तुमच्या फोनचा डायलर बदलून गेला आहे ना! कसा काय? पुन्हा आधीसारखा करायचा असेल तर हा सोपा उपाय पाहा!

गेल्या २-३ दिवसांपासून अँड्रॉइड वापरकर्त्यांच्या फोनमध्ये मोठे अपडेट्स आले आहेत. तुमच्या फोनमध्येही हे अपडेट्स आतापर्यंत इन्स्टॉल झाले असतील.

गूगलच्या फोन ॲप डायलरमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. हा बदल इंटरफेसमध्ये दिसतो. तुम्ही पाहिलं असेल की आता कॉल लॉगमध्ये आधीसारखा ग्रुप व्ह्यू दिसत नाही.

आता कॉल हिस्टरी आणि फेव्हरेट्स हे दोन पर्याय थेट होम स्क्रीनवर दिसतात. मिस्ड कॉल्स, कॉन्टॅक्ट्स, नॉन स्पॅम आणि स्पॅम यांना वेगवेगळे पर्याय दिले आहेत.

change dialer marathi

नवीन अपडेटमध्ये कॉल रिसीव्ह करण्यासाठी दोन पर्याय मिळतात – ‘सिंगल टॅप आन्सर’ आणि ‘स्लाइड टू आन्सर’ ऑप्शन. कॉल संपवण्यासाठीच्या बटणाचा आकार आता मोठा करण्यात आला आहे.

काही अँड्रॉइड वापरकर्त्यांना हा युजर इंटरफेस आणि आयकॉनचा आकार अजिबात आवडलेला नाही आणि त्यामुळे काही वापरकर्त्यांनी यावर टीका केली आहे.

तुम्हाला जर हा डायलर पुन्हा पहिल्यासारखा करायचा असेल, तर खालील स्टेप्स फॉलो करा(change dialer marathi)

स्टेप 1: तुमच्या फोन ॲपवर थोडा वेळ दाबून ठेवा.

स्टेप 2: थोडा वेळ दाबून ठेवल्यानंतर तुम्हाला तिथे ‘App Info’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

स्टेप 3: क्लिक केल्यानंतर वरती तुम्हाला तीन ठिपके दिसतील, त्यावर क्लिक करा.

स्टेप 4: तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ‘Uninstall Updates’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

हे सगळे स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुमचा डायलर पुन्हा पहिल्यासारखा होईल.

तुम्हाला ही माहिती(change dialer marathi) कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आमच्या WhatsApp चॅनेल ला फॉलो करायला विसरू नका.

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment