iQOO चा नवीन स्मार्टफोन लवकरच लॉन्च होणार आहे, जो या सेगमेंटमधला सर्वात वेगवान फोन ठरणार आहे!
यामधील फीचर्स पाहून तुम्हाला खरंच धक्का बसेल! कारण यामध्ये आहे या सेगमेंटमधला सर्वात पॉवरफुल Snapdragon प्रोसेसर, त्याचसोबत iQOO ची खास Supercomputing Q1 Chip आणि LPDDR5X Ultra RAM जी परफॉर्मन्सच्या बाबतीत एक पाऊल पुढे आहे.
जर तुम्हाला गेम खेळायला आवडत असेल तर अजूनही खूपच छान कारण या सेगमेंटमध्ये 144FPS गेमिंग सपोर्ट मिळणार आहे. गेमिंगचा विषय निघालाच आहे तर आता परफॉर्मन्सबद्दल बोलूया. iQOO ने या स्मार्टफोनमध्ये ताकदवान प्रोसेसर दिला आहे – स्नॅपड्रॅगन ८एस जनरेशन ४. त्यासोबत iQOO ने स्वतः तयार केलेला Supercomputing Q1 चिपसेट देखील दिला आहे. हा चिपसेट देण्यात आलेला भारतातील हा पहिलाच फोन आहे आणि Q1 चिपसेट खरोखरच अतिशय शक्तिशाली आहे. गेम खेळताना तुम्हाला जर वाटले की मोबाईल थोडा गरम होतोय, तर त्याची अजिबात काळजी करू नका कारण यात 7K व्हेपर कूलिंग चेंबर दिले आहे, जे खूप मोठे आहे आणि फोन थंड ठेवण्यास मदत करते.
ब्रँड (iQOO) ने कॅमेरामध्ये देखील खूप चांगले काम केले आहे. iQOO Neo 10 मध्ये तुम्हाला Sony IMX882 हा सेन्सर मुख्य कॅमेरामध्ये मिळतो. तुम्हाला जर व्हिडिओ शूट करायला आवडत असेल तर तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे. कारण आपण पाहिले तर खूपच कमी फोन असे आहेत ज्यांच्या सेल्फी कॅमेरामध्ये 4K रेकॉर्डिंगची सुविधा असते. पण हा फोन त्या काही फोनमध्ये मोडतो. iQOO Neo 10 मध्ये तुम्ही 4K 60FPS ने सेल्फी मोडमध्ये शूट करू शकता.
आता आणखी फीचर्स बघण्यासाठी चला जाऊया आपल्या टेबल दादाकडे, जो आपल्याला सगळं अगदी स्पष्टपणे दाखवणार आहे. चला तर मग, सुरू करू
iQOO Neo 10 रिव्ह्यू – किंमत, फीचर्स आणि संपूर्ण माहिती



| ऑपरेटिंग सिस्टम | अँड्रॉइड 15(फनटच १५) 3 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 4 वर्षे सुरक्षा अपडेट्स |
| प्रोसेसर | स्नॅपड्रॅगन ८एस जनरेशन ४ |
| इंटरनल स्टोरेज | 128 GB |
| रॅम | 8 GB |
| सुरक्षा | ऑप्टिकल फिंगरप्रिंट रीडर |
| बॅटरीची क्षमता | 7000 mAh |
| अॅडॉप्टर | 120w |
| पोर्ट्स | टाइप -C पोर्ट |
| डिस्प्ले आकार | 6.78 इंच |
| रिझोल्यूशन | 2800 × 1260 पिक्सेल |
| डिस्प्ले तंत्रज्ञान | 1)5500 निट्स (HBM) ब्राईटनेस 2)144 हर्ट्झ रिफ्रेश रेट 3)एचडी+ |
| सेंसर | 1)ॲक्सेलरोमीटर 2)अॅम्बियंट लाईट सेन्सर 3)प्रॉक्सिमिटी सेन्सर 4)ई-कंपास 5)जायरोस्कोप 6)इन्फ्रारेड |
| कॅमेरा | 1)सेल्फी कॅमेरा:- 32 मेगापिक्सेल 2)पाठीचा कॅमेरा:- 50MP (1/1.953″ Sony Portrait कॅमेरा) + 8 MP (अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा) 3)फुल एचडी रेकॉर्डिंग |
| ऑडिओ | स्टीरिओ स्पीकर्स |
| रंग | 1)टायटॅनियम क्रोम 2)इन्फर्नो रेड |
| कनेक्टिविटी | 5G, 4G ब्लूटूथ v5.4, Wi-Fi 7 |
| किंमत | ₹33,850 |
या फोनचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचा “इन्फर्नो रेड” हा रंग. लाल आणि पांढऱ्या रंगाच्या मिश्रणातून तयार करण्यात आलेला हा शेड फोनला एकदम वेगळा आणि स्टायलिश लुक देतो, ज्यामुळे हा फोन इतरांपेक्षा उठून दिसतो. iQOO Neo 10 चे CEO निपुण मर्या यांनी सांगितले आहे की हा रंग खास करून भारतासाठी डिझाइन करण्यात आला आहे. भारतात सध्या बहुतांश लोकांना ड्युअल टोन कलर्स असलेले फोन खूप आवडू लागले आहेत, हे लक्षात घेऊनच कंपनीने हा खास रंग निवडून फोन लॉन्च केला आहे.
iQOO neo 10 – या सेगमेंटमधला सर्वात फास्ट फोन! म्हणून हा फोन तुम्हाला कसा वाटला? आणि तुम्ही हा फोन खरेदी करण्यास इच्छुक आहात का? कमेंट करून नक्की कळवा!
अशाच नवीन मोबाइल्स लॉन्चबद्दल माहिती मिळवण्यासाठी आताच पेजला सबस्क्राइब करा आणि LT फॅमिलीचा नवीन सदस्य बना.
