तुमच्या Android फोनची बॅटरी हेल्थ कशी आहे हे कसं बघायचं? आत्ताच या सोप्या पद्धतीने चेक करा

How To Check Mobile Battery Health Marathi

जसं आपण नवीन स्मार्टफोन घेतो तसं रोजच्या रुटीन चार्जिंगमुळे हळूहळू त्या फोनची बॅटरी हेल्थ कमी होत जाते. प्रत्येक Android युजरने आपल्या फोनच्या बॅटरी हेल्थकडे नीट लक्ष देणं गरजेचं आहे. फोनची बॅटरी क्षमता किती आहे, फोन किती वेळ चार्जिंगला ठेवायचा आहे, हे सगळं युजरला माहीत असणं आवश्यक आहे.

म्हणून आपण सर्वांनी आपल्या फोनच्या बॅटरी हेल्थकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्हाला बॅटरी हेल्थ आणि बॅटरी क्षमता यांचं अर्थ आणि दोन्हींमधला फरक माहीत नसेल तर तो मी तुम्हाला पुढे सोप्या आणि स्पष्ट भाषेत समजावून सांगतो.

बॅटरी हेल्थ म्हणजे सध्या तुमच्या फोनची बॅटरी किती चांगल्या स्थितीत आहे हे दर्शवणं. म्हणजेच नवीन फोन घेतला तेव्हा जशी बॅटरी होती त्याच्या तुलनेत आत्ताची बॅटरी कशी काम करते आहे हे बॅटरी हेल्थ मधून कळतं.

बॅटरी क्षमता म्हणजे तुमच्या फोनच्या बॅटरीमध्ये एकूण किती ऊर्जा साठवता येते. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या गाडीच्या टाकीत किती लिटर पेट्रोल भरता येतं ती तिची क्षमता असते तसंच फोनच्या बॅटरीची क्षमता म्हणजे ती किती ऊर्जा साठवू शकते.

आज आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमच्या अँड्रॉइड फोनची बॅटरी कशी आहे हे कसं पाहू शकता. यासोबतच वेगवेगळ्या ब्रँड्स च्या फोनमध्ये बॅटरी कशी आहे याची माहिती कशी पाहायची तेही मी तुम्हाला सांगणार आहे.

Vivo फोनची बॅटरी हेल्थ कशी बघायची? How to check mobile battery health in vivo

सध्या Vivo आणि iQOO फोनमध्ये OriginOS 6 चा अपडेट आला असेल तर Settings मधील अ‍ॅपचा लेआउट थोडासा बदललेला असू शकतो. पण बॅटरी हेल्थ कशी चेक करायची याची प्रक्रिया मात्र तशीच असते. तुमच्याकडे जुना Vivo किंवा iQOO स्मार्टफोन असेल, तर त्यामध्ये बॅटरी हेल्थ हा पर्याय दिसेलच असं नाही.

Step 1:- फोनमध्ये Settings अ‍ॅप ओपन करा.

Step 2:- Settings उघडल्यानंतर Battery या पर्यायावर क्लिक करा.

Step 3:- त्यानंतर Battery Health and Charging या पर्यायावर क्लिक करा.

Step 4:- Battery Health and Charging वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Maximum Battery Capacity हा पर्याय दिसेल. तिथे पाहिल्यावर तुमच्या फोनची बॅटरी हेल्थ कशी आहे हे तुम्हाला कळेल.

Samsung फोनची बॅटरी हेल्थ कशी बघायची? How to check mobile battery health in samsung

Samsung फोनमध्ये बॅटरी हेल्थ पाहण्याचा पर्याय दिला आहे पण तो One UI 7 किंवा त्यानंतरच्या operating system मध्येच उपलब्ध आहे.

Step 1:- Settings अ‍ॅप ओपन करा.

Step 2:- तिथे Battery या पर्यायामध्ये जा.

Step 3:- Battery मध्ये गेल्यानंतर खाली स्क्रोल करा. तिथे तुम्हाला “Battery Information” हा पर्याय दिसेल जिथे तुमच्या फोनची Battery Health कशी आहे हे पाहता येईल.

Redmi फोनची बॅटरी हेल्थ कशी बघायची? How to check mobile battery health in redmi

Redmi आणि Poco या दोन्ही brands च्या स्मार्टफोन्समध्ये एकच सॉफ्टवेअर वापरला जातो ज्याला HyperOS असं म्हटलं जातं. सॉफ्टवेअर एकसारखं असल्यामुळे बॅटरी हेल्थ कशी चेक करायची याची पद्धतही दोन्ही फोन्स मध्ये सारखीच असते.

तुमच्याकडे जर जुना Redmi किंवा Poco स्मार्टफोन असेल तर त्यामध्ये हा पर्याय दिसेलच असं नाही. फक्त ज्या फोन्स मध्ये MIUI 12.5 किंवा त्यानंतरचं ऑपरेटिंग सिस्टिम आहे त्यांनाच हा ऑपशन उपलब्ध आहे.

Step 1:- Poco किंवा Redmi फोनमध्ये Settings अ‍ॅप ओपन करा.

Step 2:- Settings उघडल्यानंतर खाली स्क्रोल करा आणि Battery हा पर्याय निवडा.

Step 3: Battery या ऑपशन मध्ये गेल्यानंतर “Battery Protect” हा पर्याय निवडा.

Oneplus फोनची बॅटरी हेल्थ कशी बघायची? How to check mobile battery health in oneplus marathi

Oppo, Realme आणि OnePlus या तिन्ही brands च्या स्मार्टफोन्समध्ये एकच ColorOS वापरला जातो. त्यामुळे Battery Health चेक करण्यासाठीच्या स्टेप्सही तिन्ही फोनमध्ये सारख्याच असतात.

तुमच्याकडे जर OnePlus चा जुना स्मार्टफोन असेल, तर त्यामध्ये बॅटरी हेल्थ हा पर्याय दिसणार नाही. हे feature OnePlus 11 series नंतरच्या स्मार्टफोन्समध्ये देण्यात आलं आहे. तरीही, जर तुमच्या फोनमध्ये हा पर्याय दिसत नसेल तर तुमच्या स्मार्टफोन मध्ये अजूनही हे feature उपलब्ध करून दिलेलं नाही असं समजावं.

Step 1: सर्वात आधी तुमच्याकडे असलेल्या Oppo, Realme किंवा OnePlus स्मार्टफोनमध्ये Settings अ‍ॅप उघडा.

Step 2: खाली स्क्रोल करा आणि Battery या पर्यायावर क्लिक करा.

Step 3:- Battery वर क्लिक केल्यानंतर Battery Health हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

Step 4: तिथे तुम्हाला “Maximum Capacity” या ठिकाणी तुमच्या फोनची Battery Health किती आहे हे “percentage” मध्ये दिसून येईल.

Infinix फोनची बॅटरी हेल्थ कशी बघायची? How to check battery health in infinix marathi

Infinix या ब्रँड् ने सुद्धा बॅटरी हेल्थ पाहण्याचा पर्याय दिला आहे. ज्या स्मार्टफोन्समध्ये Android 15 (XOS 15) आहे त्याच स्मार्टफोन्स मध्ये हा पर्याय दिसतो उदा. Infinix Note 50x आणि Infinix Note 50s. मात्र सगळ्या Infinix स्मार्टफोन्स मध्ये हे feature उपलब्ध नसतं.

Step 1: तुमच्या Infinix स्मार्टफोनमध्ये Settings अ‍ॅप उघडा.

Step 2: त्यानंतर Battery & Power या पर्याय वर क्लिक करा.

Step 3: पुढे Battery Health & Charging या पर्या वर जा.

Step 4: त्यानंतर सर्वात पहिला पर्याय Battery Health दिसेल त्यावर क्लिक करा.

Step 5: तिथे तुम्हाला “Maximum Battery Capacity” दिसेल आणि त्याच ठिकाणी percentage च्या माध्यमातून तुमच्या फोनची Battery Health किती आहे हे कळेल.

Google फोनची बॅटरी हेल्थ कशी बघायची? How to check battery health on google pixel

Google युजर्ससाठी Google Pixel 8 series नंतरचे स्मार्टफोन्स किंवा Android 16 मध्ये बॅटरी हेल्थ पाहण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

Step 1:- सर्वात आधी Settings अ‍ॅप ओपन करा.

Step 2:- त्यानंतर Battery या पर्यायावर क्लिक करा

Step 3:- Battery वर क्लिक केल्यानंतर Battery Health हा पर्याय दिसेल तो ओपन करा.

Step 4:- तिथे तुम्हाला Battery Capacity असा पर्याय दिसेल. त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या फोनची Battery Health पाहू शकता.

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment