तुम्हाला आता अनोळखी कॉल कधीच येणार नाहीत! CNAP या सेवेमुळे समोरच्या व्यक्तीचं खरे नाव दिसणार. CNAP म्हणजे काय?

CNAP Trai Marathi

CNAP TRAI Marathi – अनोळखी कॉलचा त्रास संपणार! कॉलिंग नेम प्रेझेंटेशन सेवेमुळे कॉल करणाऱ्याचं खरे नाव दिसेल. CNAP म्हणजे काय? आणि अनओळखी कॉलवर नाव कसे दिसते ते जाणून घ्या.

तुम्हाला अनोळखी नंबरवरून सारखेच कॉल येतात का? मग प्रश्न पडतो की कॉल उचलावा की नाही कंपनीने केला आहे का, नातेवाईकांनी, मित्रांनी की एखाद्या फसवणूक करणाऱ्याने? तुमच्यासोबतही असं होत असेल तर आता असा विचार करण्याची गरज नाही. TRAI (टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया) च्या या निर्णयामुळे आता अनोळखी कॉल्स येणं बंद होणार आहे.

हो, केंद्र सरकारने TRAI (टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया) ला आदेश दिल्यानंतर TRAI कडून संपूर्ण टेलिकॉम उद्योगाला सूचना देण्यात आल्या आहेत की प्रत्येकाने CNAP trai marathi हे फीचर वापरणे बंधनकारक करावे. हे फीचर वापरल्यामुळे अनेक स्पॅम कॉल्स कमी होतील आणि लोकांना फसवणूक होण्यापासून वाचवता येईल.

CNAP म्हणजे काय? What is CNAP?

तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की नेमकं CNAP म्हणजे काय? चला तर अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया.

CNAP म्हणजे कॉलिंग नेम प्रेझेंटेशन (Calling Name Presentation). आतापर्यंत आपल्याला कुणाचा कॉल आला की फक्त मोबाईल नंबरच दिसायचा. तो नंबर नेमका कुणाचा आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला ट्रूकॉलर सारखं थर्ड-पार्टी अ‍ॅप इन्स्टॉल करावं लागायचं. हे अ‍ॅप भारतात खूप मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं हे तर सगळ्यांनाच माहीत आहे.

बहुतेक लोकांना अजून माहिती नसेल की ट्रूकॉलर (Truecaller) हे अ‍ॅप नेमकं काय करतं, त्यामुळे त्यांच्यासाठी थोडक्यात समजावून सांगतो. जर तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि तो नंबर कुणाचा आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तो नंबर ट्रूकॉलर या अ‍ॅपमध्ये टाकावा लागतो. त्यानंतर तो नंबर कुणाचा आहे याची माहिती आपल्याला मिळते.

अनओळखी कॉलवर नाव कसे दिसते?

आता आपल्याला ट्रूकॉलर सारखी थर्ड-पार्टी अ‍ॅप्लिकेशन वापरण्याची गरज नाही कारण आता CNAP हे फीचर तुम्हाला मिळणार आहे. कॉलिंग नेम प्रेझेंटेशन मुळे आता कॉल आल्यावर फक्त नंबरच नाही तर त्या नंबरधारकाचं नावसुद्धा दिसणार आहे. आता तुम्ही विचार करत असाल की हे नाव तर कोणीही बदलून कॉल करू शकतो पण तसं अजिबात करू शकत नाही.

CNAP म्हणजे काय?

तुम्ही जर Truecaller वापरत असाल तर त्यावर आपण नाव बदलू शकतो पण CNAP (कॉलिंग नेम प्रेझेंटेशन) मध्ये तुमचं खरं नावच दिसणार आहे, पण हे नाव नक्की कुठून येणार? हे नाव थेट तुमच्या SIM कार्डच्या KYC डेटामधून येणार आहे. हो, जेव्हा तुम्ही नवीन सिम घेताना आधार कार्ड किंवा सिम घेताना दिलेल्या कागदपत्रांवर जे नाव दिलं आहे तेच नाव आता त्या नंबरवर दिसणार.

थर्ड पार्टी अ‍ॅप Truecaller वर तुम्ही नाव एडिट करू शकता किंवा माहिती डिलीटही करू शकता पण CNAP (कॉलिंग नेम प्रेझेंटेशन)मध्ये तुम्ही असं काहीही करू शकणार नाही. TRAI (टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया) च्या या नव्या सेवे मुळे देशात लोकांची फसवणूक आणि स्कॅम होणं मोठ्या प्रमाणात कमी होईल तसेच बनावट कॉल करणाऱ्यांवरही यामुळे आळा बसेल.

CNAP Trai Marathi सेवा कोणत्या राज्यांमध्ये सुरू झाली आहे?

प्रत्येक टेलिकॉम ऑपरेटरने वेगवेगळ्या भागांमध्ये ही सेवा चाचणी म्हणून सुरू केली आहे. सध्या काही युजर्सना ही सेवा दिसू लागली आहे. म्हणजेच कॉल आल्यावर फक्त नंबरच नाही तर तो नंबर कोणाच्या नावावर आहे ते नावही स्क्रीनवर दिसत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार टेलिकॉम ऑपरेटरांनी ही सुविधा या राज्यांमध्ये सुरू केली आहे.

Reliance Jio ने ही सेवा बिहार, केरळ, राजस्थान, आसाम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश, पंजाब, झारखंड आणि पश्चिम बंगाल अशा राज्यांमध्ये CNAP सेवा सुरू केली आहे.

हे ही वाचा – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन नियमावली तुम्ही वाचली का? ज्यात ATM वापरण्यापासून डिजिटल पेमेंटपर्यंत बऱ्याच गोष्टी मोफत झाल्या आहेत!

Airtel ने मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पश्चिम बंगाल तसेच गुजरातमध्ये ही सेवा उपलब्ध करून दिली आहे.

Vodafone ने महाराष्ट्र आणि तामिळनाडू मध्ये ही चाचणी चालू केली आहे आणि सरकारी मालकीची BSNL सध्या पश्चिम बंगाल मध्ये चाचणी करत आहे.

ही सेवा तुमच्या स्मार्टफोन मध्ये कशी सुरू करायची? How To Activate CNAP?

तुमच्या फोन मध्ये ही सेवा सुरू करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काहीही वेगळं करावं लागणार नाही. ज्या वेळी तुमच्या भागात Airtel, Jio किंवा Vodafone सारख्या टेलिकॉम ऑपरेटरकडून ही सेवा सुरू केली जाईल त्या वेळी ती आपोआपच तुमच्या फोन मध्ये लागू होईल.

यासाठी TRAI (टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया) ने प्ले स्टोर वर कोणताही वेगळा ॲप दिलेला नाही. तरीही बरेच जण प्ले स्टोर वर जाऊन CNAP शोधून कुठलातरी ॲप इन्स्टॉल करत आहेत पण तुम्ही तस करू नका.

तुम्हाला ही CNAP trai marathi सेवा कशी वाटते ते कमेंट करून सांगा. तसेच तुमच्या फोन मध्ये ही सेवा सुरू झाली आहे का आणि कोणत्या भागात सुरू झाली आहे हेही कमेंट मध्ये नक्की कळवा. अश्याच नवीन माहितीसाठी आपल्या लेखकाची टिप्पणी पेज ला फॉलो करा.

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment