तुमचं Instagram(इंस्टाग्राम) अकाउंट कोणी दुसरं वापरत आहे का? जाणून घ्या!

“तुमचं इंस्टाग्राम अकाउंट अजूनही कोणाच्या फोनवर लॉगिन आहे का? (how to check if my instagram account is hacked marathi)

जर हो, तर तुमचं अकाउंट धोक्यात असू शकतं!” काही जण आपलं इंस्टाग्राम अकाउंट हॅक करून त्यांच्या इंस्टाग्रामवर आपलं अकाउंट लॉगिन करतात.

बर्‍याचदा आपण समजून आपल्या मित्र/मैत्रिणींशी चॅट करत असतो, काही माहिती गोळा करत असतो किंवा आपले फोटो आणि रील्सही त्यांच्या कडे पोहोचतात.

कधी तरी आपण आपलं इंस्टाग्राम अकाउंट कुठेही लॉगिन करतो आणि आपल्याला लक्षात राहत नाही, जसं की दुसऱ्याच्या फोनवर, संगणकावर किंवा लॅपटॉपवर. म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे की, तुमचं इंस्टाग्राम अकाउंट कुठल्या डिव्हाइसेसवर लॉगिन आहे आणि ते कसं काढायचं. चला तर मग बघूया.

instagram(इंस्टाग्राम) logout from all devices android (how to check if my instagram account is hacked marathi)

स्टेप 1:- इंस्टाग्राम हे अ‍ॅप ओपन करा.

स्टेप 2:- त्यानंतर तुमच्या प्रोफाइलवर जा.

स्टेप 3:- प्रोफाइलमध्ये गेल्यानंतर ३ लाईन्स (तीन रेषा) वर क्लिक करा.

स्टेप 4:- ३ लाईन्सवर क्लिक केल्यावर “Account Center” या ऑप्शनवर क्लिक करा.

स्टेप 5:- “Account Center” मध्ये गेल्यावर “Logging in with accounts” या ऑप्शनवर क्लिक करा.

स्टेप 6:- आता तुमच्या अकाउंटवर क्लिक करा आणि तुम्ही पाहू शकता की कोणत्या फोनवर किंवा डिव्हाइसवर लॉगिन केले आहे.

आता तुम्हाला कळून गेलं असेल की तुमचं Instagram अकाउंट कुठे-कुठे लॉगिन केलं आहे. जर तुम्हाला ते अकाउंट एखाद्या डिव्हाइसवरून काढायचं असेल, तर तिथे “Log Out” हा एक पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा आणि तुमचं अकाउंट त्या डिव्हाइसवरून लॉगआउट होईल.

माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. अशाच नव्या टिप्स आणि ट्रिक्स संदर्भात अजून माहिती हवी असल्यास पेजला सबस्क्राइब करा — म्हणजे सगळ्यात आधी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल!

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment