इंस्टाग्रामची ही सेटिंग्ज आताच बंद करा(instagram settings marathi)

आपण इंस्टाग्रामवर रील्स बघत असताना आपल्याला मध्येच एखादी जाहिरात दिसते — मग ती हेडफोन्स, मोबाइल किंवा कपड्यांची असू शकते किंवा अजून इतरही कोणत्याही प्रॉडक्ट्सची. जर त्यातलं काही आपल्याला आवडलं, तर आपण त्या रीलमध्ये दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करतो आणि त्या वेबसाईटवर पोहोचतो. काही वेळ आपण तिथे वेळ घालवतो आणि मग पुन्हा रील्स स्क्रोल करायला सुरुवात करतो. आपल्याला वाटतं की आपण त्या वेबसाईटवरून बाहेर पडलो आहोत, पण तसं नसतं.

ते आपला इंस्टाग्रामचा डेटा ट्रॅक करत असतात आणि हे अजिबात सुरक्षित नाहीये. तर हा इंस्टाग्राम डेटा तुम्ही कसा डिलिट करू शकता, आज मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा इंस्टाग्राम डेटा सगळ्या वेबसाइट्सवरूनही डिलिट होईल.

चला तर मग पाहूया हा इंस्टाग्राम डेटा कसा डिलिट करता ते. एकेक स्टेप लक्षपूर्वक फॉलो करा जेणेकरून तुमचा वैयक्तिक डेटा सुरक्षित राहील(instagram settings marathi).

स्टेप 1:- इंस्टाग्राम उघडा आणि आपल्या प्रोफाईलवर जाऊन उजव्या कोपऱ्यातील ३ रेषांवर क्लिक करा.

स्टेप 2:- त्यामध्ये Account Center (अकाउंट सेंटर) या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 3:- Account Center मध्ये गेल्यानंतर “Your Information” (युअर इन्फॉरमेशन) या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 4:- आता “Your Information” मध्ये गेल्यावर “Your activity off Meta Technologies” (युअर ऍक्टिव्हिटी ऑफ मेटा टेकनॉलॉजि) या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 5:- त्या मध्ये गेल्यानंतर Recent Activities (रीसेन्ट ऍक्टिव्हिटी) या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 6:- येथे तुम्हाला दिसेल की कोणत्या वेबसाइट्स तुमचा डेटा ट्रॅक करत आहेत.

स्टेप 7:- आता त्या वेबसाईट्सचा डेटा डिलीट करण्यासाठी Clear previously activity (पूर्वीची अ‍ॅक्टिव्हिटी क्लिअर करा) या पर्यायावर क्लिक करा.

या सगळ्या स्टेप्स फॉलो केल्यावर तुमचं इंस्टाग्राम अकाउंट वेगवेगळ्या वेबसाइट्सने जे काही ट्रॅक केलं असेल, तो सगळा डेटा डिलिट होतो. तुमचा डेटा आता जास्त सुरक्षित होतो.

(instagram settings marathi)माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. अशाच नव्या माहितीसाठी पेजला सबस्क्राइब करा आणि LT फॅमिलीचे सदस्य बना. पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त टिपसह!

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment