तुम्ही जर एक Airtel वापरकर्ता असाल, तर Airtel तुम्हाला देत आहे १७,००० रुपयांचं सॉफ्टवेअर एकदम मोफत. ही खास खुशखबर फक्त Airtel युजर्ससाठीच आहे. Airtel तुम्हाला देत आहे पर्प्लेक्सिटी प्रो(Perplexity Pro) या सॉफ्टवेअरचं संपूर्ण एक वर्षाचं सब्स्क्रिप्शन फ्री.
सध्या मार्केटमध्ये या सॉफ्टवेअरची १७,००० रुपये आहे. आता तुम्ही विचार करत असाल, नेमकं हे पर्प्लेक्सिटी प्रो म्हणजे काय आहे? काळजी करू नका, तुमचा हा लेखक तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे.
पर्प्लेक्सिटी प्रो (Perplexity Pro) म्हणजे काय?(airtel perplexity free marathi)
पर्प्लेक्सिटी प्रो हे एक सर्च इंजिन आहे जिथे तुम्ही थेट प्रश्न विचारू शकता. उदाहरणार्थ: तुम्हाला जर एखादी माहिती हवी असेल, जसं की –”आज टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत किती आहे? तर पर्प्लेक्सिटी प्रो तुम्हाला अचूक आणि सध्याच्या घडीची माहिती दाखवेल. हे सॉफ्टवेअर खास करून शाळा आणि कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तुम्हाला जर एखाद्या विशिष्ट विषयावर नोट्स तयार करायच्या असतील, तर Perplexity Pro हे सॉफ्टवेअर त्या विषयावर सखोल संशोधन करून तुम्हाला सहज आणि व्यवस्थित नोट्स तयार करून देण्यास मदत करणार.
(पर्प्लेक्सिटी प्रो)airtel perplexity free marathi मध्ये कसे मिळवायचे?
स्टेप 1: “Airtel Thanks” हे अॅप इन्स्टॉल करा. Airtel युजर्सकडे हे अॅप आधीपासून इन्स्टॉल असेलच, जर नसेल तर लगेच Play Store वर जाऊन इन्स्टॉल करा.
स्टेप 2: हे अॅप ओपन करा आणि तुम्हाला एक सर्च बार दिसेल त्यावर क्लिक करा. (पहिल्यांदा जर हे अॅप इन्स्टॉल केले असेल तर आधी तुमच्या Airtel मोबाईल नंबरने लॉगिन करा आणि मग हे स्टेप फॉलो करा.)
स्टेप 3: सर्च बार वर क्लिक केल्यावर तिथे “Perplexity” हे नाव टाका.
स्टेप 4: नाव टाकल्यावर तुम्हाला एक ऑप्शन दिसून येईल “Claim Perplexity Pro AI for Free” त्यावर क्लिक करा.
स्टेप 5: आता तुम्हाला एक छोटा बॅनर सारखा दिसेल ज्यावर Perplexity Pro Validity 12 Months असे लिहिलेले असेल. त्याच्या खाली Claim Now हा ऑप्शन दिसेल → त्यावर क्लिक करा.
स्टेप 6: क्लिक केल्यानंतर अजून एक बटण दिसेल ज्यावर “Proceed” असे लिहिलेले असेल → त्यावर क्लिक करा.
स्टेप 7: Proceed वर क्लिक केल्यानंतर तुम्ही थेट Perplexity Pro च्या वेबसाइटवर जाल.
स्टेप 8: तुम्हाला एक बटण दिसेल “Continue” असे लिहिलेले, त्यावर क्लिक करा (हे आपोआप देखील क्लिक होऊ शकते).
स्टेप 9: क्लिक केल्यावर आपोआप Promo Code apply होईल आणि त्यानंतर तुमचा Gmail विचारला जाईल. तिथे तुमचा Gmail टाका म्हणजे तुम्ही हे सॉफ्टवेअर Claim करू शकाल.
स्टेप 10: Gmail टाकल्यावर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील:
- “Get the Android App”
- “Continue in Browser”
माझ्या मते तुम्ही Get the Android App वर क्लिक करा कारण त्यामुळे हे अॅप तुमच्या मोबाईलवर इन्स्टॉल होईल आणि कधीही तुम्ही हे अॅप सहजपणे वापरू शकाल, वारंवार लॉगिन-लॉगआऊट करण्यापेक्षा.
नवीन टेक बातम्या आणि टिप्स मिळवण्यासाठी WhatsApp चॅनेलला आजच Follow करा व आमच्या परिवाराचा भाग बना.