जर तुम्हाला आता काही ऑर्डर करायचं असेल, तर पत्ता टाकायची गरजच नाही! कारण सरकारनं सुरू केलं आहे नवीन अॅड्रेस सिस्टीम — डिजीपिन. आता हा डिजीपिन म्हणजे नेमकं काय? चला तर मग, अगदी सोप्या भाषेत सांगतो. सरकारनं खूपच उपयोगी अशी एक कल्पना सादर केली आहे — डिजीपिन.
आपण जेव्हा एखादी वस्तू ऑनलाइन मागवतो, तेव्हा आपल्या पत्त्यात एक पिनकोड असतो, बरोबर ना?
पण पिनकोडमुळे काय होतं , तर त्यात बरंच मोठं क्षेत्र — म्हणजे अनेक गावे किंवा भाग यांचा समावेश होतो. त्यामुळे कधी कधी अचूक पत्ता मिळणं कठीण जातं.
पण जसं तुम्ही लाइव्ह लोकेशन शेअर करता , तसं डिजीपिन काम करतं — म्हणजे तुमच्या घराच्या अचूक लोकेशनचा एक युनिक कोड तयार होतो. बर्याच वेळा असं होतं की पार्सल घेऊन आलेल्या व्यक्तीला तुम्ही कुठे आहात ते सापडत नाही, मग ते फोन करून विचारतात. पण डिजीपिन मुळे हे सगळं टळणार आहे. एकदा तुम्ही तुमचा डिजीपिन दिला की पार्सल थेट तुमच्या दारात!
आता हा डिजीपिन नेमका शोधायचा कसा(digipin marathi)?
जर तुम्हाला तुमचा डिजीपिन जाणून घ्यायचा असेल, तर खाली दिलेल्या स्टेप्स काळजीपूर्वक फॉलो करा.यामुळे तुम्हाला तुमचा डिजीपिन सहज मिळेल.
स्टेप 1:- Google Chrome वर जाऊन “Know Your DigiPIN” असं सर्च करा.(दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकता)
स्टेप 2:- सर्च केल्यावर दिसणाऱ्या “Know Your DigiPIN” या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3:- क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक बॉक्स उघडेल. त्या बॉक्समध्ये “I Consent” या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 4:- यानंतर तुमच्याकडून लोकेशनसाठी परवानगी मागितली जाईल. स्क्रीनच्या खाली “Request Permission” हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा आणि लोकेशन Allow करा.
स्टेप 5:- लोकेशन Allow केल्यावर काही क्षणांतच तुमचा DigiPIN स्क्रीनवर दिसू लागेल.
“तुम्हाला तुमचा डिजीपिन(digipin marathi) कळाला का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन टेक बातम्यांसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा!”
