Instagram PIP Mode Marathi लवकरच येत आहे! आता रील्स पाहताना मोबाईलवर इतर काम सहज करा. या नव्या फीचरबद्दल सविस्तर जाणून घ्या!
सध्या Instagram त्यांचे एक नवे फीचर लाँच करण्याच्या तयारीत आहे, ज्याला ‘Picture-in-Picture’ असे म्हणतात. हे फीचर सुरू केल्यानंतर तुम्ही तुमचे काम करत असतानाही रील्स पाहू शकणार आहात. सध्या कंपनी हे फीचर टेस्ट करत आहे, त्यामुळे आत्तापर्यंत फक्त कंपनीतील काही लोकांना हे फीचर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या मोडमुळे आता मल्टी-टास्किंग आणखी सोप्या पद्धतीने करता येणार आहे. ‘Picture-in-Picture’ मोडमुळे तुम्ही WhatsApp वर मेसेज पाठवताना, ई-मेल करताना, इंटरनेटवर सर्च करताना किंवा इतर कोणतेही काम करत असताना रील्स पाहू शकणार आहात.
तुमचे काम सुरू असताना रील्स फ्लोटिंग विंडोमध्ये कन्व्हर्ट होतील आणि स्क्रीनच्या एखाद्या कोपऱ्यात प्ले होतील. PIP मोड तुम्ही आधीही पाहिला असेल – YouTube, TikTok किंवा इतर ॲप्सवर, जिथे तुमचे काम सुरू असते आणि सोबत फ्लोटिंग विंडोमध्ये व्हिडिओ प्ले होतो. अगदी तसंच फीचर आता इंस्टाग्राम रील्ससाठी उपलब्ध होणार आहे.

सर्वात आधी हे फीचर एका ॲप रिसर्चरला, ज्याचं नाव Radu Oncescu आहे त्याला दिसलं. त्यानंतर त्याने Threads प्लॅटफॉर्मवर एक स्क्रीनशॉट शेअर केला, ज्यात हा Picture-in-Picture मोड दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी Instagram चे हेड Adam Mosseri यांनी अशी सुविधा येऊ शकते अशी कल्पना दिली होती आणि आता हे टेस्टिंग मोडमध्ये आले आहे. फक्त काही दिवसांत किंवा महिन्यांत आपल्यालाही हा मोड पाहायला मिळेल.
क्रिएटर्ससाठी ही खूप आनंदाची बातमी आहे कारण त्यांच्या रील्सला आता अधिक व्ह्यूज मिळणार आहेत. इंस्टाग्राम युजर्स मल्टिटास्किंग करतानाही रील्स पाहतील, त्यामुळे जितके क्रिएटर्स रील्स बनवतात त्यांच्या व्हिडिओंवर वॉच टाइम देखील वाढताना दिसेल. PIP मोड बंद करायचा असेल तर ते खूप सोपे आहे. फक्त तीन डॉट्सवर क्लिक करा आणि तिथे दिसणारा Picture-in-Picture मोड ऑफ करा.
इंस्टाग्रामने iPad साठी ही केला ॲप लॉन्च.

इंस्टाग्रामने ३ सप्टेंबर २०२५ ला त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम वेबसाईटवरून जाहीर केलं की त्यांनी iPad साठी ॲप लॉन्च केलं आहे. खूप वेळा लोकं प्रश्न विचारत होते की iPad आणि टॅबलेटसाठी ॲप कधी येणार, आणि मग Meta iPad साठी ॲप बनवायला कामाला लागलं.
iPad साठी जे ॲप बनवलं आहे ते अगदी मोबाइल ॲप सारखंच आहे. मोबाइल ॲप मध्ये आपल्याला जेवढे फीचर्स मिळतात ते सगळे iPad च्या इंस्टाग्राम ॲप मध्ये येतात. मोबाइल ॲप मध्ये जसं स्टोरीज वरती येतात तसंच iPad मध्येही त्या वरतीच दिसतील. मग इतर ऑप्शन्स वापरायचे असतील तर ते डाव्या बाजूला दाखवले जातील जसे सर्च, डायरेक्ट मेसेज (DM), एक्सप्लोर आणि नोटिफिकेशन्स.
iPad युजर्ससाठी मोठ्या स्क्रीनवर रील्स पाहण्याचा छान अनुभव येणार आहे. iPad वर रील्स पाहताना आता उजव्या बाजूला कमेंट्सही वाचू शकता. यासोबत कोणासोबत चॅट करत असाल तर डाव्या बाजूला इतर लोकांचे चॅट्ससुद्धा तुम्हाला दिसतील.
Instagram ने हे देखील जाहीर केले आहे की काही दिवसांत टॅबलेटसाठी देखील Instagram ॲप येणार आहे, पण आत्तासाठी ते फक्त iPad साठी लॉन्च केले गेले आहे. iPad साठी हे ॲप फक्त त्या लोकांसाठी आहे ज्यांच्या iPad मध्ये iOS 15.1 किंवा त्यापुढील अपडेट आहे, त्यांनाच हे इन्स्टॉल करता येणार आहे.
