iPhone 17 Air Marathi
ॲपलने लॉन्च केला त्यांचा आजपर्यंतचा सर्वात पातळ फोन iPhone 17 Air Marathi. ९ सप्टेंबर २०२५ रोजी हा आयफोन Apple Event 2025 मध्ये लॉन्च करण्यात आला. लॉन्च होण्याच्या महिन्याभर आधीपासूनच या आयफोनची खूप चर्चा सुरू होती – किती पातळ असेल? बॅटरी किती असेल? अजून बरंच काही… पण आता शेवटी हा आयफोन अधिकृतपणे लॉन्च झाला आहे.
ॲपलने याआधी देखील एक पातळ फोन २०१५ मध्ये लॉन्च केला होता, तो म्हणजे iPhone 6. पण iPhone 17 Air हा iPhone 6 पेक्षाही अधिक पातळ आयफोन आहे. आता ॲपलनेही सर्वात पातळ फोनच्या स्पर्धेत उडी मारली आहे. iPhone 17 Air हा आता Samsung Edge 25 आणि Samsung Z Fold 7 यांच्यासोबत स्पर्धा करायला तयार आहे.
चला तर पाहूया iPhone 17 Air किती पातळ आहे ते.

iPhone 17 Air डिस्प्ले
Apple iPhone 17 Air हा फक्त 5.6mm जाडीचा असून वजन फक्त 165 ग्रॅम आहे. खरंच, हा तर खूपच पातळ फोन ठरतो. iPhone 17 Air हा Ceramic Shield सोबत येतो आणि याचा फ्रेम टायटॅनियमचा बनवलेला आहे, ज्यामुळे हा फोन अधिक हलका वाटतो.
डिस्प्ले मध्ये तुम्हाला 6.5-इंच LTPO सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळणार आहे. iPhone 17 series मधला एक मोठा अपडेट जो जवळजवळ प्रत्येक iPhone series मध्ये दिला गेला आहे, तो म्हणजे रिफ्रेश रेट. यातसुद्धा तुम्हाला 120Hz चा रिफ्रेश रेट मिळणार आहे. त्यामुळे मूव्हीज बघताना तुम्हाला यात जबरदस्त मजा येईल कारण प्रत्येक रंग नैसर्गिक आणि ब्राईट दिसणार आहे.
iPhone 17 Air कॅमेरा
Apple आहे तर कॅमेरा दमदार असणारच — शेवटी iPhone चा कॅमेरा आहे. iPhone 17 Air मध्ये यावेळेस तुम्हाला एकच कॅमेरा मिळणार आहे जो 48 मेगापिक्सेलचा असणार आहे. तुम्ही म्हणत असाल की यात टेलिफोटो कॅमेरा नाही, अल्ट्रा वाईड अँगल नाही, पण Apple ने हा कॅमेरा असा डिझाइन केला आहे की यात टेलिफोटो आणि अल्ट्रा वाईड अँगल दोन्हीचे फीचर्स दिलेले आहेत, तसेच ऑप्टिकल झूम सुद्धा मिळणार आहे.

Selfie कॅमेऱ्यात Apple ने पहिल्यांदाच मोठा बदल केला आहे. iPhone 17 series मध्ये आधीचा 12 मेगापिक्सेल कॅमेऱ्याऐवजी आता 18 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे, जो कॅमेरा विभागातील एक मोठं अपडेट आहे.
व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये iPhone 17 Air मध्ये यावेळेस सेंटर स्टेज रेकॉर्डिंग फीचर मिळणार आहे, जे आडवा/हॉरिझाँटल मोड मध्येही रेकॉर्ड करतं. त्याचबरोबर ड्युअल कॅमेरा रेकॉर्डिंग सुद्धा दिलं आहे — म्हणजे समोरचा (rear) कॅमेरा आणि सेल्फी कॅमेरा या दोन्हींचं एकाच वेळी रेकॉर्डिंग करता येणार आहे.
iPhone 17 Air मध्ये तुम्ही आता 4K डॉल्बी व्हिजन मध्ये व्हिडिओ शूट करू शकता, आणि तेही सेल्फी कॅमेऱ्यातून तसेच फ्रंट (rear) कॅमेऱ्यातून.
iPhone 17 Air परफॉर्मन्स
परफॉर्मन्स मध्ये iPhone 17 Series मध्ये यावेळेस एक नवीन प्रोसेसर देण्यात आला आहे. iPhone 17 Air मध्ये Apple चं A19 Pro हे चिपसेट दिलं आहे, जे अत्यंत शक्तिशाली आहे. या प्रोसेसरमुळे तुम्ही गेम्स अगदी स्मूद आणि बिनालॅग खेळू शकता, कारण प्रोसेसर खूपच दमदार देण्यात आला आहे.
नेटवर्क, फाईल ट्रान्सफर किंवा ब्लूटूथ अजून जलद आणि स्थिर बनवण्यासाठी Apple ने iPhone 17 Air मध्ये नवीन N1 वायरलेस चिप दिलं आहे. या चिपमुळे नेटवर्क स्पीड वाढतो, फाईल ट्रान्सफर वेगाने होतं आणि AirDrop ची कनेक्टिव्हिटी रेंजसुद्धा खूप सुधारते.
iphone 17 air marathi स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत.




| ऑपरेटिंग सिस्टम | iOS 26 |
| प्रोसेसर | A19 |
| इंटरनल स्टोरेज | 256 GB |
| रॅम | – |
| सुरक्षा | फेस आयडी |
| बॅटरीची क्षमता | 1)व्हिडिओ प्लेबॅक — 27 तासांपर्यंत 2)व्हिडिओ प्लेबॅक |
| अॅडॉप्टर | 40W, 30W |
| पोर्ट्स | टाइप -C पोर्ट |
| डिस्प्ले आकार | 6.5 इंच (सुपर रेटिना XDR डिस्प्ले) |
| रिझोल्यूशन | 2736 x 1260 पिक्सेल |
| पाणी संरक्षण | IP68 जल-प्रतिरोधक डिझाइन |
| डिस्प्ले तंत्रज्ञान | 1)120Hz रिफ्रेश रेट 2)पीक ब्राइटनेस:- 3000 निट्स 3)जास्तीत जास्त ब्राइटनेस:- 1000 निट्स 4)HDR डिस्प्ले |
| सेंसर | 1)हाय डायनॅमिक रेंज जायरो 2)बारोमीटर 3)हाय-जी ॲक्सेलरोमीटर 4)प्रॉक्सिमिटी सेन्सर 5)ड्युअल अॅम्बियंट लाईट सेन्सर्स |
| कॅमेरा | 1)सेल्फी कॅमेरा:- 18 मेगापिक्सेल 2)पाठीचा कॅमेरा:- 48 मेगापिक्सेल + 12 मेगापिक्सेल (ऑप्टिकल-क्वालिटी 2x टेलिफोटो) 3)कॅमेरा व्हिडीओ रेकॉर्डिंग:- 4K, 1080p, 720p |
| ऑडिओ | डॉल्बी ऑडिओ |
| रंग | 1)व्हाईट 2)मिस्ट ब्लू 3)सेज 4)लॅव्हेंडर 5)ब्लॅक |
| कनेक्टिविटी | 5G ब्लूटूथ 6, Wi-Fi-7 |
| (iphone 17 air marathi price)किंमत | ₹1,19,900 |
iPhone 17 Air तुम्हाला 3 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे – 128GB, 256GB आणि 1TB. 256GB ची किंमत ₹1,39,900 आहे आणि 1TB ची किंमत ₹1,59,900 आहे. Apple ने हा फोन खूप प्रीमियम डिझाईनसह तयार केला आहे यात काही शंका नाही, फोन हातात घेतल्यावर छान अनुभव येतो, पतळा आहे आणि कॅमेराची गुणवत्ता उत्कृष्ट आहे.
काही बाबतीं मध्ये थोडा बदल केला गेला आहे, जसे की स्पीकर, बॅटरी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे किंमत. माझ्या मते, किंमत थोडी जास्त आहे, पण फीचर्स आणि डिझाईनसह तुलना केली तर १ लाखाच्या आसपास अपेक्षित होती.
तुम्हाला Apple iPhone 17 Air बद्दल काय वाटते? कोणता फीचर तुम्हाला सर्वात जास्त आवडला आणि किंमतीबाबत तुमचे मत काय आहे? अशा नवीन लॉन्चसाठी किंवा गॅझेट्ससाठी आमच्या WhatsApp चॅनेलला नक्की फॉलो करा.