iQOO 15 लॉन्च! 6.85” OLED Samsung 2K M14 पॅनल डिस्प्ले, 7000mAh बॅटरी आणि Snapdragon 8 Gen Elite 5 प्रोसेसरसह. संपूर्ण iQOO 15 specs Marathi मध्ये जाणून घ्या.
IQOO 15 Specs Marathi
iQOO ने लॉन्च केला सर्वात दमदार गेमिंग फोन, जो खास गेमर्ससाठी तयार करण्यात आला आहे iQOO 15. हा स्मार्टफोन भारतात 26 नोव्हेंबर 2025 रोजी लॉन्च करण्यात आला होता आणि 1 डिसेंबर 2025 पासून सेल सुरू केला आहे.
ह्यावर्षी अनेक ब्रँड्स खूप सारे स्मार्टफोन्स लॉन्च करत आहेत आणि मोबाईल इंडस्ट्रीमध्ये स्पर्धा वाढत चालली आहे. मागच्या महिन्यातच Oppo Find X9, Realme GT 8 Pro आणि OnePlus 15 हे स्मार्टफोन्सही स्पर्धेत उतरले आहेत.
आता ह्याच स्पर्धेत आणखी जोर आणण्यासाठी iQOO ने उडी मारली आहे. iQOO 15 मध्ये पॉवरफुल प्रोसेसर, मोठी बॅटरी आणि अँड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये पहिल्यांदाच मिळणारा एक दमदार डिस्प्ले दिला जात आहे.
iQOO ने ह्या स्मार्टफोनमध्ये खूप बदल केले आहेत मग ते डिझाईन असो, कॅमेरा असो, परफॉर्मन्स असो किंवा बॅटरी. तर आज आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहणार आहोत आणि मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट अगदी स्पष्ट भाषेत समजावून सांगणार आहे म्हणजे तुम्हाला समजायला अजून सोपं जाईल.
चला तर मग सुरू करूया आजचा iqoo 15 specs marathi चा कार्यक्रम.
IQOO 15 Display (डिस्प्ले)
iQOO ने त्यांच्या या डिस्प्ले मध्ये एक मोठा बदल केला आहे,जो आजपर्यंत कोणत्याही Android फोनमध्ये आलेला नव्हता. Apple आपल्या फोनसाठी जी उच्च दर्जाची डिस्प्ले गुणवत्ता वापरते तसाच प्रीमियम डिस्प्ले यावेळी पहिल्यांदाच iQOO 15 मध्ये Android फोनसाठी मिळणार आहे.
डिस्प्ले विभागात हा Samsung 2K M14 panel असलेला 6.85” OLED डिस्प्ले दिला आहे जो अत्यंत दमदार आहे. या डिस्प्लेमुळे तुम्हाला ब्राइटनेसमध्ये मोठा बदल जाणवेल कारण यात तब्बल 2600 nits हाय ब्राइटनेस मोड दिला आहे. आपण आतापर्यंत पाहिलेल्या बहुतांश स्मार्टफोन्समध्ये 1300 निट्स, 1500 निट्स, 1800 निट्स किंवा कमाल 2000 nits ब्राइटनेस मिळायचा.

तुम्ही या डिस्प्ले वर गेम खेळा किंवा चित्रपट पाहा तुम्हाला पूर्णपणे स्पष्ट क्वालिटी तेजस्वी ब्राइटनेस आणि प्रत्येक रंग झळकून दिसेल. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे हा iQOO चा पहिलाच फोन आहे ज्यामध्ये Anti-Reflection (प्रतिबिंब-प्रतिरोधक) तंत्रज्ञान दिले आहे जे स्क्रीनवरील रिफ्लेक्शन्स कमी करण्याचे काम करते.
आपण जर मागच्या व्हेरियंट iqoo 13 सोबत iqoo 15 च्या डिस्प्ले ब्राइटनेसची तुलना केल तर iQOO 13 मध्ये 1800 nits ब्राइटनेस होता पण iQOO 15 मध्ये तो वाढवून तब्बल 2600 nits हाय ब्राइटनेस मोडe दिला आहे. डिस्प्लेच्या बाबतीत iQOO ने हे एक खूपच छान अपग्रेड दिले आहे.
IQOO 15 Camera (कॅमेरा)
कॅमेरा हा फोनचा सर्वात आवडणारा भाग असतो आणि लोकांना तो खूप आवडतो. अशा दमदार फोनमध्ये तर कॅमेरा आणखी जबरदस्त असणारच. या फोनमध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सेलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो 50MP (Sony IMX921) OIS सह, 50MP 3x टेलिफोटो पेरिस्कोप कॅमेरा (Sony IMX882) सेन्सरसह आणि 50MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा. फोटोबद्दल बोलायचे झाल्यास, फोटो नैसर्गिक, रंगीत, शार्प आणि उत्कृष्ट क्वालिटीमध्ये मिळतात.

व्हिडिओ रेकॉर्डिंगबद्दल बोलायचं झालं तर, या फोनमधून तुम्ही 8K 30FPS मध्ये व्हिडिओ शूट करू शकता आणि सेल्फी कॅमेऱ्यातून 4K 60FPS ने शूट करू शकता. व्हिडिओची क्वालिटी खूपच उत्तम आहे आणि प्रत्येक गोष्ट एकदम स्पष्ट, नैसर्गिक आणि रंगीत कॅप्चर होते.
गेमिंग फोनमध्ये पाहिलं तर कॅमेऱ्यात इतक्या जास्त सुविधा बहुतेक गेमिंग स्मार्टफोन्समध्ये मिळत नाहीत. पण iQOO ने यामध्ये खूप मेहनत घेऊन 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप, OIS आणि Sony चे सेन्सर्स दिले आहेत तसेच 8K 30FPS वर व्हिडिओ शूटही करता येतो. iQOO ने खरोखरच गेमिंगसोबत कॅमेऱ्याचाही विचार करून हा पॉवरफुल स्मार्टफोन तयार केला आहे.
IQOO 15 Processor (प्रोसेसर)
iQOO हा ब्रँड मुख्यतः गेमिंग स्मार्टफोनसाठी ओळखला जातो. iQOO सतत गेमिंग स्मार्टफोन बनवत असतो जे स्मार्टफोन इंडस्ट्री मध्ये धुमाकूळ घालण्याशिवाय राहत नाही. अजून धुमाकूळ आणण्यासाठी iQOO 15 मध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन 8 एलाइट जन 5 प्रोसेसर मिळणार आहे जो एक अत्यंत पॉवरफुल प्रोसेसर आहे.
BGMI किंवा Call of Duty खेळताना तुम्ही 120 FPS वर तर खेळणारच आहात, पण यात तुम्ही 144FPS वर सुद्धा खेळू शकता कारण iQOO ने यात Super सुपर कम्प्युटिंग Q3 चिप दिली आहे. या चिपमुळे गेम खेळताना तुम्ही 144 FPS किंवा त्याहून अधिकवर गेम खेळू शकता आणि गेमप्लेची स्पीडदेखील वाढते.
हे पण वाचा:- WhatsApp च्या नवीन अपडेट मधले फीचर्स तुम्हाला माहिती झाले का? अनुभव करा अजून स्मार्ट वापर!
या चिपसेटमुळे तुमची गेमिंग अगदी स्मूथ आणि बिना लगिंग चे चालते. तुम्ही जर जास्त वेळ गेमिंग करत असाल तर स्मार्टफोन गरम होण्याची शक्यता असते आणि तो खरंच गरम होतो. यासाठी iQOO ने यात इंडस्ट्रीतील सर्वात मोठा 8K सिंगल लेयर VC कूलिंग सिस्टम दिला आहे ज्यामुळे फोन थंड होण्यास मदत होते आणि गेम खेळताना गरमीची समस्या येत नाही.
IQOO 15 Battery (बॅटरी)
iQOO ने बॅटरी मध्ये सुद्धा अपडेट केला आहे. iQOO 13 मध्ये पहिल्यांदा 6000mAh ची बॅटरी मिळत होत पण आता iQOO 15 मध्ये 6000 वरून 7000mAh ची बॅटरी दिली आहे तसेच 100W चा अडॅप्टर आणि रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट मिळतो.
100W अडॅप्टर असल्यामुळे हा फोन अर्ध्या तासात 50% चार्ज होतो आणि 1 तासात 100% चार्ज होतो. बॅटरीमध्ये सुधारणा करणे गरजेचे होते कारण iQOO हा एक गेमिंग स्मार्टफोन म्हणून लॉन्च केला आहे आणि गेमिंग फोन मध्ये परफॉर्मन्सनंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅटरी.
IQOO 15 Specifications (वैशिष्ट्य)


| ऑपरेटिंग सिस्टम | अँड्रॉइड 15(Origin OS) 5 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 3 वर्षे सुरक्षा अपडेट्स |
| प्रोसेसर | स्नॅपड्रॅगन 8 एलाइट जन 5 |
| इंटरनल स्टोरेज | 256 GB |
| रॅम | 12 GB |
| सुरक्षा | अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट सेन्सर |
| बॅटरीची क्षमता | 7000 mAh |
| अॅडॉप्टर | 100W वायरलेस चार्जिंग :- 40W |
| पोर्ट्स | टाइप -C पोर्ट |
| डिस्प्ले आकार | 6.85 इंच (एमोलेड डिस्प्ले) |
| रिझोल्यूशन | 3168 X 1440 पिक्सेल |
| पाणी संरक्षण | IP68, IP69 जल-प्रतिरोधक डिझाइन |
| डिस्प्ले तंत्रज्ञान | 1)पीक ब्राइटनेस मोड:- 6000 निट्स 2)हाय ब्राइटनेस मोड:- 2600 निट्स 3)144Hz रिफ्रेश रेट 4)फुल एचडी |
| सेंसर | 1)प्रॉक्सिमिटी सेन्सर 2)ई-कंपास 3)अॅम्बियंट लाईट सेन्सर 4)ॲक्सेलरोमीटर 5)इन्फ्रारेड 6)जायरोस्कोप |
| कॅमेरा | 1)सेल्फी कॅमेरा:- 32 मेगापिक्सेल 2)पाठीचा कॅमेरा:- 50 मेगापिक्सेल कॅमेरा Sony IMX921 + 50 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड-अँगल + 50 मेगापिक्सेल कॅमेरा Sony IMX 882 3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 8K,4K,1080P, 720P |
| ऑडिओ | ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स |
| रंग | 1)लेजेंड 2)अल्फा |
| कनेक्टिविटी | 5G, 4G, 3G, 2G ब्लूटूथ 6.0, Wi-Fi 7,6,5 |
| किंमत | ₹72,999 |
IQOO 15 Marathi Price
iQOO 15 मध्ये दोन व्हेरियंट्स उपलब्ध करून दिले आहेत. पहिला व्हेरियंट 12GB + 256GB, जो तुम्हाला ₹72,999 ला मिळणार आहे आणि दुसरा व्हेरियंट 16GB + 512GB, जो ₹79,000 ला मिळणार आहे. इतर स्मार्टफोन्स मध्ये ज्यात स्नॅपड्रॅगन 8 एलाइट जन 5 हा प्रोसेसर आहे त्या फोनची किंमत ही या रेंज मध्ये येते.
तर हा होता आपला आजचा मॉन्स्टर गेमिंग स्मार्टफोन iQOO 15. खरंच iQOO ने हा फोन लॉन्च करून गेमर्स आणि त्यांच्या चाहत्यांसाठी एक जबरदस्त अपडेट दिला आहे.
ह्या फोनमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अपडेट करण्यात आले आहे, आणि ते फक्त साधे नाही तर एकदम झकास अपडेट आहे. उदाहरणार्थ प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन 8 एलाइट जन 5, मोठी बॅटरी आणि उत्कृष्ट डिस्प्ले अनुभवासाठी Samsung 2K M14 लेड 6.85″ OLED डिस्प्ले दिले गेले आहे.
तुम्ही iQOO 15 बद्दल काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा, WhatsApp चॅनेल लेखकाची टिप्पणी ला फॉलो करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या स्मार्टफोनची अजून माहिती हवी आहे ते देखील कमेंट करून सांगा मी त्यावर एक स्पष्ट आणि समजण्यास सोपा लेख लिहीन.
