आता तुमच्या मित्र, मैत्रीण, भाऊ, बहीण, आई, बाबा आणि इतर सगळ्या नातेवाइकांच्या नावाने वाढदिवसाचं खास गाणं तयार करता येईल! आपल्याला आपले जवळचे लोक खूप आवडतात –जेंव्हा त्यांचा वाढदिवस असतो , तेंव्हा आपण काय करतो? स्टेटस ठेवतो, फोन करतो, केक घेऊन त्यांच्या घरी जातो आणि सर्वांनी मिळून सेलिब्रेट करतो – बरोबर ना?
पण आता आपण आपल्या जवळच्या व्यक्तींच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना अजून खास आणि खुश करू शकतो! कसं? थांबा… सांगतोच! आता आपण त्यांच्याच नावाचं वाढदिवसाचं गाणं बनवू शकतो! आणि हे गाणं ऐकून त्यांचा आनंद दुप्पट होणार, याची खात्री आहे! मला माहीत आहे, तुम्ही कधीच असं काही केलं नसेल… पण आता यापुढे – ज्यांना तुम्ही खूप जवळचं समजता – त्यांना नाव घेऊन खास गाणं बनवून wish करा मग बघा… ते किती खुश होतात ते!
चला तर मग, आता बघूया की हे “Happy Birthday Song with Name” कसं बनवायचं ! फक्त खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
स्टेप 1:- तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमधून Google Chrome ओपन करा.
स्टेप 2:- त्यानंतर, सर्च बारमध्ये टाइप करा – “1happybirthday”
स्टेप 3:- सर्च केल्यानंतर जो 1happybirthday.com ह्या नावाचा लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.
स्टेप 4:- आता त्या वेबसाईटवर, ज्याच्या नावाचं वाढदिवसाचं गाणं बनवायचं आहे, ते नाव टाका.
स्टेप 5:- तुम्ही नाव सर्च केल्यावर तिथे ते नाव दिसेल, मग त्या नावावर क्लिक करा.
स्टेप 6:- थोड्याच वेळात, तुमच्यासमोर त्या नावासह Happy Birthday Song दिसेल
स्टेप 7:- आता त्या पानावर तुम्हाला 2 पर्याय दिसतील: Download Song (Android only) Play Birthday Song.
स्टेप 8:- जर तुम्हाला गाणं आधी ऐकून बघायचं असेल, तर “Play Birthday Song” वर क्लिक करा. आणि जर गाणं मोबाईलमध्ये डाऊनलोड करायचं असेल, तर “Download Song” वर क्लिक करा.
आता हे गाणं तुम्ही WhatsApp status, Instagram story, किंवा Reels मध्ये वापरू शकता. कशी वाटली मग ही भन्नाट आयडिया जी तुमच्या खास लोकांना अजून खुश करेल.
