Apple Airpods 3 प्रो – थेट भाषांतर आणि हार्ट रेट अशा उत्तम फीचर्स आणि लेटेस्ट डिझाईनसह झाले लॉन्च!

Airpods pro 3 marathi language

ॲपलने त्यांच्या 2025 च्या इव्हेंटमध्ये iphone 17 सोबत एअरपॉड्स सुद्धा लॉन्च केले. यावेळी कंपनीने एअरपॉड्सला अजून खास बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. एअरपॉड्स प्रो 3 मध्ये मोठे बदल करण्यात आले असून, इतके भारी फीचर्स मिळतील असे कदाचित कुणी विचारही केला नसेल.

आपण असं म्हणू शकतो की जर तुमच्याकडे एअरपॉड्स प्रो 3 असतील तर तुम्ही जगातील कुठल्याही देशात आरामात फिरू शकता. यामागचं कारण म्हणजे यात दिलेले नवे स्मार्ट फीचर्स, जे याला खरंच खास बनवतात.

Apple Airpods Pro 3 थेट भाषांतर फीचर

एअरपॉड्स प्रो 3 मध्ये आता “थेट भाषांतर” हे भन्नाट फीचर मिळणार आहे. हे फीचर काय करतं ते तुम्हाला आता समजावून सांगतो. तुम्ही जर कुठल्या परदेशी देशात फिरायला गेला असाल आणि त्या देशाची भाषा तुम्हाला येत नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही.

तुमच्याकडे असलेले Apple AirPods Pro 3 यामध्ये तुमची खूप मदत करणार आहेत. तुम्हाला तिथे कोणाशी बोलायचं असेल किंवा काही वस्तू घ्यायची असेल तर AirPods Pro 3 मधील हे फीचर ऑन करा. तुम्ही तुमच्या भाषेत बोला आणि समोरच्याला तुमचा iPhone दाखवा, कारण त्यामध्ये लगेच भाषांतर सुरू होतं त्यांच्या भाषेत. आणि समोरचा काय बोलतो आहे ते AirPods Pro 3 तुम्हाला तुमच्या भाषेत समजावून सांगतात.

समोरच्याकडे पण जर AirPods Pro 3 असतील, तर फोन दाखवायची गरज नाही. फक्त तुम्ही तुमच्या भाषेत बोला काय पाहिजे ते, आणि तो त्याच्या भाषेत बोलेल. बाकी भाषांतराचं काम AirPods Pro 3 स्वतःच करतील.

खरंच, एका एअरपॉड किंवा इअरबड्स मध्ये असं फीचर येईल असं मी विचारही केला नव्हता. एवढंच नाही तर अजून ही काही जबरदस्त फीचर्स आहेत पुढे.

Airpods pro 3 marathi हार्ट रेट सेन्सिंग फीचर

बहुतेक लोक AirPods घालून व्यायाम करतात आणि Apple ने यासाठीसुद्धा एक फीचर तयार केलं आहे जे खूप उपयुक्त ठरणार आहे. सर्वांना माहिती आहे की व्यायाम करताना सर्वात महत्त्वाचं असतं आपलं हृदय.

तर आता व्यायाम करताना Apple ने आपल्या हृदयाची काळजी घेण्यासाठी AirPods Pro 3 मध्ये “हार्ट रेट सेन्सिंग” हे फीचर दिलं आहे.

हे AirPods Pro 3 तयार करताना Apple ने यात एक छोटा हार्ट रेट सेन्सर बसवला आहे. AirPods Pro 3 मध्ये हा हार्ट रेट सेन्सर मशीन लर्निंग प्रोग्रॅमच्या मदतीने बनवला आहे. यातून तुमचा डेटा सेन्सरद्वारे घेतला जातो आणि योग्य मापन/रिझल्ट दाखवला जातो. AirPods Pro 3 तुम्ही Fitness App ला कनेक्ट करून तुमचा डेटा पाहू शकता.

आता Fitness App मध्ये तुम्हाला ५० वेगवेगळे वर्कआउट्स पाहायला मिळतील. तुम्ही चालता-चालता गाणी ऐकत असताना तुमचा हार्ट रेट आणि त्याचसोबत कॅलरीज देखील पाहू शकता. ही AirPods तुम्हाला मध्येच प्रेरित देखील करतात. “वेलकम बडी” जे Apple चं AI आहे, ते आता तुम्हाला असंही सांगतं की महिन्यात तुम्ही कोणती क्रिया जास्त केली.

Apple Airpods Pro 3 डिझाई

डिझाईनमध्ये इतकी काळजी घेतली आहे की हे AirPods कानात अगदी नीट बसावेत, म्हणूनच Apple ने १०,००० हून अधिक 3D कानांचे स्कॅन केले, कारण प्रत्येक माणसाचा कानाचा आकार वेगळा असतो. AirPods ला आकाराने थोडं छोटं केलं आहे म्हणजे कानात अजून चांगल्या पद्धतीने फिट बसतील.

जसं फोनमध्ये IP Rating असतं तसंच Apple AirPods Pro 3 मध्ये सुद्धा दिलं आहे. यात तुम्हाला IP57 जल-प्रतिरोधक डिझाइन मिळणार आहे, जे आतापर्यंत कुठल्याच AirPods मध्ये दिलं नव्हतं.

आता (airpods pro 3 marathi) बद्दल अजून बोलायचं झालं तर डिझाईनमध्ये अजून थोडासा बदल केला आहे.

डिझाईनमध्ये आता वरच्या बाजूला हवेसाठी थोडीशी जागा ठेवली आहे ज्यामुळे हवा थेट साऊंडसोबत कानापर्यंत पोहोचते. त्यामुळे बास अजून ताकदीचा होतो आणि गाण्यातलं प्रत्येक वाद्य एकदम स्पष्ट ऐकायला मिळतं.

बॅटरी बद्दल बोलायचं झालं तर, आता एकदा चार्ज केल्यावर हे AirPods ८ तासांपेक्षा जास्त चालतील. बाकीच्या AirPods मध्ये साधारण ६ तासांचा बॅकअप मिळायचा, पण यात बॅटरीसाठी अजून २ तास जास्त दिले आहेत.

या सगळ्यांना अजून चांगलं करण्यासाठी यात अ‍ॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन दिलं आहे. कंपनीचा असा दावा आहे की AirPods Pro पेक्षा AirPods Pro 3 हे ४ पट अधिक प्रभावी आहेत. आतापर्यंत जेवढे AirPods आले आहेत त्यामध्ये AirPods Pro 3 हे खरंच सर्वोत्कृष्ट पर्याय आहेत, विशेषत: बाकीच्या AirPods सोबत तुलना केली तर.

भारतात या AirPods ची किंमत ₹25,900 असणार आहे. Apple ने (airpods pro 3 marathi) बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि ते स्पष्टपणे दिसतं — मग ते डिझाईन असो, फीचर्स असो किंवा साऊंड क्वालिटी.

सदस्य व्हा आणि मिळवा — मोफत Windows Shortcut Keys PDF! फक्त सदस्यांसाठी खास मार्गदर्शक

Leave a Comment