तुम्ही पण दिवसभर इंस्टाग्राम वापरत असाल, पण हे २ फीचर्स तुम्हाला अजूनही माहिती नसतील. चला तर मग, कोणते आहेत हे २ फीचर्स ते जाणून घेऊया!
आता तुम्ही इंस्टाग्रामवर रील्स बघताना यूट्यूबसारखी त्या रीलची स्पीड वाढवू शकता!
आता ते कसं?
इंस्टाग्राम रील्सच्या कोणत्याही एका बाजूला — म्हणजे उजव्या किंवा डाव्या बाजूला — स्क्रीनवर बोट ठेवून(टॅप करून) थोडा वेळ थांबा, तर ती रील 2x गतीने (स्पीडने) प्ले होईल.
आता व्हॉट्सअॅपसारखंच तुम्ही इंस्टाग्रामवरही तुमची लोकेशन शेअर करू शकता!
आता ते कसं?
इंस्टाग्रामवर जाऊन ज्याला लोकेशन पाठवायचं आहे त्याच्या चॅटमध्ये जा. चॅटमध्ये गेल्यावर तुम्हाला एक “+” चिन्ह दिसेल – त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला “Location” हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमची Live Location त्या व्यक्तीसोबत शेअर करू शकता.
अगदी व्हॉट्सअॅपसारखं, आता इंस्टाग्रामवरही!
