IQOO चा एक ऑल राउंडर फोन Sony कॅमेरा,तगडा परफॉर्मन्स आणि मोठी बॅटरी IQOO Z10R तो पण फक्त ₹1_,499

आपल्याला जर फोन घ्यायचा असतो तर जास्त करून लोकांचा बजेट 15,000 ते 20,000 असतो आणि हा प्राइस सेगमेंट खूप इंटरेस्टिंग सुद्धा असतो कारण जास्त करून ब्रँड्स ह्याच रेंजमध्ये फोन लॉन्च करण्याचा प्रयत्न करतात ते पण जास्तीत जास्त फीचर्ससोबत.

ह्याच बजेट सेगमेंटमध्ये iQOO ने त्यांचा ऑलराउंडर फोन लॉन्च केला आहे ज्याचं नाव iQOO Z10R आहे. तुमचं पण बजेट जर 15,000 ते 20,000 च्या मध्ये असेल तर तुम्ही एकदा ह्या फोनला बघितलं पाहिजे. iQOO चा हा अजून एक फोन आहे जो Z सीरिजमध्ये लॉन्च केला आहे, याआधी Z10 आणि Z10x हे Z सीरिजमध्ये लॉन्च केले होते.

आपण जर कधी iQOO ह्या ब्रँडबद्दल बोलायला गेलो तर हे नाव ऐकले की सर्वात आधी आठवतं ते म्हणजे परफॉर्मन्स. फोनचा परफॉर्मन्स खूप उत्तम असतो, पण त्यासोबत बाकीचे फीचर्स जसे की कॅमेरा, बॅटरी, डिस्प्ले यामध्ये थोडी तडजोड करावी लागते. पण आता ह्या फोनकडे पाहून असं वाटत नाही की यात कसली तडजोड केली आहे. कॅमेरा, डिस्प्ले, बॅटरी, परफॉर्मन्स हे सगळं ह्यामध्ये दिलं आहे.

iqoo Z10R 5G डिस्प्ले

iQOO Z10R च्या डिस्प्लेमध्ये तुम्हाला 6.77-इंच FHD+ क्वाड कर्व्ह्ड डिस्प्ले मिळतो आणि त्यासोबत या डिस्प्लेला डायमंड शिल्ड ग्लास प्रोटेक्शन देखील दिलं आहे. तुम्ही जर या फोनवर YouTube व्हिडिओज पाहिले तर डिस्प्लेमध्ये खरंच iQOO ने या फोनमध्ये एक प्रिमियम फील दिला आहे.

iQOO Z10R मध्ये एक खास “SGS Low Blue Light Certification” दिलं आहे. हे विशेषतः त्यांच्यासाठी उपयुक्त आहे जे लोक बराच वेळ फोन वापरतात किंवा मोबाईलवर जास्त वेळ चित्रपट/व्हिडिओ पाहतात. जसं मी आधी सांगितलं, तुम्ही जर जास्त वेळ मोबाईल पाहत असाल तर या सर्टिफिकेशनमुळे तुमच्या डोळ्यांना कमी त्रास होतो.

iqoo Z10R 5G कॅमेरा

कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर iQOO ने या फोनमध्ये Sony चा सेन्सर वापरला आहे. आता यावरून तुम्हाला कळून गेलं असेल की फोटो तर एकदम भारी येणार. iQOO ने Sony IMX 882 सेन्सर आणि सोबत OIS दिलं आहे.

एवढंच नाही तर व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये कसली तडजोड केली नाही, तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये 4K रेकॉर्डिंगचा ऑप्शन दिला आहे फक्त मेन कॅमेऱ्यातून नाही तर सेल्फी कॅमेऱ्यामधून देखील 4K रेकॉर्डिंग करू शकता. या प्राइस रेंजमध्ये खरोखर खूप रेर फोन आहेत जिथे तुम्हाला सेल्फी कॅमेरा आणि मेन कॅमेऱ्यातून 4K रेकॉर्डिंग करता येतं.

iqoo Z10R 5G परफॉर्मन्स, AI फीचर्स

फोनच्या परफॉर्मन्सकडे पाहिलं तर यात MediaTek Dimensity 7400 प्रोसेसर, LPDDR4x RAM आणि UFS 2.2 स्टोरेज मिळतं. प्रोसेसरबद्दल बोलायचं झालं तर या किमतीत म्हणजे २०,००० रुपयांच्या आत असा प्रोसेसर मिळणं ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. iQOO Z10R मध्ये तुम्ही गेमिंगदेखील अतिशय स्मूदली करू शकता.

iQOO Z10R मध्ये AI फीचर्ससुद्धा मिळणार आहेत जसे की एआय इरेज 2.0, एआय फोटो एन्हान्सर, एआय डॉक्युमेंट मोड, सर्चसाठी वर्तुळ, एआय नोट असिस्टंट आणि गूगल जेमिनी. हे सगळे AI फीचर्स तुम्हाला या फोनमध्ये उपलब्ध असतील. तुम्हाला माहिती नसेल पण iQOO Z10R हा आपल्या सेगमेंटमधला सर्वात स्लिम फोन आहे, ज्याची जाडी फक्त 7.39mm आहे.

आता अजून काय-काय फीचर्स आहेत ते पाहण्यासाठी चला आपल्या टेबलकडे, जिथे सर्व माहिती(iqoo z10r specifications marathi) अगदी स्पष्ट भाषेत दिली आहे.

Iqoo Z10R 5g तपशील, फीचर्स आणि किंमत(iqoo z10r specifications marathi)

iqoo z10r specifications marathi
मूनस्टोन
iqoo z10r specifications marathi
iqoo z10r specifications marathi
अक्वामरीन
ऑपरेटिंग सिस्टमअँड्रॉइड 15(Funtouch OS)
2 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 3 वर्षे सुरक्षा अपडेट्स
प्रोसेसरमीडियाटेक डायमेन्सिटी 7400
इंटरनल स्टोरेज128 GB
रॅम8 GB
सुरक्षाइन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर
बॅटरीची क्षमता5700 mAh
अ‍ॅडॉप्टर44W
पोर्ट्सटाइप -C पोर्ट
डिस्प्ले आकार6.77 इंच (एमोलेड डिस्प्ले)
रिझोल्यूशन2392 × 1080 पिक्सेल
पाणी संरक्षणIP68, IP 69 जल-प्रतिरोधक डिझाइन
डिस्प्ले तंत्रज्ञान1)ब्राइटनेस डिस्प्ले:- 1800 निट्स
2)120Hz रिफ्रेश रेट
3)HDR10+
सेंसर1)प्रॉक्सिमिटी सेन्सर
2)ई-कंपास
3)अ‍ॅम्बियंट लाईट सेन्सर
4)ॲक्सेलरोमीटर
5)जायरोस्कोप
कॅमेरा1)सेल्फी कॅमेरा:- 32 मेगापिक्सेल (4K रेकॉर्डिंग)
2)पाठीचा कॅमेरा:- ५० मेगापिक्सेल (Sony IMX882 OIS कॅमेरा) + २ मेगापिक्सेल (बोकेह कॅमेरा)
3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 4K,1080P, 720P
ऑडिओस्टीरिओ स्पीकर्स
रंग1)अक्वामरीन
2)मूनस्टोन
कनेक्टिविटी2G, 3G, 4G, 5G
ब्लूटूथ v5.4, Wi-Fi 6
किंमत₹19,499

कसा वाटला मग तुम्हाला हा ऑल राउंडर फोन? ज्या मध्ये तुम्हाला चांगला कॅमेरा पाहिजे असेल तर तो आहेच, तगडा परफॉर्मन्स पाहिजे असेल तर तोही दिला आहे, मोठी बॅटरी, IP रेटिंग आणि ड्युरेबल डिझाईन सुद्धा मिळणार आहे. आणि हे सगळं फक्त ₹20,000 च्या आत!

तुम्हाला कसा वाटला हा IQOO Z10R? कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करून “लेखकाची टिप्पणी” परिवाराचा भाग व्हा.

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment