Apple “Awe Dropping” इव्हेंट 2025 ची तारीख ठरली! iPhone 17 सीरिज मॉडेल- iPhone 17, iPhone 17 Pro, iPhone 17 Air, iPhone 17 Pro Max आणि अजून बरंच काही होणार लाँच!

स्मार्टफोन ब्रँड्सपैकी एक सर्वात मोठा ब्रँड म्हणजे “Apple” यांनी जाहीर केला त्यांचा 2025 चा लॉन्च इव्हेंट ज्याला “Awe Dropping” असं नाव दिलं आहे. Apple चे CEO(मालक) टिम कुक यांनी ट्विटरवर जाहीर केलं की Apple चा “Awe Dropping” इव्हेंट 9 सप्टेंबरला होणार आहे. आज आपण पाहणार आहोत कोणते डिव्हाइसेस या इव्हेंटमध्ये Apple लाँच करणार आहे.

apple launch event marathi

आज आपण पाहणार आहोत कोणते डिव्हाइसेस या इव्हेंटमध्ये Apple लाँच करणार आहे. सर्वात आधी तुम्ही Apple च्या या इव्हेंटच्या टीझरकडे नीट लक्ष द्या. तुम्हाला असं वाटत असेल की का वेगवेगळे रंग दिले आहेत – निळा, पिवळा – पण तसं नाही आहे. सूत्रांच्या अनुसार हे रंग iPhone 17 च्या कलर्सना मॅच करतात जसे की डार्क ब्लू, ब्राइट ऑरेंज iPhone 17 Pro मध्ये आणि iPhone 17 Air मध्ये लाईट ब्लू आणि लाईट गोल्ड. हा या इव्हेंटचा मोठा फ्लॅगशिप लेव्हल प्रॉडक्ट आहे जो लाँच होतो आहे iPhone 17 सिरीजमध्ये.

iPhone 17 Series कडून काय अपेक्षा ठेवू शकतो?

इव्हेंटमध्ये Pro मॉडेल्सचं लाँच होणार आहे जे टॉप क्लास डिव्हाइसेस म्हणून मानलं जाईल. iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max मॉडेलमध्ये डिझाइनला अपग्रेड केलं आहे ज्यात ग्लास आणि ॲल्युमिनियमचा वापर केला आहे. वरच्या बाजूला ३ कॅमेरे दिले आहेत आणि खाली एक कटआउट दिसेल, ते वायरलेस चार्जिंगसाठी दिलं आहे. काही अफवा सुद्धा पसरल्या आहेत की हे वर्ष iPhone साठी खूप महत्त्वाचं वर्ष ठरणार आहे.

apple launch event marathi

iPhone 17 Series चे कॅमेरे – काय नवीन मिळणार?

कॅमेऱ्याकडे पाहिलं तर दोन्ही Pro मॉडेल्समध्ये ४८ मेगापिक्सेल सेन्सर मिळणार आहे अशी बातमी पसरली आहे. iPhone 17 Pro ani iphone 17 Pro Max मध्ये आता तुम्हाला 48 मेगापिक्सेलचे 3 कॅमेरे मिळणार आहेत. आधी Pro मॉडेलमध्ये 12 मेगापिक्सेलचा टेलिफोटो सेन्सर होता, पण आता वाढवून यात 48 मेगापिक्सेलचा टेलिफोटो सेन्सर आणि सेल्फी कॅमेरामध्ये सुद्धा अपग्रेड करून 24 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

सर्वात मोठा अपग्रेड कॅमेरामध्ये करण्यात आला आहे, कारण आता 5x वरून 8x पर्यंत झूम करता येणार आहे. तुम्हाला DSLR माहिती असेल, त्यात झूम केल्यावर लेन्स थोडी बाहेर येते, तसंच iPhone 17 Pro मध्ये दिलं आहे, असे अफवा पसरले आहेत.

iPhone 17 Series चा प्रोसेसर?

17 सीरिज मध्ये मिळणार आहे सर्वात पॉवरफुल प्रोसेसर – A19 Pro बायोनिक चिप. iPhone वापरकर्त्यांना अनुभव असेल की जास्त वेळ फोन वापरला किंवा जास्त वेळ गेम खेळला तरी फोन गरम होतो, उन्हात गेला तर ब्राइटनेस लगेच कमी होतो, कॅमेरा बंद होतो. पण आता Apple ने पहिल्यांदाच iPhone मध्ये व्हेपर कूलिंग चेंबर देणार आहेत, जे हे फोन थंड ठेवण्यात मदत करणार आहे.

apple launch event marathi

iPhone 17 Pro Max बद्दल असंही ऐकायला आलं आहे की यात रिव्हर्स चार्जिंग फीचर मिळणार आहे. म्हणजे फक्त मोबाईलच्या बॅक साइडवर AirPods ठेवायचे आणि ते चार्ज होऊ लागतील. iPhone च्या बॅटरीमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. असं म्हटलं जातंय की iPhone 17 Pro Max मध्ये 5000mAh किंवा त्याहून मोठी बॅटरी असू शकते. Apple कंपनीची ही पहिली सर्वात मोठी बॅटरी असेल जी आतापर्यंतच्या सर्व मॉडेल्समध्ये सर्वात मोठी मानली जाईल.

iPhone 17 Air – Plus मॉडेलचा पर्याय म्हणून येतोय नवा फोन?

आत्तापर्यंत प्रत्येक iPhone सिरीजमध्ये आपल्याला Plus हा मॉडेल मिळत होता, पण यावर्षी Apple iPhone 17 सिरीजमध्ये Plus मॉडेल आणणार नाही. Plus मॉडेलच्या जागी आता तुम्हाला iPhone Air हा नवा मॉडेल पाहायला मिळणार आहे. Apple launch event marathi 2025 मध्ये सर्वात जास्त उत्सुकता ही iPhone 17 Air या मॉडेलला पाहण्यात येणार आहे.

apple launch event marathi

iPhone 17 Air हा Apple चा सर्वात स्लिम/पातळ iPhone असणार आहे. तुम्ही पाहू शकता की हा फोन एका पेन्सिलइतका स्लिम आहे. Plus मॉडेलच्या जागी आता iPhone 17 Air येणार आहे, पण Plus मॉडेलमध्ये जितका डिस्प्ले मिळत होता तितकाच डिस्प्ले iPhone 17 Air मध्ये मिळणार आहे.

हो, iPhone 17 Air हा 6.6 इंचाच्या डिस्प्लेसह येणार आहे आणि त्यात 120Hz चा रिफ्रेश रेट मिळणार आहे, जो खूपच स्मूथ असणार आहे. या मॉडेलमध्ये तुम्हाला फक्त एकच कॅमेरा मिळणार आहे, जो 48 मेगापिक्सेल सेन्सरसह असेल. सोबत बॉक्समध्ये 10,000 ते 11,000 रुपयांचे Mag-safe हे फ्री मध्ये मिळणार आहे.

iPhone 17 Series – भारतात किंमत किती असणार?

Apple ने अजून या iPhones ची किंमत जाहीर केलेली नाही, पण मार्केटमध्ये अशी चर्चा सुरू आहे की या iPhone 17 सीरिजची किंमत iPhone 16 पेक्षा जास्त असू शकते. iPhone 17 बेस व्हेरिएंटची किंमत जवळपास ₹79,000 असू शकते. तसंच iPhone 17 Pro ची किंमत ₹1,29,000 ते ₹1,32,000 च्या आसपास असू शकते, आणि iPhone 17 Pro Max ची किंमत ₹1,55,000 ते ₹1,65,000 दरम्यान असू शकते. iPhone 17 Air जो बेस मॉडेल आणि प्रो मॉडेलच्या मधला व्हेरिएंट आहे, त्याची किंमत ₹80,000 ते ₹90,000 दरम्यान असू शकते.

भारतात iPhone 17 तुम्हाला 19 सप्टेंबर 2025 पासून खरेदी करता येईल, असं Apple ने सांगितलं आहे, म्हणजेच लॉन्च इव्हेंटच्या 10 दिवसांनी. iPhone व्यतिरिक्त Apple अजून काही डिव्हाइसेसही लॉन्च करणार आहे, जसे की Apple Watch ची नवी 11 सीरिज आणि AirPods Pro 3. या वेळीचं Apple launch event marathi पाहायला विसरू नका, कारण या इव्हेंटमध्ये एकापेक्षा एक डिव्हाइसेस आणि अप्रतिम अपग्रेड्स पाहायला मिळणार आहेत.

हे पण वाचा
  1. तुमच्या मोबाईलवर मेसेज आल्यानंतर शेवटच्या अक्षरावरून कळणार कोणाचा मेसेज आला आहे!

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment