भारतामध्ये लॉन्च केलेलं, WhatsApp सारखं स्वदेशी अॅप म्हणजे Arattai(अराताई) अॅप. हे पूर्णपणे मेड इन इंडिया असून सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे त्याची स्वदेशी ओळख. प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअर वर हे अॅप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि केवळ 5-7 दिवसांत 10 लाखांहून अधिक लोकांनी हे डाउनलोड केलं आहे.
हे अॅप अगदी WhatsApp सारखंच असून WhatsApp ला जोरदार टक्कर देऊ शकतं. अराताई App मध्ये असे काही खास फीचर्स दिले आहेत जे WhatsApp पेक्षा चांगले ठरतात. दोन्ही अॅप्समध्ये नेमका काय फरक आहे आणि कोणतं अॅप अधिक चांगलं आहे, हे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया!
काय आहे Arattai App?
सर्वात आधी समजून घेऊ या Arattai(अराताई) या शब्दाचा अर्थ काय आहे?. अराताई हा एक तामिळ शब्द आहे ज्याचा अर्थ म्हणजे “गप्पा गोष्टी”. नावाप्रमाणेच, अराताई अॅप हे एक मॅसेजिंग अॅप आहे जिथे तुम्ही मेसेजेस, फोटो, व्हिडिओ अगदी WhatsApp सारखे सहज पाठवू शकता.
कदाचित तुम्हाला वाटत असेल की हे अॅप नुकतंच लॉन्च झालं आणि कुठलीही जाहिरात किंवा बातमी दिसली नाही. पण खरं म्हणजे, हे अॅप आता नवीन नाही—अराताई अॅप ला लॉन्च होऊन 3 वर्षं झाली आहेत. हो, अराताई अॅप हा जानेवारी 2021 मध्येच लॉन्च झालेला आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे अॅप आता अचानक चर्चेत कसं आलं? तर काही दिवसांपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक आवाहन केलं की भारतातील लोकांनी स्वदेशी अॅप्सचा वापर करावा. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून सांगितले की हे arattai marathi app वापरण्यास खूप सोपे आहे, सुरक्षितसुद्धा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मेड इन इंडिया आहे, जे झोहो या कंपनीने बनवलेले अॅप आहे.

झोहो ही एक कंपनी आहे जी सेल्स, मार्केटिंग, फायनान्स, मानव संसाधन आणि IT यांसारख्या विविध क्षेत्रांसाठी लागणारे सॉफ्टवेअर आणि टूल्स तयार करते. Arattai marathi app मध्ये तुम्ही फोटो, व्हिडिओ पाठवू शकता, कुटुंबीय किंवा मित्रांसोबत चॅट करू शकता, ग्रुप चॅट, स्टेटस टाकू शकता, चॅनल तयार करू शकता जसं WhatsApp मध्ये करता येतं. याशिवाय यात ऑडिओ कॉल आणि व्हिडिओ कॉल करण्याची सुविधाही आहे.
काय फरक आहे WhatsApp आणि Arattai मध्ये?
WhatsApp वर आपण जेव्हा कोणाला मेसेज करतो किंवा ऑडिओ कॉल आणि व्हिडिओ कॉल करतो तेव्हा ते एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असते, म्हणजे पूर्णपणे सुरक्षित असते. पण अराताई अॅपमध्ये तुम्हाला फक्त ऑडिओ कॉल आणि व्हिडिओ कॉललाच एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आहे. म्हणजे तुम्ही चॅट करताना, कोणाला मेसेज पाठवताना ते सुरक्षित नाही.
एंड-टू-एंड एन्क्रिप्शन (End-To-End Encryption) म्हणजे काय?
काही लोकांना जर माहीत नसेल की एंड-टू-एंड एन्क्रिप्शन म्हणजे काय, तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जो मेसेज पाठवणार आहात तो मेसेज फक्त तुम्ही आणि ज्याला पाठवला आहे तोच वाचू शकतो. यात मध्ये कुणीही नसतो जो तुमचे मेसेज वाचू शकतो. हा मेसेज फक्त ज्या मोबाईल नंबरवर पाठवला आहे त्याच मोबाईलवरच वाचता येतो.
समजा हा मेसेज पाठवणाऱ्याकडे जात असताना कुणीतरी तो हॅक केला, तर तो आपला डेटा आणि आपण काय मेसेज पाठवला आहे ते पाहू शकतो. पण हा मेसेज कोणी वाचू नये म्हणून तो मेसेज कोड्सच्या माध्यमातून जातो, म्हणजे कुणी हॅक केलं तरी तो मेसेज कोणीही वाचू शकत नाही, कितीही प्रयत्न केला तरी तो मेसेज वाचणं अशक्य आहे.
म्हणून कोणतंही मेसेजिंग अॅप इन्स्टॉल करताना एंड-टू-एंड एन्क्रिप्शन असणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही एखाद्याला मेसेज पाठवत असाल आणि तो मेसेज जर एंड-टू-एंड एन्क्रिप्शन नसेल, तर कोणीही तो मेसेज हॅक करून वाचू शकतो. अराताई(arattai marathi app) अॅपचं हेच एक मोठा तोटा आहे.
अराताई अॅपचे वैशिष्ट्ये.
- फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकता.
- स्वतःचे चॅनल तयार करू शकता.
- स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टॅबलेटवर हा अँप वापरू शकता.
- ऑडिओ कॉल आणि व्हिडिओ कॉल करण्याची सोय.
- सर्वात खास फीचर मला जे खूप आवडलं ते म्हणजे अराताई अॅपमध्ये मीटिंगचं फीचर दिलं आहे. जेव्हा तुम्हाला कोणासोबत मीटिंग करायची असेल, तेव्हा फक्त त्याला मीटिंग आयडी पाठवायचा आणि तो व्यक्ती अराताई अॅपमधील मीटिंग ऑप्शनमध्ये जाऊन तो आयडी टाकेल आणि मीटिंग जॉईन करेल.
- पॉकेट – जिथे तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्रं (documents) सुरक्षितपणे साठवून ठेवू शकता.
अराताई अॅप डाउनलोड/इन्स्टॉल कसं करायचं?
Android साठी
1} प्ले स्टोअर हे अॅप उघडा.
2} उघडल्यानंतर सर्च बार मध्ये अराताई अॅप टाइप करा.
3} सर्च केल्यानंतर तुम्हाला अराताई मेसेंजर हे अॅप दिसून येईल.
4} इन्स्टॉल वर क्लिक करा.
iPhone साठी
1} अॅप स्टोअर हे अॅप उघडा.
2} सर्च बार मध्ये अराताई मेसेंजर शोधा.
3} त्या अॅप वर क्लिक करा आणि Get ऑप्शनवर क्लिक करा.
तुम्ही हे अॅप वापरणार आहात का? किंवा वापरायला सुरुवात केली आहे का? आणि केली असेल तर हे अॅप तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा.
