iPhone 17 Pro Marathi! 48 मेगापिक्सेलचे ३ कॅमेरे, १२०Hz रिफ्रेश रेट आणि प्रीमियम डिझाइनसह झाला लॉन्च.

iPhone 17 Pro Marathi

ॲपलने लॉन्च केला आतापर्यंतचा सर्वात अ‍ॅडव्हान्स्ड आणि प्रीमियम आयफोन – iPhone 17 Pro. Apple Event 2025 मध्ये iPhone 17 ही सिरीज लॉन्च झाली आणि त्यात iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max हे आयफोन सादर झाले आहेत. मी आधीच iPhone 17 आणि iPhone 17 Air वर ब्लॉग लिहिला आहे. जर तुम्हाला त्या आयफोनबद्दल माहिती हवी असेल, तर त्या आयफोनच्या नावावर क्लिक करा आणि तुम्हाला सर्व माहिती मिळेल.

iPhone 17 आणि iPhone 17 Air नंतर आज आपण पाहणार आहोत iPhone 17 Pro Marathi. तुम्ही बातम्यां मध्ये पाहिलंच असेल की भारतात ज्या दिवशी हा आयफोन लॉन्च झाला त्या दिवशी लोकांनी हा आयफोन खरेदी करण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.

आता तुम्ही नक्की विचार करत असाल – असं काय आहे या आयफोनमध्ये की लोक एवढ्या मोठ्या रांगा लावून हा आयफोन खरेदी करत आहेत? चला तर मग पाहूया काय आहे नवीन असं iPhone 17 Pro मध्ये!

iPhone 17 Pro कॅमेरा

सर्वात आधी पाहूया कॅमेरा, ज्यासाठी आयफोन प्रसिद्ध आहे. Apple ने iPhone 17 Pro चा कॅमेरा हा हार्डवेअर आणि अॅडव्हान्स्ड कम्प्युटेशनल फोटोग्राफी या दोन्हींचा संगम करून तयार केला आहे, ज्यामुळे फोटो आणि व्हिडिओ अत्यंत दर्जेदार येतात.

Apple चा दावा आहे की iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max मधील कॅमेरा सिस्टम हा आतापर्यंतचा सर्वात उत्कृष्ट असून प्रत्येक कॅमेरामध्ये हाय-रेझोल्यूशन कॅमेरे दिले गेले आहेत.

iphone 17 pro marathi

iPhone 17 Pro च्या रिअर कॅमेऱ्यात आता तुम्हाला ३ कॅमेरे मिळणार आहेत जे ४८ मेगापिक्सेलचे असतील. हे फक्त साधे कॅमेरे नसून फ्यूजन कॅमेरे आहेत – फ्युजन अल्ट्रा-वाइड कॅमेरा, फ्युजन टेलीफोटो कॅमेरा आणि फ्युजन मेन कॅमेरा असे तीन कॅमेरे दिले आहेत.

या कॅमेऱ्यांमुळे प्रत्येक फोटो संपूर्ण डिटेल्ससह आणि अतिशय स्पष्ट येणार आहे, मग तुम्ही कितीही झूम केले तरी फोटोची क्वालिटी कायम राहील.

Plateau (प्लाटेवू)

तुम्ही पाहिलंच असेल की कॅमेऱ्यासाठी आता पूर्ण वेगळी जागा तयार केली आहे ज्याला “Plateau” असं म्हणतात, ज्यामध्ये सगळे ४८ मेगापिक्सेलचे कॅमेरे दिले गेले आहेत. सध्याच्या या कॅमेऱ्यात इतके उत्कृष्ट लेन्सेस दिले आहेत की प्रत्येक फोटो पूर्णपणे स्पष्ट, नैसर्गिक आणि अतिशय सुंदर येतो. फोटोग्राफर्ससाठी तर हा फोन खूपच उत्तम आहे कारण तो एकदम DSLR सारखा फोटो काढू शकतो.

सेल्फी कॅमेऱ्यात आता १८ मेगापिक्सेलचा सेंटर स्टेज कॅमेरा असणार आहे जो ॲपलचा नवीन फ्रंट कॅमेरा आहे. आधी iPhone 16 Pro मध्ये १२ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा मिळत होता आणि आता iPhone 17 Pro मॉडेलमध्ये थेट १८ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

सेंटर स्टेज कॅमेरा आपोआप तुमच्या फोटोचं आकारमान (ratio) ठरवतो आणि फोटोमध्ये किती लोक आहेत किंवा किती जागा आहे त्यानुसार फ्रेम अॅडजस्ट करून फोटो क्लिक करतो

तुम्हाला कदाचित माहित नसेल, पण Apple Event 2025 ची संपूर्ण व्हिडिओ शूटिंग iPhone 17 Pro वरच शूट करण्यात आली आहे. यावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल की व्हिडिओ रेकॉर्डिंग तर जबरदस्त असणार आहे. ॲपलने iPhone 17 Pro मध्ये अनेक नवीन फीचर्स दिली आहेत जसे की डॉल्बी व्हिजन HDR, 4K120, प्रोरेस लॉग लॉग आणि ACES.

iphone 17 pro marathi

ACES हे फीचर तर चित्रपट बनवणाऱ्यांना विशेष आवडलेलं आहे. यावर्षी iPhone 17 Pro मध्ये Pro Video नावाचं खास फीचर देण्यात आलं आहे ज्याला प्रोरेस रॉ कॅप्चर असं म्हणतात. हे फीचर लहान किंवा मोठ्या प्रॉडक्शन हाऊसेसना अगदी सोप्या पद्धतीने वापरता येईल आणि थेट समाकलित/इंटिग्रेट करता येईल.

iPhone 17 Pro परफॉर्मन्स आणि बॅटरी

परफॉर्मन्सच्या बाबतीत iPhone 17 Pro मध्ये अशा काही नव्या गोष्टी देण्यात आल्या आहेत ज्या आजपर्यंत कोणत्याच iPhone मध्ये नव्हत्या. iPhone 17 Pro मध्ये तुम्हाला मिळणार आहे व्हेपर चेंबर. हो! व्हेपर चेंबर फोन गरम झाल्यावर त्यातील उष्णता हळूहळू कमी करण्यासाठी व नियंत्रित ठेवण्यासाठी वापरली जाते.

व्हेपर चेंबर मुळे फोन थंड राहतो आणि आणखी स्मूथ चालतो. विशेषतः तुम्ही गेमिंग करताना किंवा मल्टीटास्किंग करताना तुम्हाला जाणवेल की फोन किती स्मूथ, अगदी माखनासारखा चालतो.

जसे तुम्हाला माहीत असेल की आता iPhone 17 Series मध्ये A19 प्रो चिप देण्यात आली आहे जी ॲपलने आजपर्यंत बनवलेली सर्वात शक्तिशाली चिप आहे. गेम खेळताना तुम्ही A19 Pro प्रोसेसर मुळे आरामात 120 FPS वर गेमिंग करू शकता आणि फोन गरम झाल्यासारखं जाणवणारही नाही, कारण व्हेपर चेंबर फोन थंड ठेवतो. म्हणजे गेमिंग स्मूथ आणि फास्ट होणार, यात काही शंका नाही.

बॅटरीच्या बाबतीत iPhone 17 Pro मध्ये आता 20% जास्त बॅटरी देण्यात आली आहे, मागच्या iPhone 16 Pro च्या तुलनेत.
अ‍ॅडॉप्टर आता 40W चा मिळणार आहे, म्हणजे अर्ध्या तासात सुमारे 50% बॅटरी चार्ज होईल. iPhone 16 Pro मध्ये आधी 30W चा अ‍ॅडॉप्टर होता, पण आता Apple ने थेट 40W अॅडॅप्टर देऊन बॅटरीमध्ये मोठं अपग्रेड केलं आहे.

iPhone 17 Pro स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत.

iphone 17 pro marathi
डीप ब्लू
iphone 17 pro marathi
कॉस्मिक ऑरेंज
iphone 17 pro marathi
सिल्व्हर
ऑपरेटिंग सिस्टमiOS 26
प्रोसेसरA19 Pro
इंटरनल स्टोरेज256 GB
रॅम
सुरक्षाफेस आयडी
बॅटरीची क्षमताव्हिडिओ प्लेबॅक — 31 तासांपर्यंत
अ‍ॅडॉप्टर40W
पोर्ट्सटाइप -C पोर्ट
डिस्प्ले आकार6.3 इंच (सुपर रेटिना XDR डिस्प्ले)
रिझोल्यूशन2622 x 1206 पिक्सेल
पाणी संरक्षणIP68 जल-प्रतिरोधक डिझाइन
डिस्प्ले तंत्रज्ञान1)120Hz रिफ्रेश रेट
2)पीक ब्राइटनेस:- 3000 निट्स
3)जास्तीत जास्त ब्राइटनेस:- 1000 निट्स
4)HDR डिस्प्ले
सेंसर1)LiDAR स्कॅनर
2)हाय डायनॅमिक रेंज जायरो
3)बारोमीटर
4)हाय-जी ॲक्सेलरोमीटर
5)प्रॉक्सिमिटी सेन्सर
6)ड्युअल अॅम्बियंट लाईट सेन्सर्स
कॅमेरा1)सेल्फी कॅमेरा:- 18 मेगापिक्सेल
2)पाठीचा कॅमेरा:- 48 मेगापिक्सेल फ्युजन अल्ट्रा-वाइड कॅमेरा + 48 मेगापिक्सेल फ्युजन टेलीफोटो कॅमेरा + 48 मेगापिक्सेल फ्युजन मेन कॅमेरा
3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 4K, 1080p, 720p
ऑडिओडॉल्बी ऑडिओ
रंग1)सिल्व्हर
2)कॉस्मिक ऑरेंज
3)डीप ब्लू
कनेक्टिविटी5G
ब्लूटूथ 6, Wi-Fi-7
(iphone 17 pro marathi price)किंमत₹1,34,900

iPhone 17 Pro हा या वर्षी ३ व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे आणि व्हेरिएन्टनुसार त्याची किंमत वाढत जाते. iphone 17 pro marathi price बेस मॉडेल 256GB ची किंमत ₹1,34,900 ठेवण्यात आली आहे, तर 512GB व्हेरिएंटची किंमत ₹1,54,900 आहे. सर्वात टॉप व्हेरिएंट म्हणजेच 1TB मॉडेलची किंमत ₹1,74,900 ठेवण्यात आली आहे.

या वर्षी Apple ने iPhone 17 Series मध्ये डिझाईनपासून परफॉर्मन्सपर्यंत अनेक मोठ्या सुधारणा केल्या आहेत. या अपडेट्समुळे iPhone 17 Pro हा आतापर्यंतचा सर्वात जास्त आवडलेला iPhone ठरण्याची शक्यता आहे. तुम्हाला iPhone 17 Pro Max बद्दल काय आवडलं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या Facebook पेज ला फॉलो करायला विसरू नका, म्हणजे नवीन टेक अपडेट्स सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment