आज आपण पाहणार आहोत(iqoo z10 lite specifications marathi), असा फोन जो बजेट सेगमेंट मध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणार आहे. हा फोन म्हणजे iqoo कडून आलेला iQOO Z10 Lite 5G. iqoo ने ह्या फोनला Z10 आणि Z10X ह्या सीरिजमधलाच पुढचा व्हर्जन म्हणून लाँच केलं आहे – म्हणजेच Z10 Lite. ज्यांना ₹10,000 च्या आत 5G फोन घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी iqoo ने एकदम दमदार पर्याय आणला आहे. फोनमध्ये तुम्हाला उत्तम डिस्प्ले, मोठी बॅटरी, ताकदवान प्रोसेसर, आणि सगळ्यात भारी म्हणजे Sony चा कॅमेरा देण्यात आला आहे — आणि हे सगळं फक्त ₹10,000 च्या आत! खरंच, iqoo ने एकदम भारी काम केलं आहे, मिड-सेगमेंटमध्ये फोन घेणाऱ्यांसाठी हा एक मजबूत पर्याय ठरू शकतो आणि बाजारात हे पाऊल ठेवून iqoo ने स्पर्धेला जोरदार टक्कर दिली आहे.
Iqoo z10 lite 5g बॅटरी
फोनबद्दल बोलायचं झालं, तर iQOO Z10 Lite 5G मध्ये तुम्हाला 6000mAh ची मोठी बॅटरी मिळते जी सहज 1 ते दीड दिवस आरामात चालते. आता तुम्हाला असं वाटत असेल की एवढी मोठी बॅटरी दिली आहे म्हणजे फोन जड आणि हातात पकडायला थोडा वजनदार वाटेल, पण असं काहीच नाही! कारण हा फोन फक्त 8.1mm जाडीचा आहे आणि वजन फक्त 202 ग्राम आहे. म्हणजेच दमदार बॅटरी असूनही, फोन स्लिम आणि हातात परफेक्ट फिट बसतो! डिस्प्ले बद्दल बोलायचं झालं, तर या फोनमध्ये तुम्हाला 6.74″ HD+ LCD मिळतो. आपण जर बघितलं, तर बहुतांश ₹10,000 च्या आतले फोन फक्त HD+ डिस्प्ले देतात. पण iQOO Z10 Lite मध्ये मात्र खूपच चांगला डिस्प्ले अनुभव दिला गेलाय.
Iqoo z10 lite 5g कॅमेरा
आता आपल्या सगळ्यांची आवडती गोष्ट म्हणजे —कॅमेरा! या फोनमध्ये तुम्हाला Sony AI कॅमेरा मिळतो, जो तुमचे फोटो सुंदर आणि एकदम clear काढतो. ₹10,000 च्या आत जरी बरेच फोन असले तरी खूप कमी कंपनी आहेत ज्या Sony चा कॅमेरा देतात
. iQOO ने या फोनमध्ये दोन फ्लॅशलाइट दिले आहेत: एक स्टँडर्ड फ्लॅशलाइट जो कॅमेरा च्या बाजूला आहे आणि दुसरा हाय ब्राइटनेस मोड फ्लॅशलाइट, जो कॅमेरा च्या खालच्या बाजूला दिला आहे. माझ्या मते हा या विभाग मधला पहिलाच फोन आहे जिथे तुम्हाला दोन फ्लॅशलाइट चा पर्याय मिळतो.
Iqoo z10 lite 5g प्रोसेसर
आता चला, फोनच्या परफॉर्मन्स कडे लक्ष देऊया: या फोनमध्ये आहे मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर, जो फोनला
स्मूथ चालवतो, कुठलाही हँग न होता. या प्राइसमध्ये हा प्रोसेसर मिळणं ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. iQOO Z10 Lite मध्ये अजून काय फीचर्स आहेत ते आता तुम्हाला टेबल दादा एकदम नीट दाखवून देतील. चला तर मग जाऊयात आपल्या टेबल दादा कडे!
Iqoo z10 lite स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत(iqoo z10 lite specifications marathi)



| ऑपरेटिंग सिस्टम | अँड्रॉइड 15(Funtouch OS) 2 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 3 वर्षे सुरक्षा अपडेट्स |
| प्रोसेसर | मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 |
| इंटरनल स्टोरेज | 128 GB |
| रॅम | 4 GB |
| सुरक्षा | साइड-माउंटेड कॅपेसिटिव फिंगरप्रिंट सेन्सर |
| बॅटरीची क्षमता | 6000 mAh |
| अॅडॉप्टर | 15W |
| पोर्ट्स | टाइप -C पोर्ट |
| डिस्प्ले आकार | 6.74 इंच (एमोलेड डिस्प्ले) |
| रिझोल्यूशन | 1600 × 720 पिक्सेल |
| पाणी संरक्षण | IP64 जल-प्रतिरोधक डिझाइन |
| डिस्प्ले तंत्रज्ञान | 1)ब्राइटनेस डिस्प्ले:- 1000 निट्स 2)90Hz रिफ्रेश रेट 3)फुल एचडी+ LCD |
| सेंसर | 1)प्रॉक्सिमिटी सेन्सर 2)ई-कंपास 3)अॅम्बियंट लाईट सेन्सर 4)ॲक्सेलरोमीटर |
| कॅमेरा | 1)सेल्फी कॅमेरा:- 5 मेगापिक्सेल 2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल Sony AI कॅमेरा + 2 मेगापिक्सेल 3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 1080P, 720P |
| ऑडिओ | स्टीरिओ स्पीकर्स |
| रंग | 1)सायबर ग्रीन 2)टायटॅनियम ब्लू |
| कनेक्टिविटी | 5G, 4G, 3G, 2G ब्लूटूथ v5.4, Wi-Fi 5 |
| किंमत | ₹9,999 |
iQOO Z10 Lite 5G हा फोन लष्करी दर्जाचा प्रमाणित आहे, म्हणजेच जर चुकून तुमच्या हातून खाली पडला, तरी त्याला काही होणार नाही आणि तो तसाच पुन्हा चालू होईल. AI फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, या फोनमध्ये तुम्हाला एआय इरेज फीचर मिळतं — म्हणजेच तुम्हाला फोटोमध्ये जी वस्तू नकोय ती फक्त गोल करून select करा, आणि ती वस्तू फोटोमधून गायब होईल! एआय फोटो एन्हान्स च्या मदतीने तुमच्या फोटोची क्वालिटीही अजून सुधारते.
तुम्हाला या फोनची डिझाईन कशी वाटली? खाली कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवीन लॉन्चसंबंधी माहिती मिळवण्यासाठी WhatsApp Channel ला फॉलो करा आणि पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या लॉन्चसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी रहा!