारतीयांसाठी मोफत केला आहे. या प्लॅनची किंमत पाहिली तर ती ₹399 प्रति महिना आहे.
Reliance ने या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून एक जबरदस्त स्ट्रॅटेजी तयार केली आणि Google सोबत भागीदारी करून ही नवीन ऑफर लॉन्च केली. सध्या हा प्लॅन बाजारात ₹35,000 किमतीचा आहे पण Reliance ने तो भारतातील 500 मिलियन Jio ग्राहकांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिला आहे.
ग्राहकांना या Jio Google Gemini AI Pro Offer Marathi मध्ये काय मिळणार?
जिओ ग्राहकांना या ऑफरमध्ये खूप सारे AI टूल्स मिळणार आहेत जे तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना त्यांच्या शाळा किंवा कॉलेजच्या अभ्यासासाठी खूप उपयोगी ठरणार आहेत. असं म्हणता येईल की या ऑफरमुळे तुमच्या मुलांना आता पासूनच AI टूल्स कसे वापरायचे हे शिकायला मिळेल.
गूगल जेमिनीमध्ये खूप सारे AI टूल्स दिलेले आहेत जसे की गूगल वन, व्हिओ 3.1, नोटबुक एलएम, गूगल वन 2 टीबी स्टोरेज, गूगल वर्कस्पेस आणि नॅनो बनाना. तुम्हाला हे टूल्स काय करतात हे माहीत असेल तर छानच आहे पण जर माहीत नसेल तर काळजी करू नका मी तुम्हाला प्रत्येक टूल काय काम करते हे अगदी सोप्या भाषेत समजावून सांगतो.
Google Gemini Pro AI टूल्स

नोटबुक एलएम:– Google चे हे एक उत्कृष्ट टूल आहे जे तुमचे डॉक्युमेंट्स, व्हिडिओज, PDF किंवा वेबसाईट वरील माहिती अजून चांगल्या प्रकारे समजावून सांगते आणि ती व्यवस्थित डॉक्युमेंट फॉरमॅटमध्ये सादर करून ठेवते.
व्हिओ 3.1:– Veo 3.1 हे एक असे टूल आहे जे तुम्हाला AI च्या मदतीने व्हिडिओ तयार करून देते. तुम्ही सोशल मीडिया वर पाहिले असेल की लोक AI व्हिडिओ बनवतात तर हेच व्हिडिओ या AI टूलच्या मदतीने बनवले जातात. या व्हिडिओंची क्वालिटी इतकी जबरदस्त आणि रिअलिस्टिक असते की हे AI ने बनवले आहेत हे ओळखणं कठीण जातं.
गूगल वन २ टीबी स्टोरेज:– हा प्लॅन घेतल्यानंतर तुम्हाला 2TB इतकं स्टोरेज मिळणार आहे, ज्यात तुम्ही तुमचे फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे Gmail सुद्धा ठेवू शकता. सध्या Google सर्व वापरकर्त्यांना 15GB स्टोरेज देते पण जिओ ग्राहकांनी हा प्लॅन घेतला तर त्यांना थेट 2TB स्टोरेज मिळेल.
नॅनो बनाना:– Nano Banana हे टूल तुम्हाला AI च्या मदतीने फोटो तयार करून देते. तुम्ही पाहिलं असेल की काही लोक आपले फोटो त्यांच्या आवडत्या हिरो-हिरोईनसोबत किंवा न्यू यॉर्क सारख्या प्रसिद्ध ठिकाणी घेतल्या सारखे बनवतात हे सर्व या AI टूलच्या मदतीने करता येतं.
गूगल वर्कस्पेस:– Gmail, Google Drive, Sheets आणि इतर Google अँप्लिकेशन्स सोबत तुम्ही आता AI चा वापर करू शकता, म्हणजेच कुठल्याही विषयावर लिहायचं असेल, डेटा तयार करायचा असेल किंवा काम अधिक वेगवान करायचं असेल तर AI तुमची मदत करेल.
Jio Google Gemini Pro Offer Marathi Free मोफत मिळण्यासाठी अटी?
1. तुमच्याकडे Jio चे सिम कार्ड असणे आवश्यक आहे आणि त्यासोबत तुमचा रिचार्ज हा प्रीपेड प्लॅन ₹349 चा किंवा त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
2. ऑफर चालू ठेवण्यासाठी तुम्हाला १८ महिन्यांपर्यंत ₹३४९ चा किंवा त्याहून अधिक रिचार्ज करावा लागेल. रिचार्ज केला नाही तर ही ऑफर लगेच बंद होईल.
Jio Google Gemini Pro Offer Marathi Free मोफत घेण्यासाठीची प्रतिक्रिया (How to claim jio google gemini offer):-
स्टेप 1:- तुमच्या स्मार्टफोनमध्ये MyJio हे अॅप असणे आवश्यक आहे. नसल्यास Google Play Store वर जा आणि सर्च बारमध्ये My Jio: For Everything Jio असे टाइप करून ते इंस्टॉल करा.
स्टेप 2:- MyJio हे अॅप ओपन करा. ओपन करताच तुम्हाला एक बॅनर दिसेल ज्यावर 18-Months Pro Plan of Google worth ₹35,000 Free असे लिहिलेले असेल त्या बॅनरवर टॅप करा.
स्टेप 3:- टॅप केल्यानंतर खाली स्क्रोल करा आणि तुम्हाला Claim Now असा ऑप्शन दिसेल — त्यावर क्लिक करा.
स्टेप 4:- क्लिक केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या पेजवर जाल जिथे Activate Plan असा पर्याय दिसेल.
स्टेप 5:- एकदा तुम्ही Activate Plan वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला “You are a Google AI Pro member” असा संदेश दिसेल.
ही सर्व स्टेप्स योग्य प्रकारे फॉलो केल्यानंतर तुम्हाला Google Gemini AI Pro हे 18 महिन्यांसाठी मिळेल. हे सर्व AI Tools तुम्ही एकही रुपया न देता 18 महिन्यांसाठी वापरू शकता.
तुम्हाला ही ऑफर कशी वाटली आणि या ऑफरचा तुम्ही फायदा घेणार का हे कॉमेंट करून नक्की सांगा. माझ्या मते तुम्ही या ऑफरचा नक्कीच फायदा घ्यायला पाहिजे कारण अशी मौल्यवान AI टूल्स मोफत कोणी देत नाही. जग आता वेगाने AI कडे वळत आहे आणि प्रत्येक इंडस्ट्री मध्ये AI चा वापर वाढतच चालला आहे.
ही संधी विशेषतः कॉलेज किंवा शाळेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे, कारण आता पासूनच जर त्यांनी AI बद्दल आणि AI टूल्स कसे वापरायचे हे शिकायला सुरुवात केली, तर भविष्यात ते कोणत्याही क्षेत्रात IT, सेल्स, मार्केटिंग, आर्किटेक्चर किंवा इतर कोणत्याही उद्योगात AI चा वापर प्रभावीपणे करू शकतील.
भेटू या अशाच आणखी एका नवीन टेक माहितीसोबत! आणि जर तुम्ही अजून “लेखकाची टिपणी” परिवारात सामील झालेला नसाल तर आता लगेच सामील व्हा म्हणजे सर्वात आधी नवीन टेक बातम्या थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील.
