Infinix gt 30 pro 5g इन्फिनिक्सचा तगडा गेमिंग स्मार्टफोन — तोही ट्रिगर्ससह!

इन्फिनिक्स ने लॉन्च केला आहे एकदम कूलेस्ट, डेडिकेटेड आणि जबरदस्त गेमिंग स्मार्टफोन — Infinix GT 30 Pro 5G!. हा फोन खास gamers साठी बनवला आहे, ज्यांना गेम खेळायला आवडतं आणि तेही लॅगशिवाय अनुभवायचं आहे. पर्फेक्ट परफॉर्मन्स, ट्रिगर्ससारखी गेमिंग फीचर्स आणि दमदार स्पेसिफिकेशन्स यामुळे हा फोन गेमिंग लव्हर्ससाठी एकदम परफेक्ट आहे!

एवढंच नाही तर Infinix ने गेमर्ससाठी या फोनमध्ये अजून एक खास गिफ्ट दिलं आहे — ते म्हणजेच “ट्रिगर्स”! होय, गेम खेळताना अधिक मजा यावी म्हणून ट्रिगर्स देखील दिले गेले आहेत, ज्यामुळे तुम्हाला प्रो गेमिंगचा अनुभव मिळतो. त्याचबरोबर, RGB स्टाईल लाईट्स म्हणजेच फोनच्या मागच्या बाजूला आकर्षक RGB Lights देखील दिल्या गेल्या आहेत. या लाइट्स गेमिंगच्या अनुभवात चार चाँद लावतात! गेम खेळताना खरी मजा घ्यायची असेल, तर हा फोन म्हणजे सरवात भारी पर्याय आहे!.

infinix gt 30 pro 5g features marathi

Infinix GT 30 Pro 5G या फोनमध्ये तुम्हाला मिळतो जगातला पहिला Dimensity 8350 Ultimate प्रोसेसर, सह LPDDR5X RAM आणि 256GB UFS 4.0 स्टोरेज – म्हणजेच वेगात कोणतीही तडजोड नाही! त्यासोबतच, X Boost AI with E sports Mode, नेटवर्क एन्हान्समेंट, आणि Touch Optimization यामुळे तुम्हाला गेमिंग किंवा मल्टीटास्किंग करताना मिळतो एकदम झकास परफॉर्मन्स. गेम खेळताना हा फोन कधीच गरम होणार नाही, कारण यात आहे 6-लेअर VC कूलिंग सिस्टिम, ज्यामुळे 20% अधिक हीट रिमूव्ह होते — म्हणजेच हिटिंग ची झंजटच नाही! Pro Gamers साठी हा फोन म्हणजे एक परफेक्ट गेमिंग मशीन!.

चला तर मग! आता पाहूया या झकास (Infinix GT 30 Pro 5G features in marathi) फोनमधील अजून कोणते नवीन दमदार फीचर्स आहेत! आणि हे समजून घ्यायला आपण निघूया आपल्या खास टेक तज्ज्ञ टेबल दादाकडे, जे सगळं एकदम स्पष्ट आणि ठामपणे समजावून सांगतात.

Infinix gt 30 pro 5g स्पेसिफिकेशन्स, फीचर्स and किंमत(infinix gt 30 pro 5g features marathi)

infinix gt 30 pro 5g features marathi
ब्लेड व्हाइट
infinix gt 30 pro 5g features marathi
डार्क फ्लेअर
ऑपरेटिंग सिस्टमअँड्रॉइड 15(XOS 15)
2 वर्षे अँड्रॉइड अपडेट्स + 3 वर्षे सुरक्षा अपडेट्स
प्रोसेसरडायमेन्सिटी ८३५० अल्टिमेट
इंटरनल स्टोरेज256 GB
रॅम8GB
सुरक्षाइन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर
बॅटरीची क्षमता5500 mAh
अ‍ॅडॉप्टरवायर्ड चार्जिंग – 45W
वायरलेस चार्जिंग – 30W
पोर्ट्सटाइप -C पोर्ट
डिस्प्ले आकार6.78 इंच (कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i)
रिझोल्यूशन2720 × 1224 पिक्सेल
पाणी संरक्षणIP64 जल-प्रतिरोधक डिझाइन
डिस्प्ले तंत्रज्ञान1)4500 निट्स ब्राईटनेस
2)144 हर्ट्झ रिफ्रेश रेट
3)फुल एचडी+
4)2160 हर्ट्झ तात्काळ टच सॅम्पलिंग रेट
5)TÜV Rheinland लो ब्लू लाईट प्रमाणपत्र
6)2304 हर्ट्झ PWM डिमिंग तंत्रज्ञान
7)ऑलवेज ऑन डिस्प्ले
सेंसर1)G सेन्सर
2)प्रॉक्सिमिटी सेन्सर
3)जायरोस्कोप
4)ई-कंपास
5)व्हायब्रेशन मोटर
6)GT ट्रिगर
7)IR ब्लास्टर
8)प्रकाश सेन्सर
कॅमेरा1)सेल्फी कॅमेरा:- 13 मेगापिक्सेल
2)पाठीचा कॅमेरा:- 108 मेगापिक्सेल + 8 मेगापिक्सेल
3)फुल एचडी रेकॉर्डिंग
ऑडिओस्टीरिओ ड्युअल स्पीकर्स
रंग1)ब्लेड व्हाइट
2)डार्क फ्लेअर
कनेक्टिविटी5G, 4G VOLTE, 4G, 2G
ब्लूटूथ v5.4, Wi-Fi 6
किंमत₹24,999

अजून एक गोष्ट म्हणजे हा फोन क्राफ्टन सर्टिफाइड सुद्धा आहे – म्हणजेच PUBG / BGMI सारख्या गेम्ससाठी खास तपासून मान्यता मिळालेली आहे! हा स्मार्टफोन तुम्हाला दोन व्हेरियंटमध्ये मिळणार आहे – 8GB + 256GB आणि 12GB + 256GB

कसा वाटला मग तुम्हाला हा सर्वात बेस्ट गेमिंग स्मार्टफोन –Infinix GT 30 Pro 5G? कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या पेजला सबस्क्राइब करायला विसरू नका, म्हणजे सर्वात पहिले अपडेट तुमच्यापर्यंतच येईल! चला तर मग, LT Family चा नविन सदस्य बना!

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment