शेवटी Apple ने सर्वांना आवडणारी सिरीज iPhone 17 लॉन्च केली! नवीन डिझाइन, नवीन कॅमेरा आणि नवे अपडेट्ससह.

९ सप्टेंबर २०२५ ला Apple ने त्यांची पुढची iPhone 17 Series लॉन्च केली. या सिरीजमध्ये इतके नवे अपडेट्स आले आहेत जे आजपर्यंत कुठल्याच iPhones मध्ये नव्हते. नवीन डिझाइन, नवीन कॅमेरा, नवीन चिपसेट आणि अजून बरेच काही iPhone 17 Series मध्ये दिलं आहे. Apple Event मध्ये फक्त iPhoneच नाही तर इतर प्रॉडक्ट्सही लॉन्च केले गेलेत जसे की AirPods Pro 3 आणि Apple Watch Series 11. Apple ने केवळ iPhones मध्येच नविन फीचर्स दिलेले नाहीत तर AirPods आणि Apple Watch मध्येही दिले आहेत.

शॉर्टमध्ये सांगायचं तर, AirPods Pro 3 मध्ये आता तुम्हाला Live भाषांतर करता येईल आणि Apple Watch मध्ये तुमचं हायपरटेन्शन व ब्लड प्रेशर मोजता येईल. आणखी कोणते नवे फीचर्स आले आहेत हे जाणून घेण्यासाठी Airpods pro 3 वर लिंकवर क्लिक करा.

आज आपण पाहणार आहोत iphone 17 specs marathi. त्यासोबतचे iPhone 17 Air, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max आणि Airpods Pro 3 या सगळ्यांची स्वतंत्र माहिती तयार केलेली आहे. तुम्हाला ज्या iPhone आणि Airpods बद्दल माहिती हवी आहे त्या त्यांच्या नावावर क्लिक करा.

iPhone 17

iPhone 17 हा खूपच छान आणि टिकाऊ बनवण्यात आला आहे. हा बेस मॉडेल असला तरी फीचर्स मात्र थेट Pro मॉडेल्ससारखे दिले आहेत. डिझाईनच्या बाबतीत मोठा बदल केलेला नाही, तो अगदी iPhone 16 सारखाच दिसतो. पण सर्वात मोठं अपग्रेड जे बेस मॉडेलमध्ये दिलं आहे ते म्हणजे “प्रो मोशन”. होय, आता iPhone 17 च्या बेस मॉडेलमध्येही 120Hz चा रिफ्रेश रेट मिळणार आहे. याआधीपर्यंत सर्व बेस मॉडेल iPhones मध्ये केवळ 60Hz रिफ्रेश रेट असायचा, पण iPhone 17 सिरीजपासून Apple ने पहिल्यांदाच बेस मॉडेललाच 120Hz ने अपग्रेड केलं आहे.

iphone 17 specs marathi

जेव्हा तुम्ही iPhone वापरत नसाल तेव्हा ‘ऑलवेज-ऑन डिस्प्ले’ हे फीचर आपोआप 0Hz वर स्विच होतं. यामुळे तुमच्या फोनची बॅटरी जास्त वेळ टिकते आणि ऊर्जा वाचते. iPhone ला आणखी टिकाऊ बनवण्यासाठी यात सिरेमिक शिल्ड 2 दिलं आहे. त्याला आणखी मजबूत करण्यासाठी 3 पट जास्त स्क्रॅच रेसिस्टन्स देण्यात आलं आहे. दैनंदिन वापरात चुकून फोनवर स्क्रॅच लागतात, पण या नव्या स्क्रीनवर ओरखडे पडणार नाहीत याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.

iphone 17 डिस्प्ले, प्रोसेसर

डिझाईन तर प्रीमियम आहेच, सोबत प्रीमियम अपडेट दिले आहे. iPhone च्या दुनियेत आजपर्यंत कुठल्याही फोनमध्ये हे अपडेट दिलेले नव्हते. हो, iPhone 17 मध्ये पहिल्यांदाच मिळणार आहे 3000 nits ब्राइटनेस, जे Apple च्या इतिहासातलं एक खूप मोठं अपग्रेड आहे. डिस्प्लेच्या बाबतीत पाहिलं तर iPhone 16 प्रमाणेच तुम्हाला 6.3 इंचाचा डिस्प्ले मिळतो. बाकी सगळं डिझाईन आणि फीलही तसंच ठेवण्यात आलं आहे.

iPhone 17 बेस मॉडेलमध्येच तुम्हाला मिळणार आहे एक तगडा परफॉर्मन्स देणारा प्रोसेसर “A19” जो लेटेस्ट 3nm टेक्नॉलॉजीने तयार केला आहे. A19 चिपसेटमुळे iPhone खूपच फास्ट आणि स्मूथ चालणार आहे. तुम्ही जर एक गेमर असाल तर iPhone 17 किंवा iPhone 17 सीरिजमधला कुठलाही फोन तुमच्यासाठीच आहे आणि अजून एक गुड न्यूज म्हणजे गेमिंगला चार चाँद लावण्यासाठी Apple ने यात 120Hz चा रिफ्रेश रेट दिला आहे (जसा मी आधी सांगितला होता) जो गेमिंगसाठी खूप महत्त्वाचा आहे.

मी स्वतःही एक गेमर आहे – प्रो लेव्हलचा नाही, पण मजा म्हणून खेळतो. खेळताना मला या गोष्टींचा थोडाफार अंदाज यायला लागला आहे.

बॅटरीकडे पाहिलं तर iPhone 17 मध्ये तुम्ही 8 तासांपेक्षा जास्त व्हिडिओ प्ले ला सपोर्ट करता, जे खूप मोठं अपग्रेड आहे जर आपण iPhone 16 सोबत तुलना केली तर. कंपनीचा असा दावा आहे की तुमच्या फोनची बॅटरी संपली असेल तर फास्ट वायर्ड चार्जरमुळे फक्त 20 मिनिटांत फोनची चार्जिंग 50% पर्यंत होते.

iphone 17 कॅमेरा

iphone 17 specs marathi

ॲपलचे कॅमेरे तर लाजवाब असतातच, पण यातही कंपनीने अपग्रेड केलं आहे. एकही गोष्ट अशी सोडली नाही ज्यात बदल केला नाही, फक्त डिझाइनला सोडून. iPhone 17 मध्ये एक नवीन कॅमेरा लाँच केला आहे जो सेल्फी मोडसाठी खास आहे आणि त्याला “Center Stage Front Camera” असं नाव दिलं आहे. हा कॅमेरा सेल्फी मोडमध्ये आपोआप आकार(ratio) ठरवतो—फोटोत किती लोक आहेत किंवा ते किती लांब उभे आहेत यानुसार तो फोटो कॅप्चर करतो.

सेल्फी कॅमेऱ्याच्या सेन्सरमध्ये देखील बदल केला आहे. आधी हा सेन्सर आयताकृती(Rectangle) आकाराचा होता, पण आता त्याला चौरस(Square) आकार दिला आहे, ज्यामुळे फोटो काढताना हवेत तसे अँगल्स मिळतील.

आधीच्या iPhones कडे पाहिलं तर त्यामध्ये सेल्फी कॅमेरा 12 मेगापिक्सेलचा मिळतो, मग तो बेस मॉडेल असो किंवा प्रो मॉडेल. पण आता iPhone 17 सिरीजमध्ये तुम्हाला एकदम 18 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे आणि तोही बेस आणि प्रो दोन्ही मॉडेल्समध्ये. खरंच, ॲपलसाठी आणि आपल्यासाठीही हा इव्हेंट कधीच विसरता येणार नाही असा ठरणार आहे, कारण इतके सारे अपडेट्स आपण आजवर कुठल्याच Apple इव्हेंटमध्ये पहिले नव्हते.

iphone 17 स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत(iphone 17 specs marathi)

iphone 17 specs marathi
लॅव्हेंडर
iphone 17 specs marathi
ब्लॅक
iphone 17 specs marathi
सेज
iphone 17 specs marathi
व्हाईट
iphone 17 specs marathi
मिस्ट ब्लू
ऑपरेटिंग सिस्टमiOS 26
प्रोसेसर A19
इंटरनल स्टोरेज256 GB
रॅम
सुरक्षाफेस आयडी
बॅटरीची क्षमताव्हिडिओ प्लेबॅक — ३० तासांपर्यंत
अ‍ॅडॉप्टर40W, 30W
पोर्ट्सटाइप -C पोर्ट
डिस्प्ले आकार6.3 इंच (सुपर रेटिना XDR डिस्प्ले)
रिझोल्यूशन2622 x 1206 पिक्सेल
पाणी संरक्षणIP68 जल-प्रतिरोधक डिझाइन
डिस्प्ले तंत्रज्ञान1)120Hz रिफ्रेश रेट
2)पीक ब्राइटनेस:- 3000 निट्स
3)जास्तीत जास्त ब्राइटनेस:- 1000 निट्स
सेंसर1)हाय डायनॅमिक रेंज जायरो
2)बारोमीटर
3)हाय-जी ॲक्सेलरोमीटर
4)प्रॉक्सिमिटी सेन्सर
5)ड्युअल अॅम्बियंट लाईट सेन्सर्स
कॅमेरा1)सेल्फी कॅमेरा:- 18 मेगापिक्सेल
2)पाठीचा कॅमेरा:- 48 मेगापिक्सेल + 48 मेगापिक्सेल + 12 मेगापिक्सेल (ऑप्टिकल-क्वालिटी 2x टेलिफोटो)
3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 4K, 1080p, 720p
ऑडिओडॉल्बी ऑडिओ
रंग1)व्हाईट
2)मिस्ट ब्लू
3)सेज
4)लॅव्हेंडर
5)ब्लॅक
कनेक्टिविटी5G
ब्लूटूथ 6, Wi-Fi-7
किंमत₹82,900

ॲपलने iPhone 17 च्या स्टोरेजमध्ये एक मोठा बदल केला आहे. iPhone 17 मध्ये आता तुम्हाला 128GB हा पर्याय मिळणारच नाही, कारण ॲपलने तो सेगमेंट बंद केला आहे.

जर तुम्हाला iPhone 17 घ्यायचाच असेल, तर तो थेट 256GB पासूनच सुरू होणार. आणि खरं सांगायचं तर हा ॲपलचा चांगलाच विचार आहे, कारण बहुतांश लोकांना 128GB स्टोरेज पुरेसं वाटत नसे. पण 256GB घ्यायचं म्हटलं की किंमत थोडी जास्त होत असे, त्यामुळे बरेच लोक तडजोड करून 128GB घेतात.

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment