फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन वरून आलेल्या पार्सलचे बॉक्सेस जर हे केल्याशिवाय डायरेक्ट कचऱ्यात टाकत असाल तर अत्ताच थांबा आणि सावध व्हा!

फ्लिपकार्ट, ॲमेझॉन किंवा कुठलेही ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म असो, तुमच्याकडे आलेले पार्सल बॉक्सचं तुम्ही काय करता? जर तुम्ही ते सरळ कचर्‍यात टाकत असाल, तर हे लगेच थांबवा — कारण तुम्ही एक मोठी चूक करत आहात.

या निष्काळजीपणामुळे तुम्ही एक मोठ्या स्कॅमचा बळी होऊ शकता आणि तुमचं बँक अकाउंट रिकामं होण्याची शक्यता निर्माण होते. का? कारण या बॉक्सवर असलेल्या बारकोड, ट्रॅकिंग नंबर, ऑर्डर आयडी, नाव, पत्ता आणि फोन नंबरसारख्या वैयक्तिक माहितीचा वापर स्कॅमर्स तुमच्याविरोधात करू शकतात.

चला, तुम्हाला(delivery scam in marathi) सविस्तर सांगतो. तुम्हाला माहीतच असेल की आपल्या देशात सध्या स्कॅम खूप वाढले आहेत आणि स्कॅमर्स आता खूपच सक्रिय झाले आहेत. ते सरळसाध्या, भोळ्याभाबड्या लोकांना टार्गेट करतात आणि त्यांच्या सोबत फसवणूक करतात.

तुम्हाला जर माहित नसेल, तर अलीकडे एक नवीन स्कॅम सुरू झालेला आहे , ज्याला “Delivery Box Scam” असं म्हणतात.

delivery scam in marathi

आपण जेव्हा एखादं पार्सेल मागवतो, तेव्हा ते एका बॉक्समध्ये येतं. तुम्ही जर त्या बॉक्सकडे नीट पाहिलं तर, त्यावर आपले सर्व तपशील छापलेले असतात. कसे तपशील?

तर त्या बॉक्सवर तुमचं नाव, पत्ता, ईमेल, फोन नंबर आणि तुम्ही नेमकं कोणता प्रॉडक्ट मागवला आहे याची थोडीफार माहिती लिहिलेली असते.

नंतर मग तुम्ही तो बॉक्स कचर्‍यात टाकून देता. आणि इथून पुढेच स्कॅमर तुमच्यासोबत फसवणूक करण्याचा डाव आखतात. तर हे स्कॅमर काय करतात — तुम्ही टाकलेले पार्सल बॉक्सेस ते गोळा करतात.

म्हणजे जिथे कचऱ्याची साठवणूक होते तिथून हे पार्सल बॉक्सेस उचलले जातात. या बॉक्सवर तुमचे पूर्ण डिटेल्स असतात — नाव, मोबाईल नंबर, पत्ता, ईमेल, आणि कधी कधी तुम्ही ऑर्डर केलेल्या प्रोडक्टचे तपशीलसुद्धा. या माहितीचा वापर करून ते तुमचा मोबाईल नंबर डायल करतात आणि तुम्हाला कोणतं तरी आमिष दाखवून फसवायचा प्रयत्न करतात.

delivery scam in marathi

समजावण्यासाठी एक उदाहरण देतो: समजा, मी काही शूज मागवले आहेत. तर स्कॅमर मला कॉल करेल आणि म्हणेल —”सर, तुम्ही मागवलेले शूजसाठी आम्ही एक खास 50% डिस्काउंट कूपन देत आहोत.

तुम्हाला हा कूपन हवा असेल तर आम्ही एक लिंक पाठवतो, त्या लिंकवर क्लिक करून तो कूपन डाउनलोड करून घ्या” हाच तो फसवणुकीचा प्रारंभ असतो. त्यानंतर ते स्कॅमर तुमच्याकडून सगळी माहिती पुन्हा एकदा ‘कन्फर्म’ करून घेतात — जसं की तुमचं नाव, ईमेल, मोबाईल नंबर, पत्ता इत्यादी योग्य आहे का हे विचारतात.

तेव्हा तुम्हाला वाटतं की, “बरं आहे, व्यवस्थित प्रोसेस वाटते, माहिती कन्फर्म करतायत म्हणजे खरंच कूपन देणार असतील!” ते तुम्हाला एक डिस्काउंट कूपन चा लिंक पाठवतात आणि तुम्ही त्यावर क्लिक करता. पण तो कूपन नसतोच!

तुम्ही ज्या क्षणी त्या लिंकवर क्लिक करता, तुमच्या फोनमध्ये एक मालवेअर (Malware) इन्स्टॉल होतं आणि त्या माध्यमातून स्कॅमर तुमच्या मोबाईलमधली खालील सर्व माहिती चोरतात: बँकेशी संबंधित माहिती, OTP, पेमेंट अ‍ॅप्समधली माहिती, पासवर्ड आणि इतर वैयक्तिक डिटेल्स.

delivery scam in marathi

आता ह्या स्कॅमर्सपासून काय काळजी घ्यावी हे पाहूया. तुम्ही ज्या पार्सल बॉक्समध्ये ऑर्डर आलेली असते, तो फेकण्याआधी त्या बॉक्सवरची सगळी माहिती – म्हणजे तुमचं नाव, नंबर, पत्ता वगैरे – फाडून टाका. तो भाग छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये फाडून टाका किंवा परमनंट मार्करने पूर्णपणे खोडून काढा. इथून पुढे अशा कोणत्याही फेक कॉलवर विश्वास ठेवू नका कारण हे स्कॅमर तुमचा मोबाईल, बँक डिटेल्स आणि शेवटी खिशाच रिकामा करायला निघालेले असतात.

ही महत्त्वाची माहिती(delivery scam in marathi) नक्की तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा, म्हणजे त्यांनाही सावध राहता येईल अशा स्कॅम्सपासून. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी माहिती पाहिजे असेल तर पेजला नक्की सबस्क्राइब करा आणि आपल्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला सगळी अपडेट्स वेळेवर मिळतील

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment